चालू घडामोडी - २७ जानेवारी २०१५

·        २७ जानेवारी १९६७ : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ स्थापना
·        आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंग्यचित्रकार... “कॉमन मॅन”च्या दबलेल्या भावना आपल्या चित्रांतून प्रभावीपणे व्यक्तR. K. Laxman करणारे संवेदनशील, मार्मिक भाष्यकार... रेषांबरोबरच शब्दांवरही तितकेच प्रेम करणारे लेखक आर. के. लक्ष्मण (वय ९४) यांचे दीर्घ आजारामुळे २६ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
·        रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण असे ‘आरके’ यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म २३ ऑक्‍टोबर १९२४ रोजी म्हैसूर येथे झाला. वडील म्हैसूर येथील शाळेत मुख्याध्यापक होते.
·        सर्वसामान्यांच्या वेदना, त्यांची भावना ‘आरके’ अचूकपणे टिपत. या निरीक्षणातूनच पुढे त्यांनी चितारलेला “कॉमन मॅन” प्रचंड गाजला. चौकड्याचा कोट, पांढरे धोतर असा साधाच त्याचा पोशाख. पण घटनांचे अचूक टिपण या चित्रात असतं. त्यामुळे त्यांची व्यंग्यचित्रे सहजच लक्षात राहत असत. आसपासच्या घटना मिस्कीलपणे दाखवीत असल्याने त्यांची चित्रे खास ठरली.
·        त्यांनी आजवर असंख्य व्यंग्यचित्रे रेखाटली; पण कधीही या माध्यमातून कोणास दुखावले नाही किंवा कोणाच्या व्यंगावर चित्रे काढली नाहीत. त्यांच्या व्यंग्यचित्रांत प्रांजळपणाचेही दर्शन घडायचे. त्यांचा हा “कॉमन मॅन” गेल्या साठ वर्षांतील देशातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक घडामोडींचा-उलथापालथीचा साक्षीदार ठरला.
·        भारतीय हवाई दलाचे “मिग-२७” विमान राजस्थानमधील बारमेरजवळ कोसळले. सुदैवाने या विमानाचा वैमानिक तातडीने बाहेर पडल्याने त्याचे प्राण बचावले. सध्या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष शोधण्याचे काम सुरू आहे.
·        या विमानाने जोधपूरमधील विमानतळावरून उत्तरलाईच्या दिशेने झेप घेताच काही क्षणांत ते कोसळले. लष्करी अधिकाऱ्यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.
·        इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेस उत्तर सीरियामधील कोबेन या महत्त्वपूर्ण शहरामधून मागे हटविण्यात कुर्दिश फौजांना यश आले आहे. अमेरिका व इसिसविरोधी फौजांनी या शहराच्या ९०% भागावर नियंत्रण मिळविले आहे.
·        क्षिण स्पेनमध्ये नाटो सैन्याच्या प्रशिक्षण तळावर ग्रीक बनावटीचे एफ-१६ हे फायटर जेट विमान कोसळून झालेल्या अपघातात १० सैनिक ठार, तर २१ जण जखमी झाले.
·        स्पेनचे पंतप्रधान : मारियानो रजॉय
·        फेसबुकचा सर्व्हर २७ जानेवारी रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास बंद पडला होता. यामुळे अमेरिका व आशिया खंडामध्ये फेसबुकची सेवा ठप्प झाली होती.
·        फेसबुकची सेवा बंद झाल्याची चर्चा व्हॉट्‌सऍप व ट्‌विटरवर नेटिझन्स करत होते. एक तासानंतर ही सेवा पूर्ववत झाली. या काळामध्ये इंस्टाग्रामची सेवा सुद्धा बंद होती.
·        पाकिस्तानमध्ये झिशान मोहम्मद या अठरा वर्षीय क्रिकेटपटूचा छातीवर चेंडू लागून मृत्यू झाला आहे.
·        भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान झालेल्या व्यापार शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकी बँकांकडून भारताला अब्ज डॉलर्सपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतातील क्षमता विकसित होण्यास मदत होईल असे त्यांचे मत आहे.
·        देशातील नियोजन आयोगाच्या ऐवजी स्थापन करण्यात आलेल्या नीती आयोगाची पहिली बैठक येत्या फेब्रुवारी रोजी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बैठकीस संबोधित करणार आहेत.
·        पंतप्रधानांकडून या आयोगाच्या भविष्यातील धोरणाविषयी निश्‍चित मार्गदर्शन यावेळी केले जाईल.
·        जपानी मोटारउत्पादक कंपनी सुझुकी मोटार कार्पोरेशन (एसएमसी) गुजरातमधील हंसलपूरमध्ये चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार आहे.
·        गुजरात राज्य सरकारने या प्रकल्पासाठी सातशे एकर जागा उपलब्ध करून दिली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा