चालू घडामोडी - १५ फेब्रुवारी २०१५

·        प्रसिद्ध दिग्दर्शक नागेश कुकनूरDhanak- Nagesh Kukunur Movie याच्या “धनक” या कलाकृतीस ६५ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील सर्वोत्कृष्ट “फीचरलेंथ” चित्रपटासाठीचा ग्रॅंड प्रिक्‍स पुरस्कार मिळाला आहे. याचबरोबर महोत्सवामधील किड्‌स ज्युरींनीही धनकचा विशेष उल्लेख केला.
·        “धनक”च्या केंद्रस्थानी एका सुंदर गावामधील १० वर्षांची ‘परी’ व तिचा आठवर्षीय धाकटा भाऊ ‘छोटु’ ही पात्रे आहेत. यामधील परीची भूमिका हेतल गडा हिने, तर छोटुचे पात्र क्रिश छाब्रिया याने साकारले होते. कुकनूर याने स्वत: यासंदर्भातील माहिती ट्‌विटरवरुन दिली.
·        जफर पनाही या इराणच्या प्रसिद्ध दिग्दर्शकास या वर्षीच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील सर्वोच्च गोल्डन बेअर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘टॅक्‍सी’ या चित्रपटासाठी पनाही यांना हा पुरस्कार देण्यात आला.
·        पनाही यांना “इराणमधील सत्तेविरोधात प्रचार केल्याच्या” आरोपांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. पनाही यांच्यावर २०१० मध्ये चित्रपट बनविण्यासंदर्भात २० वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही पनाही यांनी चित्रपट बनविणे सोडलेले नाही.
·        चिलीचे दिग्दर्शक पाब्लो लॅरेन यांना ‘द क्‍लब’ या चित्रपटासाठी सिल्व्हर बेअर या महोत्सवामधील द्वितीय सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले.
·        अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटनेने आफ्रिकेतील लीबिया येथील सिर्ते शहरामधील रेडिओ व दूरचित्रवाणी (टीव्ही) स्थानकांवर ताबा मिळविला आहे.
·        बेंगाझी येथील अमेरिकेच्या दूतावासावर २०१२ मध्ये केलेल्या हल्ल्यानंतर ही दहशतवादी संघटना सर्वप्रथम प्रकाशझोतात आली होती.
·        उत्तर प्रदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (आरएसएस) चार दिवसीय मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
·        या बैठकीत दिल्ली निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या पराभवाबद्दल चर्चा होणार असून भविष्यातील वाटचालीसाठी संस्थात्मक धोरणही ठरविण्यात येणार आहे.
·        आरएसएस प्रमुख : मोहन भागवत
·        कोळसा खाणींच्या आज झालेल्या पहिल्या ई-लिलावाद्वारे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स सिमेंट कंपनीने पहिली खाण ७९८ कोटी रुपयांना आपल्या ताब्यात घेतली.
·        मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात असलेली सियाल घोगरी ही खाण ई-लिलावात घेतली. या खाणीमध्ये २९.३८ अब्ज टन कोळशाचा साठा आहे.
·        सर्वोच्च न्यायालयाने २०४ खाणींच्या लिलावाला मंजुरी दिल्यानंतर सरकारने पहिल्या टप्प्यात १९ खाणींचा लिलाव करणार असल्याचे जाहीर केले होते.
·        या लिलावातून मिळणाऱ्या पैशाचा विनियोग विशेषत: ईशान्यकडील राज्यांचा विकास करण्यासाठी केला जाणार आहे.
·        केंद्रीय कोळसा आणि ऊर्जा मंत्री : पीयूष गोयल
·        नौदलाच्या आयएनएस कोलकता या विनाशिकेवरून भारताने “ब्राह्मोस” या स्वनातीत क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राचा पल्ला २९० किलोमीटरचा आहे.
·        २०१५ विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टिव्हन फिनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रीक घेण्याची कामगिरी केली आहे.
·        मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामन्यात फिनने हॅट्ट्रीकसह पाच बळी घेतले.
·        विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात हॅट्ट्रीक नोंदविणारा फिन इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. विश्वकरंडक स्पर्धांत हॅट्ट्रीक नोंदविणारा फिन जगातील सातवा गोलंदाज आहे.
·        internet.org अॅपची सुविधा मिळवणारा भारत हा आशियातील पहिला देश ठरला.

1 टिप्पणी: