चालू घडामोडी - २० फेब्रुवारी २०१५

·        २० फेब्रुवारी : बिपिनचंद्र पाल पुण्यतिथी
·        देशात कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या प्रमुख ११ सेवा केंद्र सरकारने ई-बिझ पोर्टलद्वारे ऑनलाइन सुरू केल्या आहेत.
·        वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील औद्योगिक धोरण आणि संवर्धन खात्याने सुरू केलेल्या या सेवांचे उद्‌घाटन अर्थमंत्री अरुण जेटली, वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन, श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांच्या उपस्थितीत झाले.
·        आठवड्यातील सातही दिवस आणि २४ तास या सेवा ऑनलाइन सुरू राहणार असल्याने उद्योजकांना त्याचा फायदा मिळेल.
·        “ई-बिझ” पोर्टल प्रशासन ते व्यवसाय (गव्हर्नमेंट टू बिझनेस) या संकल्पनेवर आधारित इन्फोसिस आणि सरकारच्या राष्ट्रीय स्मार्ट सरकार संस्थांच्या खासगी-सार्वजनिक भागीदारीतून दहा वर्षांच्या कालावधीसाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
·        यातील पहिली तीन वर्षे पथदर्शी (पायलट) टप्प्यासाठी असतील, तर उर्वरित सात वर्षांमध्ये विस्तारीकरण केले जाणार आहे. पायलट टप्प्यामध्ये ५० सेवा दहा राज्यांमध्ये कार्यान्वित केली जातील. त्यात २६ केंद्रीय तर २४ राज्यस्तरीय सेवांचा समावेश आहे.
·        आंध्र प्रदेश, दिल्ली, हरियाना, महाराष्ट्र, तमिळनाडू, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांचा पायलट राज्यांमध्ये समावेश आहे.
·        “ई-बिझ” पोर्टल कशासाठी?
·        उद्योग, व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असलेल्या कोणालाही संबंधित मंत्रालयाकडे किंवा खात्याकडे या पोर्टलमार्फत अर्ज जमा करता येईल. त्याचप्रमाणे शुल्क भरता येईल. शिवाय ऑनलाइन परमिट, लायसन्सही मिळवता येईल. अर्जाची छापील प्रत अर्जदाराला मिळेल त्याचप्रमाणे एसएमएसद्वारे अर्जाबाबतची त्वरित सूचनाही मिळेल.
·        जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या स्वदेशीPrithvi II बनावटीच्या पृथ्वी-या क्षेपणास्त्राची भारताने घेतलेली चाचणी झाली.
·        ओडिशामधील चंडीपूर रेंजवर हि चाचणी मोबाईल लॉंचरवरून घेण्यात आली.
·        या क्षेपणास्त्राचा पल्ला ३५० किलोमीटरचा आहे. तसेच, पाचशे ते एक हजार किलोग्रॅम वजनाची युद्धसामग्री वाहून नेण्याची याची क्षमता आहे.
·        मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांना पदापासून दूर राहण्याचे आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले.
·        प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र यांच्याकडे पुढील आदेश मिळेपर्यंत या पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.
·        वेळूकर यांची नियुक्ती करणाऱ्या शोध समितीने त्यांच्या पात्रतेसंदर्भातील ज्या मुद्द्यांबाबत आक्षेप आहेत, ते पुन्हा तपासून पाहावेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. परिणामी, शोध समितीचे काम सुरू असेपर्यंत वेळूकर यांना पदापासून दूर राहावे लागणार आहे.
·        कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावातAnil Kumbale- ICC Hall of fame 2015 सर्व १० फलंदाज बाद करण्याचा पराक्रम करणारा भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) “हॉल ऑफ फेम यादीत समावेश करण्यात आला आहे.
·        या यादीत समावेश होणारा कुंबळे हा जगातील ७७ वा, तर भारताचा चौथा खेळाडू आहे. बिशनसिंह बेदी, कपिल देव आणि सुनील गावसकर यांचाही या यादीत समावेश आहे.
·        कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ बळी मिळविले होते. कसोटी क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरन (८०० बळी) आणि शेन वॉर्न (७०८ बळी) यांच्यानंतर कुंबळेचे सर्वाधिक बळी आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही ३३७ बळी मिळविलेले आहेत.
·        कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पाकिस्तानविरुद्ध १० बळी मिळविण्याची कामगिरीही करून दाखविलेली आहे.
·        आयसीसीने कुंबळे याच्यासह बेटी विल्सन या महिला क्रिकेटपटूचाही या यादीत ७८ वा खेळाडू म्हणून समावेश केला आहे.
·        कुंबळे सध्या आयसीसीच्या क्रिकेट समितीचा अध्यक्ष आहे.
·        गुजरातमधील २००२च्या दंगलीनंतर अहमदाबाद येथील गुलबर्ग सोसायटीत म्युझियम ऑफ रेझिस्टन्स उभारणी दरम्यान आर्थिक निधीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व त्यांच्या पतीस देण्यात आलेल्या अंतरिम जामिनाच्या मुदतीत सर्वोच्च न्यायालयाने वाढ केली.
·        नवी दिल्ली-लखनौदरम्यान वातानुकूलित डबलडेकर रेल्वे गाडी लवकरच धावणार आहे. ही गाडी सुरू करण्यासाठी आवश्‍यक असलेली परवानगी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी दिली असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.
·        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुटाच्या लिलावाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना या सुटासाठीची बोली तब्बल कोटी ४१ लाख १०१ रुपयांवर पोचली. सुरतमधील प्रसिद्ध हिरे व्यापारी कोमलकांत शर्मा यांनी ही बोली लावली आहे.
·        या सुटासाठी दोन बोली लावण्यात आल्या. यातील मोदींच्या स्थानिक चाहत्यांनी कोटी २५ लाखांची, तर बांधकाम व्यावसायिक मुकेश पटेल यांनी कोटी ४१ लाख रुपयांची बोली लावली.
·        या लिलावातून मिळणारा निधी गंगा शुद्धीकरण आणि मुलींच्या शिक्षणावर खर्च केला जाणार आहे.
·        सुरतमधील कपडे व्यापारी राजेश जुनेजा यांनी मोदींच्या सुटासाठी १.२१कोटी रुपयांची बोली लावली होती. या सुटासोबतच मोदींना भेट स्वरूपात मिळालेल्या ४५५ वस्तूंचाही लिलाव केला जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा