चालू घडामोडी - १२ जानेवारी २०१५

·        १२ जानेवारी : राष्ट्रीय युवा दिन (स्वामी विवेकानंद जयंती)
·        १२ जानेवारी १५९८ : जिजाबाई शहाजी भोसले (बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड येथे जन्म)
·        ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अहमदाबादच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक ए. एस. किरण कुमार यांची इस्रोच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
·        इस्रोप्रमुख हे अवकाश विभागाचे सचिवही असतात. पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
·        कुमार यांना यापूर्वी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
·        न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार सिन्हा बांग्लादेशचे नवे सरन्यायाधीश बनले असून त्यांच्या रुपाने बांग्लादेश या मुस्लिम राष्ट्रात प्रथमच एकाSurendra Kumar Sinha हिंदू व्यक्तीला न्यायपालिकेतील सर्वोच्च स्थान मिळाले आहे. राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हमिद यांनी सिन्हा यांची नियुक्ती जाहीर केली..
·        ६४ वर्षीय सिन्हा बांग्लादेशचे २१ वे सरन्यायाधीश ठरणार आहेत.
·        बांग्लादेशात सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय ६७ असून त्यानुसार आणखी तीन वर्षे सिन्हा या पदावर राहू शकणार आहेत.
·        दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरलेली पेशावरमधील लष्करी शाळा पुन्हा सुरू झाली. वाढवण्यात आलेल्या १२ दिवसांच्या हिवाळी सुटीनंतर अन्य शाळाही सुरू झाल्या. पेशावरमधील लष्करी शाळेला पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी पत्नीसह भेट दिली.
·        इन्फोसिसचे सहसंस्थापक एस. गोपालकृष्णन यांच्या पत्नी सुधा गोपालकृष्णन या कंपनीच्या सर्वांत मोठ्या वैयक्तिक प्रवर्तक भागधारक ठरल्या आहेत.
·        देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी सॉफ्टवेअर निर्माती कंपनी असणाऱ्या ‘इन्फी’मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर २०१४ या तिमाहीअखेर त्यांचा २.१४ टक्के हिस्सा राहिला आहे.
·        बँक ठेवीदारांना साक्षर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा साक्षर फंड अस्तित्वात आला असून एनजीओ वा अन्य संस्थांना बँकविषयक साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्याचा वापर करता येणार आहे.
·        ना नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्था, धर्मदाय संस्था, युनिव्हर्सिटीजना रिझर्व्ह बँक अर्थसाह्य करेल. या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे मध्यवर्ती बँकेकडून जारी करण्यात आली आहेत.
·        दहा वर्षे वा जास्त काळ न वापरलेल्या खात्यातील पैसे या फंडात जमा करण्याची सूचना बँकांना देण्यात आली आहे. खातेदार पैसे मागण्यासाठी आला तर त्याचे पैसे परत केले जाणार आहेत.
·        हे पैसे निव्वळ पडून राहू नयेत, त्याचा ठेवीदारांच्या जागृतीसाठी वापर व्हावा याउद्देशाने रिझर्व्ह बँकेने हा फंड तयार केला आहे.
·         देशातील तसेच विदेशातील नामवंत आणि आघाडीच्या उद्योगपतींच्या मांदियाळीमध्ये सुरू झालेल्या ‘व्हायब्रंट गुजरात’ या गुंतवणूकदारांच्या कुंभमेळ्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आगामी १२ ते १८ महिन्यांमध्ये गुजरातमध्ये एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करीत असल्याचे जाहीर केले.
·        गुजरातमध्ये प्रस्तावित गुंतवणूक -
·        रिलायन्स  - १ लाख कोटी
·        बिर्ला - २० हजार कोटी
·        अदानी-सनएडिसन - २५ हजार कोटी
·        मारुती - चार हजार कोटी
·        कल्याणी - ६०० कोटी
·        एका मागून एक विक्रम रचणारा स्वित्झर्लंडच्या सुपरस्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याने ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेतील विजेतेपदासह आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील १००० वा विजय साजरा केला. अंतिम लढतीत फेडररने कॅनडाच्या मिलॉस रॉनिकवर ६-४, ६-७ (२), ६-४ अशी मात केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा