चालू घडामोडी - २ डिसेंबर २०१४

·        २ डिसेंबर – राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस व जागतिक संगणक साक्षरता दिन

·        संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) हवामान परिषदेसाठी सोमवारी भारतासह १९० देशांचे प्रतिनिधी लीमा (पेरू) येथे गोळा झाले असून जागतिक कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीच्या नव्या महत्त्वाकांक्षी आणि बंधनकारक करारावर ते वाटाघाटी करणार आहेत.

·        पुढील वर्षी पॅरिसमध्ये स्वीकारण्यात येणाऱ्या या ऐतिहासिक करारावर सर्वसंमती घडवून आणण्याची अखेरची संधी म्हणून या वाटाघाटींकडे पाहिले जाते. हा करार २०२०मध्ये अमलात येणार आहे.

·        १२ दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये भारताचे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हे भारताच्या १७ सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत आहेत.

·        भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन २५ डिसेंबर 'सुप्रशासन दिन' म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

·        सरकारी, निमसरकारी आस्थापने व अनुदानित संस्थांमध्ये सर्व स्तरांपर्यंतच्या बढत्यांमध्ये मागासवर्गीय समाजासाठी ५२ टक्के पदे आरक्षित ठेवण्याचा राज्य सरकारने १० वर्षांपूर्वी केलेला कायदा आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काढलेला शासन निर्णय (जीआर) महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) घटनाबाह्य ठरवून रद्द केला आहे.

·        नॅको आणि पिरामल स्वास्थ्य यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय एड्स हेल्पलाइन १९७ सुरू केली आहे.

·        भाषा सल्लागार समितीने तयार केलेल्या मराठी भाषाविषयक धोरणाचा मसुदा शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

·        यासंदर्भातील सूचना, सुधारणा, हरकती, अभिप्राय १५ डिसेंबरपर्यंत मराठी भाषा विभाग, नवीन प्रशासन भवन, आठवा मजला, मंत्रालय, मुंबई ४०००३२ किंवा marathibhasha.dhoran@gmail.com या ई - पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

·        गेली पाच दशकं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविलेले, धडाडीचे प्रशासक आणि एक द्रष्टा मुख्यमंत्री म्हणून नावलौकिक मिळविलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅरिस्टर अब्दुल रहेमान तथा ए. आर. अंतुले (८५) यांचे मंगळवारी सकाळी ब्रीच कँडी इस्पितळात किडनीच्या आजाराने निधन झाले.

·        जन्म - आंबेत, जि.रायगड येथे ९ फेब्रुवारी १९२९.

·        महाराष्ट्राचे पहिले मुस्लीम मुख्यमंत्री

·        राजकीय कारकिर्द - तरुण वयातच काँग्रेसचे सदस्य.

·        १९६२ ते १९७६ श्रीवर्धनचे आमदार. याच काळात १९६९ मध्ये वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात सर्वप्रथम राज्यमंत्री.

·        १९७२ मध्ये कॅबिनेट मंत्री.

·        १९७६ ते १९८ राज्यसभा सदस्य.

·        १९८५ ते १९८९ पुन्हा विधानसभेवर निवड.

·        १९९५ ते ९६ - केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री.

·        १९८० श्रीवर्धनमधून विधानसभेवर.

·        १९८९ कुलाबामधून लोकसभेवर निवड.

·        १९९६ मध्ये पुन्हा लोकसभेवर निवड.

·        जून १९८ ते जानेवारी १९८२ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.  सिमेंट घोटाळ्यात नाव अडकल्यामुळे राजीनामा द्यावा लागला.

·        १९९१ मध्ये रायगडमधून लोकसभेवर निवड.

·        २००४ मध्ये पुन्हा लोकसभेवर निवड. युपीए-१ सरकारमध्ये अल्पसंख्यांक विकास मंत्री. या शिवाय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही कार्य केले.

·        ००९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर सक्रिय राजकारणापासून दूर.

·        हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेते देवेन वर्मा (७८) यांचे निधन झाले.

·        जन्म २३ ऑक्टोबर १९३७ रोजी मुंबईत झाला होता.

·        बी.आर.चोप्रा यांच्या “धर्मपूत्र या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

·        देवेन वर्मा यांनी रमेश देव यांच्यासोबत 'दोस्त असावा तर असा' या मराठी चित्रपटात अभिनय केला होता. 'आदमी सडक का' या हिंदी चित्रपटावरून हा मराठी चित्रपट बनवला गेला होता.

·        'मेरे यार की शादी' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

·        देवेन यांना 'चोरी मेरा काम', 'चोर के घर चोर' आणि 'अंगूर' या चित्रपटांतील भूमिकांसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले होते.

·        कोणताही अंगविक्षेप आणि अश्लीलतेचा आधार न घेता दर्जेदार अभिनयाद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणं हे वर्मा यांचे वैशिष्ट्य होतं. त्यांनी स्वतःचा प्रॉडक्शन हाऊस सुरु करत काही चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं होतं.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा