चालू घडामोडी - १० नोव्हेंबर २०१४

 • केंद्रातील भाजप सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून २१ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे आता मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या ६६ झाली. 
  • मनोहर पर्रीकर - संरक्षण मंत्री 
  • सुरेश प्रभू - रेल्वे मंत्री 
  • जगत प्रकाश नड्डा - आरोग्य मंत्री 
  • बिरंदर सिंग - ग्रामविकास मंत्री 
 • श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या  वनडे सामन्यात ५३ धावा करून विराट कोहलीने सर्वाधिक जलद ६००० धावांचा टप्पा पार करण्याचा  केला. याआधी हा विक्रम व्हिव्हियन रिचर्डस (वेस्ट इंडीज) यांच्या नावावर होता. 
 • फॉर्च्युन मासिकाने भारतातील उद्योग क्षेत्रातील सर्वाधिक प्रभावशाली महिला म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांची निवड केली. 
 • स्टेट बँक, HDFC बँक आणि Axis बँक या तीन बँकांनी एटीएमच्या मोफत वापरावर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • त्यानुसार सहा महानगरातील (मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, बेंगळूरू, हैद्राबाद) ग्राहकांना आपल्याच बँकेच्या एटीएमवरून दरमहा पाच तर अन्य बँकांच्या एटीएमवरून तीन व्यवहार मोफत करता येतील. 
  • त्यानंतरच्या प्रत्येक कॅश ट्रांझॅक्शनसाठी २० रुपये तर नॉन कॅश ट्रांझॅक्शनसाठी ८.५ रु. (HDFC  बँक)/ ९ रु. (स्टेट बँक) /९.५ रु (Axis बँक) आकारण्यात येतील.