प्रश्नसंच १०६ - [पंचायत राज]

[प्र.१] सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामसभेची बैठक बोलाविण्याचा अधिकार कोणाला असतो?
१] उपसरपंच
२] गट विकास अधिकारी
३] तहसीलदार
४] ग्रामसेवक

उत्तर
१] उपसरपंच
------------------
[प्र.२] महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचे कामकाज कोणत्या अधिनियमानुसार चालते?
१] महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८  
२] मुंबई इलाखा ग्रामपंचायत अधिनियम, १९४८  
३] मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८  
४] मुंबई  ग्रामपंचायत अधिनियम, १९६१  

उत्तर
३] मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८
------------------
[प्र.३] ग्रामसभेच्या बैठका बोलविण्याची जबाबदारी कोणाची असते?
१] सरपंच
२] उपसरपंच
३] ग्रामसेवक
४] तहसीलदार

उत्तर
१] सरपंच
------------------
[प्र.४] ७५०१ पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत सदस्यसंख्या किती असते?
१] १३
२] १५
३] १७
४] १९

उत्तर
३] १७
------------------
[प्र.५] सरपंच व उपसरपंच यांच्या अनुपस्थितीत ग्रामसभेची बैठक बोलाविण्याचा अधिकार कोणाला असतो?
१] जिल्हाधिकारी
२] गट विकास अधिकारी
३] तहसीलदार
४] ग्रामसेवक

उत्तर
२] गट विकास अधिकारी
------------------
[प्र.६] ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याबाबत अधिकार कोणाला आहेत?
१] तहसीलदार
२] राज्य शासन
३] जिल्हाधिकारी
४] विभागीय आयुक्त

उत्तर
२] राज्य शासन
------------------
[प्र.७] ग्रामसभेच्या असाधारण बैठकीची सूचना सभेच्या तारखेच्या किमान किती दिवस अगोदर द्यावी लागते?
१] ७ दिवस
२] ४ दिवस
३] ५ दिवस
४] १४ दिवस

उत्तर
२] ४ दिवस
[साधारण बैठकीची सूचना सभेच्या तारखेच्या किमान ७ दिवस अगोदर द्यावी लागते]

------------------
[प्र.८] 'प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत' अशी तरतूद मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कोणत्या कलमात केलेली आहे?
१] कलम ७
२] कलम ५
३] कलम ८
४] कलम ३

उत्तर
२] कलम ५
------------------
[प्र.९] एका वर्षात ग्रामसभेच्या किमान सहा सभा घेण्यात येतील अशी तरतूद कोणत्या साली करण्यात आली?
१] १९५८
२] १९९५
३] १९९४
४] २००३

उत्तर
४] २००३
------------------
[प्र.१०] खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पाच वर्षापेक्षा जास्त असू नये अशी तरतूद केलेली आहे?
१] मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, कलम २७  
२] मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, कलम ०६
३] मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, कलम २५
४] मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, कलम २०

उत्तर
१] मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, कलम २७
----------------------