चालू घडामोडी - ८ जानेवारी २०१५

·        ८ जानेवारी : गॅलेलियो गॅलिली स्मृतीदिन (इटालियन गणितज्ञ, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ).
·        भाजप खासदार साक्षी महाराज यांनी ‘घर वापसीचे समर्थन करतानाच हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्रत्येक हिंदू महिलेने किमान चार मुलांना जन्म द्यायलाच हवा’,असं मत मांडून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
·        ‘तुरुंगातील कैद्यांना संततीप्राप्तीसाठी त्यांच्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार आहे,’ असं निर्वाळा पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयानं दिला आहे.
·        मात्र, असं स्वातंत्र्य कोणत्या प्रकारच्या कैद्यांना आणि कोणत्या निकषावर द्यायचं हे ठरविण्याचा अधिकार सर्वस्वी राज्य सरकारांचा आहे,’ असंही स्पष्ट केलं आहे.
·        कोळसा खाणींच्या खासगीकरणाच्याCoal India Ltd. विरोधात देशातील प्रमुख पाच कामगार संघटनांनी एकत्रित येऊन संप सुरु केला. संप असाच कायम राहिला तर, देशात विजेचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
·        केंद्रीय ऊर्जामंत्री : पियुष गोयल
·        पाकिस्तानकडून काश्मीरवर होत असलेले हल्ले पाहता जम्मू-काश्मीरसाठी पूर्ण वेळ प्रशासनाची गरज असल्याचे सांगून माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी त्यांच्याकडे असलेल्या काळजीवाहू सरकारच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
·        गुजरातमध्ये होणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या भव्य स्मारकासाठी भारतीय वंशाच्या अमेरिकेतील डॉ. इंद्रजित पटेल यांनी पुढाकार घेतला आहे.
·        पटेल यांच्या स्मारकासाठी २ लाख ५० हजार अमेरिकी डॉलर जमा करण्याचे उद्दिष्ट पटेल यांनी ठेवले आहे.
·        तिरकस आणि व्यंगात्मक लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले फ्रान्समधील ‘चार्ली हेब्डो’ साप्ताहिक दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरले.
·        ‘आयसिस’च्या दहशतवाद्यांनीCharlie Hebdo ‘चार्ली हेब्डो’ मुख्यालयावर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १२ जण ठार तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये साप्ताहिकाचे संपादक स्टिफन शार्बोनियर यांच्यासह ४ व्यंगचित्रकार, ६ पत्रकार व २ पोलिसांचा समावेश आहे.
·        थेट आणि धर्मांच्या सीमांपलिकडे विचार मांडणारे साप्ताहिक म्हणून त्याची ओळख आहे. कार्टुन्स, वादविवाद, वेगवेगळ्या विषयांवरील तपशीलवार अहवाल, विनोद आदींचा त्यात समावेश असतो.
·        निधर्मी आणि कडव्या डाव्या विचारसरणीच्या लेखनामुळे इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, उजवी विचारसरणी, राजकारण, संस्कृती आदींवर या साप्ताहिकामध्ये प्रामुख्याने भाष्य होते.
·        १९६९ ते १९८१ या कालावधीमध्ये हे साप्ताहिक पहिल्यांदा सुरू झाले होते. त्यानंतर ते बंद करण्यात आले. मात्र, १९९२ मध्ये ते नव्याने सुरू झाले.
·        २ नोव्हेंबर २०११ला या साप्ताहिकाच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला झाला होता.
·        साप्ताहिकाचे ब्रीदवाक्य - आम्हाला कट्टरपंथीयांचे हसू येते. ते मुस्लिम असो, ज्यू किंवा कॅथलिक... धार्मिक असणे गैर नाही, पण कट्टर विचार आणि तशीच कृती आम्हाला मान्य नाही...
·        शेवटचे ‘ट्विट’ आणि हल्ला - या कार्यालयावर हल्ला होण्याआधी ‘चार्ली हेब्डो’ साप्ताहिकाकडून एक कार्टून ट्विट करण्यात आले होते. तेही इस्लामी दहशतवादाशी संबंधित होते. आयएसआयएस दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अल बगदादी नववर्षाच्या शुभेच्छा देत असल्याचे हे उपहासात्मक कार्टून होते.
·        वाढत्या दहशतवादी धोक्याचे कारण देत पाकिस्तानने दिल्लीवरून लाहोरपर्यंत धावणारी भारत-पाकिस्तानमधील दोस्ती  बससेवा वाघा बॉर्डरपर्यंतच अडवण्याचा निर्णय घेतला आहे.
·        १६ मार्च, १९९९ रोजी दोस्ती बससेवा सुरू करण्यात आली होती.
·        महाराष्ट्रातील वनसंपदेची संपूर्ण माहिती www.abhayaranya.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
·        महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्ये, इतर वन्य प्रकल्प, तेथील इतिहास, आदिवासी, पर्यावरण, प्राणीजगत, संस्कृती, साहित्य आदींविषयीचे लेख या वेबसाइटवर सापडतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा