चालू घडामोडी - २९ ऑक्टोबर २०१४


  • भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. 
  • ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त देशात "राष्ट्रीय एकता दिन" साजरा करण्यात येणार आहे. 
  •  आठ महिन्यांपासून राष्ट्रपती राजवट लागू  असलेल्या दिल्लीमध्ये सरकार स्थापनेविषयी होत असलेल्या विलंबाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले. 
  • जपानमधील टेलिकॉम व इंटरनेट क्षेत्रातील आघाडीच्या "सॉफ्टबँक"ने 'Snapdeal'या ऑनलाईन रिटेलरमध्ये ६२७ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. 
  • 'मजलिस-ए-इत्तेहाद्दुल मुस्लिमीन' (MIM) या पक्षाची महिला शाखा २०१५मध्ये मुंबई येथे सुरु होणार आहे. 
  • १९ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक गर्ल चाईल्ड दिनाची थीम : मुलींचे सक्षमीकरण