चालू घडामोडी - २४ व २५ नोव्हेंबर २०१४

·        नॉर्वेचा अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसन बुध्दिबळाचा जगज्जेता ठरला. त्याने विश्वविजेते पदाचा आव्हानवीर विश्वनाथन आनंदचा एक डाव बाकी ठेवून पराभव केला आहे.

·        कार्लसनने अकरा डावांमध्ये तीन विजय मिळवले तर, आनंदला फक्त एक विजय मिळवता आला होता.

·        आनंदने आतापर्यंत पाचवेळा जगज्जेतेपद मिळवले आहे तर कार्लसनने सलग दुस-यांदा विजेतेपद मिळवले.

·        इंचिऑन आशियाई स्पर्धेतील आक्षेपार्ह वर्तनाबद्दल भारतीय महिला बॉक्सर सरिता देवी हिच्यावर आशियाई ऑलिम्पिक समितीने (ओसीए) कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरिता देवीने आपल्या वर्तनाबद्दल बिनशर्त माफी मागितल्यानंतर तिला केवळ कठोर सूचना देऊन सोडण्याचा निर्णय ओसीएने जाहीर केला.

·        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील ७०० रेल्वेस्थानकांचा स्वच्छ भारत अभियानात समावेश करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला आहे.

·        फादर कुरियाकोस इलायस छवारा आणि सिस्टर इफारासिया या केरळच्या दोन कॅथॉलिक ख्रिश्चन धर्मगुरुंना पोप फ्रान्सिस यांनी रविवारी संतपद बहाल केले.

·        केरळच्या शंभरवर्ष जुन्या असलेल्या सायरो मलबार कॅथॉलिक चर्चमधील आतापर्यंत तिघांना संतपद देण्यात आले आहे.

·        यापूर्वी २००८ मध्ये सिस्टर अल्फान्सा यांना संतपद मिळाले होते.

·        थायलंड आणि कंबोडिया यांच्या सीमेवर असलेल्या प्रेह विहार या वादग्रस्त शिव मंदिराचे व्यवस्थापन संयुक्तपणे करण्याचा निर्णय भारत आणि चीन यांनी घेतला आहे. हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असून, त्याच्या मालकीवरून थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्धेही झाली आहेत.

·        कोटय़वधी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळाप्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य श्रींजय बोस यांना पाच तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली.

·        विख्यात कथ्थक गुरू पंडित बिर्जू महाराज यांना यंदाचा आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कार राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत समारंभपूर्वक देण्यात आला.

·        संगीत कला केंद्राच्या वतीने दरवर्षी नामांकित कलाकारांना हा पुरस्कार देण्यात येतो.

·        बोफोर्स तोफांच्या खरेदीनंतर ३० वर्षानंतर भारतीय लष्करासाठी ८१४ तोफा खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या व्यवहारासाठी १५,७५० कोटी रुपये खर्च होणार आहे.

·        या ८१४ तोफा १५५ एमएम/५२ च्या असणार आहेत. या तोफांचे उत्पादन भारतात करण्याची अट घालण्यात आली आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा