चालू घडामोडी - २१ व २२ डिसेंबर २०१४

·        २२ डिसेंबर : राष्ट्रीय गणित दिवस (महान भारतीय गणिती रामानुज यांचा जन्मदिवस)

·        राजिंदर खन्ना यांची रॉचे (RAW) नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

·        प्रकाश मिश्रा यांची सीआरपीएफच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

·        राष्ट्रीय संरक्षण कायदा २०१५ नुसार अमेरिकेच्या ५७८ अब्ज डॉलर्सच्या संरक्षण खर्चाला मंजुरी दिली. त्यातून एक अब्ज डॉलर्सची मदत पाकिस्तानला दिली जाणार आहे.

·        अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैन्याला पाकिस्तानने दिलेल्या मदतीच्या बदल्यात हे अनुदान देण्यात येणार आहे.

·        हा निधी देताना अमेरिकेने पाकिस्तानसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यात दहशतवादी संघटनांच्या विरोधात पाकिस्तानने कारवाई करायची आहे.

·        कोकण रेल्वेमार्गावरील अपघात टाळण्यासाठी आणि प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गाचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.

·        ‘आयआरसीटीसी’च्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये (स्पेशल ट्रेन) विद्यार्थ्यांसाठी तिकिट दरात ६० टक्के सूट मिळणार आहे.

·        ही सुविधा फक्त स्लीपर कोचमध्ये दिली जाणार आहे. ही योजना एक वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आली आहे.

·        याशिवाय नवीन वर्षात राजधानीससह शताब्दी और दूरंतो एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना वाय-फाय (Wi-Fi) सुविधा मिळणार आहे. प्रवास करताना प्रवाशांना स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टॅबलेटवर उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल.

·        मुंबई महापालिकेच्या वतीने क्षयरोग नियंत्रण जनजागृती मोहीम हाती घेण्याचे ठरवले असून, यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड केली आहे.

·        मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी तयार केलेला ‘अर्धवार्षिक आर्थिक विश्लेषण २०१४-१५’ हा अहवाल  संसदेत मांडण्यात आला. महागाईच्या दरातील घसरण ही विकासासाठी पूरक असून येत्या काही वर्षात देशाच्या आर्थिक विकासाचा दर ७-८ टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तवतानाच कच्च्या तेलाच्या किमतीतील घटीने चालू खात्यातील तूट जीडीपीच्या २ टक्क्यांच्या आसपास राहील, असा अंदाज यात वर्तवण्यात आला

·        गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विकासाचा दर सुधारून तो ५.५ टक्क्यांवर जाईल. गेल्या दोन सलग वर्षामध्ये विकासदराने पाच टक्क्यांच्या खालची पातळी गाठली होती. त्या पार्श्वभूमीवर हा अंदाज दिलासादायी आहे.

·        २००५ पूर्वी बनवलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा १ जानेवारी २०१५ पासून या व्यवहारात चालणार नाहीत, असे रिझव्‍‌र्ह बॅँकेने स्पष्ट केले आहे.

·        टाटा समूहाची सिंगापूर एअरलाइन्ससह भागीदारीने स्थापित झालेली प्रवासी हवाई वाहतूक सेवा ‘विस्तार’ची येत्या ९ जानेवारी २०१५ पासून नियमित उड्डाणे सुरू होतील.

·        सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेने तिचा राष्ट्रीय शेअर बाजारातील (एनएसई) ५ टक्के हिस्सा विकून १००० कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

·        या माध्यमातून बँक देशातील सर्वात मोठय़ा भांडवली बाजारातून बाहेर पडत आहे.

·        बाजार मंचावर बँकेसह भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) (१०.५१%), स्टेट बँक (१०.१९%), आयएफसीआय (५.५५%) व आयडीएफसी (५.३३%) हे बडे भागीदार आहेत.

·        मराठी भाषेचा सन्मान आणि आदर म्हणून “बॉम्बे हायकोर्ट”चे “महाराष्ट्र आणि गोवा न्यायालय” असे नामकरण करा, अशी स्पष्ट शिफारस मराठी भाषा सल्लागार समितीने राज्य सरकारला केली आहे.

·        महाराष्ट्राचे पुढील २५ वर्षांतील मराठी भाषेचे धोरण ठरविण्यासाठी ही सल्लागार समिती नेमण्यात आली होती. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचा मसुदा राज्य सरकारने सूचना, हरकती, अभिप्राय यासाठी प्रसिद्ध केला आहे.

·        या मसुद्यात समितीने मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्याच्या दृष्टीने अनेक काटेकोर शिफारशी केल्या आहेत. यामध्ये बॉम्बे हायकोर्टच्या नामकरणाचीही शिफारस केली आहे.

·        भारतीय वंशाचे अमेरिकन हॉटेल उद्योजक संतसिंग चटवाल यांना न्यायालयाने तीन वर्षे सक्‍तीची समाजसेवा करण्याचे आदेश देत पाच लाख अमेरिकी डॉलरचा दंड ठोठावला आहे. चटवाल यांच्यावर हजारो डॉलरचा निधी राजकीय मोहिमेसाठी दिल्याचा आरोप आहे.

·        चार वर्षानंतर सिलीगुडी जंक्शन ते दार्जिलिंगपर्यंत टॉय ट्रेन धावणार. २०१० मध्ये भूस्खलन झाल्याने  टॉय ट्रेन बंद पडली होती.

·        व्यवसायासाठी सर्वोत्तम असलेल्या देशांची यादी ‘फोर्ब्स’ने जाहीर केली आहे. या यादीत भारत ९३व्या क्रमांकावर आहे.

·        १४६ देशांच्या या यादीत मेक्सिको, कझाकिस्तान आणि श्रीलंका यांसारख्या छोटय़ा देशांनी भारताला मागे टाकले आहे.

·        फोर्ब्सची व्यवसायासाठी सर्वोत्तम असलेल्या देशांची ९वी वार्षिक यादी असून यात डेन्मार्कने पहिले स्थान मिळवले आहे.

·        यानंतर हाँगकाँग, न्यूझीलंड, आर्यलड आणि स्वीडन या देशांनी स्थान मिळवले आहे.

·        अमेरिकेचीही या यादीत चार स्थानांनी घसरण झाली असून १८वे स्थान मिळवले आहे.

·        इंडियन सुपर लीग २०१४

·        सौरव गांगुलीचा संघ ठरला पहिला विजेता.

·        सौरव गांगुलीच्या अॅटलेटिको डी कोलकाता संघाने पहिल्यावहिल्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. त्यांनी सचिन तेंडुलकरच्या केरळ ब्लास्टर्स या संघावर १-० अशी मात करून विजेतेपदाचे ८ कोटींचे इनामही  जिंकले.

·        नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मोहम्मद रफिकने अखेरच्या ‌मिनिटांत गोल करून कोलकाता संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

·        भारतीय पुरुष संघाने सलग पाचव्यांदा तर भारतीय महिला संघाने सलग चौथ्यांदा कब्बडी विश्वचषक  जिंकला.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा