प्रश्नसंच ११४ - [अर्थशास्त्र-सहाय्यक पूर्वपरीक्षा २०१४]

[प्र.१] जुलै १९९१ मध्ये रुपयाचे किती टक्के अवमूल्यन करण्यात आले होते?
१] १४ टक्के
२] ३६.५ टक्के
३] १२ टक्के
४] २२.२ टक्के

उत्तर
४] २२.२ टक्के
----------------
[प्र.२] भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा मुद्रापुरवठा मापनाच्या प्रचालांची नव्याने व्याख्या करण्यासाठी अलीकडच्या काळात नियुक्त केलेल्या कार्य गटाने भारतातील मुद्रापुरावठ्याच्या संकल्पनेतून खालील घटक रद्द केला आहे.
१] M1
२] M2
३] M3
४] M4

उत्तर
४] M4
----------------
[प्र.३] सुखमॉय चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार वास्तव तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थबोधन होण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना योग्य आहे?  
१] महसुली तूट
२] राजकोषीय तूट
३] प्राथमिक तूट
४] वरीलपैकी एकही नाही

उत्तर
२] राजकोषीय तूट
----------------
[प्र.४] भारत सरकारद्वारा प्रा.पी.सी.महालनोबीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले?
१] १९५१
२] १९४९
३] १९४८
४] १९५६

उत्तर
२] १९४९
----------------
[प्र.५] किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
१] १९४७
२] १९४८
३] १९४९
४] १९५०

उत्तर
२] १९४८
----------------
[प्र.६] देशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे कारण -
अ] रोजगारात वाढ होत आहे.
ब] बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे
क] विदेशी गुंतवणुका वाढत आहेत
ड] वरीलपैकी कोणतेही नाही

योग्य पर्याय निवडा.
१] (अ) आणि (क) फक्त
२] (ब) फक्त
३] (ब) आणि (क) फक्त
४] (ड) फक्त

उत्तर
२] (ब) फक्त
----------------
[प्र.७] भांडवली खात्यावरील परीवर्तनियतेबाबतची समिती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली?
१] डॉ. सी.रंगराजन
२] एम.नर सिंहम
३] वाय.व्ही.रेड्डी
४] एस.एस.तारापोर

उत्तर
४] एस.एस.तारापोर
----------------
[प्र.८] पिक रचनेतील बदल याचा अर्थ -
अ] विविध पिकांच्या रचनेतील बदल
ब] आधुनिक पद्धतीने पिकांची लागवड
क] तंत्रज्ञानातील बदल
ड] विविध पिकांखालील शेतजमिनीच्या टक्केवारीत घडून आलेले बदल

योग्य पर्याय निवडा.
१] फक्त (अ) बरोबर
२] (अ) आणि (क) बरोबर
३] (ब) आणि (ड) बरोबर
४] फक्त (ड) बरोबर

उत्तर
४] फक्त (ड) बरोबर
----------------
[प्र.९] खालीलपैकी कोणता सार्वजनिक वित्ताचा बाह्य स्त्रोत आहे?
१] अधिमान भाग
२] साधारण भाग
३] नफ्याची गुंतवणूक
४] ऋण पत्रे

उत्तर
४] ऋण पत्रे
----------------
[प्र.१०] केंद्र सरकारला कोणत्या क्षेत्रात वावरताना अधिक काळजीपूर्वक आणि जबाबदारीने वागावे लागेल?
१] सेवा क्षेत्र
२] शेती क्षेत्र
३] बँकिंग क्षेत्र
४] उद्योग क्षेत्र

उत्तर
३] बँकिंग क्षेत्र
----------------
[प्र.११] योग्य पर्याय निवडा.
अ] स्वसहाय्यता गट हा गरीब लोकांचा असायला हवा.
ब] गटात २५ ते ३० सदस्य असतात.
क] केवळ सामाजिक दृष्ट्या मागास कुटुंबातील सदस्य असतात.

योग्य पर्याय निवडा.
१] (अ) बरोबर, (ब) आणि (क) चूक
२] (अ), (ब), (क) सर्व बरोबर
३] (अ) आणि (क) बरोबर, (ब) चूक
४] (अ), (ब), (क) सर्व चूक

उत्तर
१] (अ) बरोबर, (ब) आणि (क) चूक
----------------
[प्र.१२] जोड्या लावा
अ] तेलाच्या किंमतीत वाढ                                  i] शेतीशी निगडीत अधिक
ब] १९५०-१९५१ पूर्वी भारताची निर्यात                  ii] आर्थिक व्यवहारांचा आढावा
क] व्यवहारतोल                                                 iii] १९९०-१९९१
ड] व्यापारतोलातील मोठी तुट                             iv] १९७३ नंतर

१] अ-iii/ ब-iv / क-ii / ड-i
२] अ-iv / ब-i /क-ii / ड-iiii
३] अ-i / ब-iv / क-ii / ड-iii
४] अ-ii / ब-i / क-iii / ड-iv

उत्तर
२] अ-iv / ब-i /क-ii / ड-iiii
----------------
[प्र.१३] जोड्या लावा
अ] बँकिंग नियमन कायदा                                          i] १९६९   
ब] बँकांचे राष्ट्रीयीकरण                                                ii] १९५५
क] भारतातील स्टेट बँकेची स्थापना                            iii] १९६०
ड] स्टेट बँक समूहाची निर्मिती                                     iv] १९४९

१] अ-iii/ ब-iv / क-ii / ड-i
२] अ-i / ब-iv / क-ii / ड-iii
३] अ-iv / ब-i /क-ii / ड-iii
४] अ-ii / ब-i / क-iii / ड-iv

उत्तर
३] अ-iv / ब-i /क-ii / ड-iii
----------------
[प्र.१४] अ] बँकिंग क्षेत्रातील सुधारणा १९९२ मध्ये सुरु केल्या गेल्या.
ब] सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नफाक्षमता व कार्यक्षमता उंचावणे.
क] बँकांची सुरक्षितता आणि सक्षमता सुधारणे

योग्य पर्याय निवडा.
१] (अ) बरोबर असून (ब) आणि (क) हे (अ) चे उद्दिष्टे आहेत.
२] (ब) आणि (क) फक्त बरोबर आहेत.
३] (अ) बरोबर असून फक्त (ब) हे (अ) चे उद्दिष्ट आहे.
४] (अ) बरोबर परंतु (ब) आणि (क) हे (अ) चे उद्दिष्टे नाहीत.

उत्तर
१] (अ) बरोबर असून (ब) आणि (क) हे (अ) चे उद्दिष्टे आहेत.
----------------
[प्र.१५] एका कुटुंबात दोनच मुले असावीत असे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण केव्हा जाहीर झाले?
१] १९७६
२] १९९१
३] २०००
४] २००१

उत्तर
३] २०००
-----------------