चालू घडामोडी - १६ जानेवारी २०१५

·        १६ जानेवारी १९०१ : महादेव रानडे पुण्यतिथी
·        आपल्या कठोरKiran Bedi प्रशासकीय कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला पोलिस आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
·        अण्णा हजारे यांच्या ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’मधील अरविंद केजरीवाल यांच्या तुल्यबळ सहकारी ठरलेल्या बेदी आता केजरीवाल यांनाच आव्हान देण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
·        सेन्सॉर बोर्डाने अडवलेल्या ‘एमएसजी: मेसेंजर ऑफ गॉड’ या वादग्रस्तMessenger of God चित्रपटाच्या प्रदर्शनाला चित्रपट लवादानं (फिल्म सर्टिफिकेशन अपिलेट ट्रायब्युनल) मान्यता दिल्यानं संतापलेल्या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांनी राजीनामा दिला.
·        सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून हस्तक्षेप आणि दबाव आणला जात असल्याचा आरोप सॅमसन यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात केला आहे.
·        डेरा सच्चा सौदा या कथित अध्यात्मिक संस्थानाचे प्रमुख व स्वयंघोषित संत गुरमीत रामरहीम सिंग इन्सान यांनी ‘एमएसजी’ हा चित्रपट बनवला आहे. स्वत: राम-रहीम यांची यात प्रमुख भूमिका आहे. रामरहीम देव असल्याचा प्रचार तसेच अनेक चमत्काराची पेरणी चित्रपटात असल्यानं सेन्सॉर बोर्डानं त्यास आक्षेप घेतला होता.
·        हा चित्रपट अंधश्रद्धा पसरवतो तसंच त्यामुळं धार्मिक भावना भडकू शकतात, असं मत नोंदवत बोर्डानं हा चित्रपट लवादाकडं पाठवला होता.
·        चित्रपट लवादानं एमएसजीला हिरवा कंदील दिल्याचे वृत्त असले तरी पंजाबमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर अघोषित बंदी घालण्यात आली आहे.
·        ‘आम आदमी पार्टी’ च्या स्थापनेपासून अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या शाझिया इल्मी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
·        शाझिया इल्मींसोबत संगीतकार आनंद राज आनंद यांनीही भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे.
·        मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांचा मुकाबला करताना शहीद झालेले सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांची कन्या भारती हिची शासनाने उप-जिल्हाधिकारी गट अ पदावर नियुक्ती केली आहे.
·        अजमल कसाब या क्रूरकम्र्यास तुकाराम ओंबळे यांनी पकडले होते.
·        तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कुटुंबांतील सदस्यास शासकीय नोकरी देण्याची घोषणा केली होती.
·        विधानसभा सदस्यांना स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत ५० लाख रुपयांचा विशेष निधी देण्याचा निर्णय वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.
·        मावळत्या सरकारने जाता जाता सर्व २८८ आमदारांना प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी देऊ केला होता. त्याव्यतिरिक्त हे ५० लाख दिले जाणार आहेत. यामुळे सरकारच्या तिजोरीवर १४४ कोटींचा बोजा पडणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा