प्रश्नसंच ९३ - [अर्थशास्त्र]

[प्र.१] खालीलपैकी कोणते घटक कॅस्तु व सेवांच्या पुरवठ्यात घट घडवून आणतात?
अ] साठेबाजी
ब] भूकंप, अवर्षण व पूर
क] मजूर, भांडवल व कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा

१] फक्त अ
२] फक्त अ आणि ब
३] फक्त ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.२] सरकारने सरकारी कर्जरोख्यांद्वारे घेतलेल्या कर्जाची परतफेड केली असता अर्थव्यवस्थेवर खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येईल?
१] चलन पुरवठ्यात वाढ होईल.
२] उपभोग्य वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होईल.
३] चलनवाढ होईल.
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.३] केंद्र शासनाच्या विकासात्मक अथवा बिगर विकासात्मक खर्चात वाढ झाली असता..........
१] जनतेची खरेदीशक्ती वाढते.
२] वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होते.
३] वस्तू व सेवांच्या किंमती कमी होतात.
४] रोजगारात वाढ होते.

उत्तर
३] वस्तू व सेवांच्या किंमती कमी होतात.
------------------
[प्र.४] ठराविक काळासाठी सरकारने ठराविक वस्तू व सेवांची निर्यात खुली केली असता.........
१] वस्तू व सेवांच्या किंमती स्थिर होतील
२] वस्तू व सेवांच्या किंमती वाढतील
३] वस्तू व सेवांच्या किंमती कमी होतील
४] यापैकी नाही

उत्तर
२] वस्तू व सेवांच्या किंमती वाढतील
------------------
[प्र.५] वस्तू व सेवांची मागणी हि पुरवठ्यापेक्षा अधिक होण्याची खालीलपैकी कारणे कोणती?
अ] वस्तू व सेवांच्या मागणीतील वाढ
ब] वस्तू व सेवांच्या उत्पादनातील घट  

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
३] वरील दोन्ही
------------------
[प्र.६] चलनवाढीच्या काळात सरकारने कर कपात केली असता...............
१] चलनवाढ स्थिर होते.
२] चलनवाढीचा दर कमी होतो
३] चलनवाढीचा दर वाढतो
४] वरील सर्व

उत्तर
३] चलनवाढीचा दर वाढतो
------------------
[प्र.७] वखार महामंडळ स्थापन करण्यामागे केंद्र व राज्य सरकारचा खालीलपैकी मुख्य उद्देश कोणता?
१] बि-बियाण्यांचे व खताचे योग्य वाटप करणे.
२] शेतक-यांना पुनर्वित्तसहाय्य करणे.
३] शेतमाल साठवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे.
४] शेतमालावर प्रक्रिया करणे.  

उत्तर
३] शेतमाल साठवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे.
------------------
[प्र.८] मध्यवर्ती बँकेच्या "स्वस्त पैशाच्या धोरणाचा" खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येईल?
अ] चलनपुरवठ्यात वाढ होईल
ब]  वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होईल
क] वस्तू व सेवांच्या किंमतीत वाढ होईल.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.९] उत्पादनाच्या खाराचात झालेल्या वाढीमुळे जेव्हा वस्तू व सेवांच्या किंमतीत वाढ होते तेव्हा त्यास .........
१] मागणीजण्य चलनवाढ म्हणतात
२] परीव्ययजण्य  चलनवाढ म्हणतात  
३] मंद चलनवाढ म्हणतात
४] धावणारी चलनवाढ म्हणतात

उत्तर
२] परीव्ययजण्य चलनवाढ म्हणतात
------------------
[प्र.१०] चलनवाढीच्या काळात विनिमय दर .......
१] स्थिर असतो
२] कमी असतो
३] जास्त असतो
४] यापैकी नाही

उत्तर
२] कमी असतो
------------------
[प्र.११]  नगदी पिकाच्या आधारभूत किंमतीच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची असते?
१] कृषी मुल्य आयोग
२] कृषी मंत्रालय
३] नाफेड
४] नाबार्ड

उत्तर
३] नाफेड
----------------------------------