प्रश्नसंच २२ - [इतिहास]

---------------------------------------------------
[प्र.१] खालीलपैकी कोणती निर्मिती गुप्तकालीन नाही?
१] भाग लेण्या
२] श्रीलंकातील खडकाळ सिग्रीया मंदिर
३] महाबलीपुरम लेण्या मंदिर
४] सितन्नावसल मंदिर

उत्तर
३] महाबलीपुरम लेण्या मंदिर
------------------
[प्र.२] विशाखादत्त यांच्या देवी चंद्र्गुप्तम संदर्भात खालीलपैकी कोणते विधान लागू पडते?
१] गीत काव्य
२] राजकीय नाट्य
३] वैज्ञानिक दंतकथा
४] आध्यात्मिक स्पष्टीकरण

उत्तर
२] राजकीय नाट्य
------------------
 [प्र.३] नवाश्मयुगात खालीलपैकी कोणता धातू मानवाला परिचित होता?
१] लोखंड
२] तांबे
३] चांदी
४] यापैकी नाही

उत्तर
४] यापैकी नाही
------------------
 [प्र.४] अनेकतावाद हे खालीलपैकी कोणाचे मध्यवर्ती तत्वज्ञान होते?
१] जैन
२] वैष्णव
३] शीख
४] बौद्ध

उत्तर
२] वैष्णव
------------------
[प्र.५] रत्न्मालिका आणि काविराजमार्ग या ग्रंथांची रचना कोणी केली?
१] हर्षवर्धन
२] राजा हाल
३] अमोघवर्ष
४] विक्रमादित्य

उत्तर
३] अमोघवर्ष
------------------
[प्र.६] खालील वैशिष्ठ्ये कोणत्या संस्कृतीची आहेत ते ओळखा?
अ] या काळात मानव सोने, चांदी, ब्राँझ धातूपासून बनवलेले अलंकार वापरत
ब] या संस्कृतीचा काळ इ.स.पु.१००० वर्षापूर्वीचा आहे.
क] या काळातील मृत अवशेष शिलावर्तुळात पुरत असत.

पर्याय
१] सिंधू
२] महापाषाण
३] मेसोपोटेमिया
४] जॉर्वे

उत्तर
२] महापाषाण
------------------
 [प्र.७] कापसाच्या कापडाचा तुकडा हडप्पातील कोणत्या ठिकाणी सापडला?
अ] लोथल
ब] धोलविरा
क] राखीगडी

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
 [प्र.८] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.

अ] दक्षिण भारतातील ईश्वाकु राज्यकर्ते बौद्ध धर्माच्या विरोधी होते.
ब] पूर्व भारतातील पाल घराणे हे बौद्ध धर्माचे आश्रय होते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य

उत्तर
२] फक्त ब
------------------
[प्र.९] खालीलपैकी कोणती बाब कुशाणांशी संबंधित आहे?
अ] त्यांनी सुवर्णमुद्रा चलनात आणल्या.
ब] त्यांचा चीनमधील राज्यकर्त्यांशी संघर्ष उद्भवला.
क] गांधार शैलीतील शिल्पांची निर्मिती
ड] मथुरा येथे देवकुल स्थापन केले.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] अ, ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
 [प्र.१०] खाली दिलेल्या प्राचीन मंदिरे व त्यांचे स्थान यांच्या योग्य जोड्या लावा.
[प्राचीन मंदिरे]                                         [ठिकाणे]
A] विद्याशंकर मंदिर                                I] आंध्रप्रदेश
B] राजाराणी मंदिर                                 II] कर्नाटक
C] कंदारीय महादेव मंदिर                        III] मध्यप्रदेश
D] भीमेश्वर मंदिर                                  IV] ओडिशा

पर्याय
१] A-II, B-IV, C-III, D-I
२] A-II, B-III, C-IV, D-I
३] A-I, B-IV, C-III, D-II
४] A-I, B-III, C-IV, D-II

उत्तर
१] A-II, B-IV, C-III, D-I
-------------------------------------------------------------