चालू घडामोडी - ७ जानेवारी २०१५

·        ७ जानेवारी : युवा भारतीय प्रवासी दिन.
·        इंडियन सायन्स काँग्रेसला तिच्या  ‘इस्का’ (इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन) या मातृसंस्थेच्या तावडीतून मुक्त करण्याची मागणी मुंबईत सध्या सुरू असलेल्या सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव निमसे यांनी केली आहे.
·        नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी आपल्याकडील नोबेल शांतता पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सुपूर्द करत राष्ट्राला अर्पण केला.
·        अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे देशांतर्गत धोरणविषयक सल्लागार म्हणून भूमिका निभावलेले मार्टिन अँडरसन यांचे नुकतेच निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. रेगन यांच्या जीवनाविषयी माहिती देणारी अनेक पुस्तके अँडरसन यांनी लिहिली आहेत.
·        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या १७५व्या जयंतीनिमित्त नाणी जारी केली.
·        जमशेदजी टाटा यांना आधुनिक भारतीय उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाते.
·        पंतप्रधानांनी १०० व ५ रुपयांच्या नाण्यांचे अनावरण केले.
·        केंद्र सरकारकडून अशा प्रकारचा सन्मान दिले जाणारे ते पहिले उद्योगपती ठरतील.
·        सरकारने १९५८ आणि १९६५ मध्ये जमशेदजी टाटा यांच्या सन्मानार्थ पोस्ट तिकीट प्रसिद्ध केले होते.
·        आजवरचा विचार करता खालील महनीय व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ नाणी जारी करण्यात आली आहेत.
Jamshedji Tata
१.    डॉ.राजेन्द्रप्रसाद
२.    जवाहरलाल नेहरू
३.    इंदिरा गांधी
४.    राजीव गांधी
५.    लाल बहादूर शास्त्री
६.    होमी भाभा
७.    लोकमान्य टिळक
८.    मदर टेरेसा
९.    भगत सिंग
१०.      रवींद्रनाथ टागोर
११.      सी.नटराजन अण्णादुराई - तामीळनाडू चे माजी मुख्यमंत्री
१२.      चिदंबरम सुब्रमण्यम- स्वातंत्र्य सैनिक, माजी केंद्रीय मंत्री
१३.      लुईस ब्रेल-अंधांसाठी ब्रेल लिपी शोधणारे - आजवर भारतीय नाण्यावर प्रतिमा असलेले एकमेव भारतीय नसलेली व्यक्ती
·        रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवू पाहणारे काँग्रेस नेते निलेश राणे आणि त्यांच्या ५० कार्यकर्त्यांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
·        राज्य सरकारकडून “घर तिथे शौचालय” हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे.
·        या उपक्रमात प्रती शौचालय बांधणीसाठी १२ हजार रुपये निधी दिला जाणार आहे.
·        राज्यातील सर्व विद्यापीठांवरील परीक्षांचा ताण कमी करण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली “विद्यापीठ परीक्षा मंडळ” स्थापन करून विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी सरकार विचार करीत आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
·        हे मंडळ अस्तित्वात आल्यास राज्यात सर्वच विद्यापीठामध्ये एकाच दिवशी एकाच विषयाची परीक्षा घेणे शक्य होईल.
·        गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्याच विमानाला पुन्हा टार्गेट करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याचे दिसून येत आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अॅलर्टनंतर दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा वाढवली.
·        याआधी १९९९मध्ये दहशतवाद्यांनी कंदहारला जाणारे आयसी ८१४या विमानाचे अपहरण केले होते. 
·        राजस्थान सरकारने रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीसोबत झालेले जमीनीचे करार रद्द करून जमीन परत आपल्या ताब्यात घेतली आहे.
·        स्वयंपाकाच्या गॅसचे सरकारी अनुदान नव्या वर्षांच्या पहिल्या दिवसापासून देशभरात लाभार्थीच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.
·        पहिल्या टप्प्यात देशातील ५४ जिल्ह्य़ांमध्ये ही योजना राबविल्यानंतर आता १ जानेवारीपासून ती उर्वरित ६२२ जिल्ह्य़ांमध्येही अंमलात येणार आहे.
·        ‘थेट लाभार्थी हस्तांतरण योजनें’तर्गत राबविण्यात येणारी ही प्रक्रिया ‘पहल’ (प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ) नावाने ओळखली जाणार आहे. १५ नोव्हेंबर २०१४ पासून सुरू झालेल्या या योजनेशी आतापर्यंत निम्मेच (४३ टक्के) ग्राहक जोडले गेले आहेत.
·        आधार क्रमांक व त्याच्याशी संलग्न असलेल्या बँक खात्यात सरकारमार्फत प्रति सिलिंडर (१४.२ किलो ग्रॅम) ५६८ रुपये लाभार्थीसाठी थेट जमा होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा