चालू घडामोडी - २७ फेब्रुवारी २०१५

·        २७ फेब्रुवारी : मराठी राजभाषा दिन (मराठीतील ज्येष्ठ कवी व नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिन)
Marathi Rajbhasha din - Kusumagraj Jayanti
·        संघ परिवारातील संघटनांना शह देण्यासाठी डाव्या पक्षांनी आपल्या पोषाखामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून, सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असणारे कॉम्रेड आता लाल धोतर परिधान करणार आहेत.
·        मागील काही दिवसांपासून पक्षातील तरुणांची संख्या घटल्याने मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने तरुणाईला आकर्षित करेल असा पोषाख वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
·        यापूर्वीच असाच प्रयोग कन्नूर जिल्ह्यामध्ये करण्यात आला होता; तो कमालीचा यशस्वी झाल्यानंतर डाव्या नेत्यांनी तो अन्य ठिकाणी राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
·        टोलमुक्‍तीसाठी राज्य सरकारने पाऊल उचलत सध्या सुरू असलेल्या टोल नाक्‍यांवर कार व जीप अशा हलक्‍या वाहनांना सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
·        यापुढे नव्याने बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांचे पैसे संबंधित कंत्राटदाराला “डिफर” पद्धतीने चुकते करण्यात येणार आहेत. त्यामुळे यापुढे नवीन रत्यांवरील “टोलधाड” संपुष्टात येणार आहे.
·        १९८५ च्या नॅशनल जिऑग्राफी नियतकालिकावर झळकणारी हिरव्या डोळ्यांची अफगाण महिला पाकिस्तानात बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करत असल्याचे उघडकीस आले आहे.
·        शरबत गुला असे त्या महिलेचे नाव असून, तिच्यासोबत तिची दोन मुलेही बेकायदेशीररीत्या पाकिस्तानात राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
·        या प्रकरणी पाकिस्तानात राहण्यासाठी आवश्‍यक असलेले बनावट राष्ट्रीय ओळखपत्र तयार करणाऱ्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
·        पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या मते, पेशावरमध्ये एप्रिल २०१४ पासून ही महिला शरबत बीबी नावाने राहत होती.
·        १९८४ मध्ये शरबत गुलाचे वय १२ होते आणि ती पेशावरजवळील नशिरबाग येथे निर्वासितांच्या छावणीत राहत होती. अफगाणिस्तानातून आलेल्या निर्वासितांना याठिकाणी राहण्यासाठी छावण्या उभारण्यात आल्या होत्या.
·        दरम्यानच्या काळात छायाचित्रकार स्टीव मॅकरी याने शरबत गुलाला पाहिले. गुलाचा चेहरा आणि डोळे पाहून भारावलेल्या छायाचित्रकाराने तिचा फोटो काढला आणि तो नॅशनल जिऑग्राफीच्या मुखपृष्ठावर झळकला.
·        या चित्राने ती जगभरात प्रकाशझोतात आली. या छायाचित्राची तुलना लिओनार्दो दा विन्चीच्या विख्यात मोनालिसा या चित्राशी होऊ लागली.
·        महिलांच्या सुरक्षित प्रवासाठी महिला चालक असणारी स्वतंत्र रेडिओ कॅब सेवा पुणे शहरात उपलब्ध होणार आहे.
·        विंग्स ट्रॅव्हल्स कंपनीने प्रथमच विंग्स सखी ही सेवा सुरू केली असून, त्यात सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.
·        उद्योजक महिलांची राज्यव्यापी परिषद मार्चला मुंबईत होणार आहे.
·        जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या या एक दिवसीय परिषदेचे आयोजन आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानने इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या विशेष सहकार्याने केले आहे.
·        श्रीलंकन नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे ४३ भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. श्रीलंकेच्या बाजूच्या नेडुंचिवू आणि मुल्लैतिवू या भागातून त्यांना अटक करण्यात आली.
·        भारतीय मच्छिमारांशी झालेल्या संघर्षात दोन श्रीलंकन मच्छिमार जखमी झाले होते. त्यावर श्रीलंकन मच्छिमारांनी दिलेल्या माहितीवरून त्यांच्या नौदलाचे कर्मचारी तिथे आले.
·        चीनी प्रशासनाने आफ्रिकन हस्तिदंतापासून बनविलेल्या कोरीव वस्तूंची आयात करण्यावर एक वर्ष बंदी घालण्याची घोषणा केली आहे.
·        धोक्यात आलेल्या वन्य प्राणी व वनस्पतींच्या प्रजातींच्या व्यापारविषयक आंतरराष्ट्रीय करार १९७५ मध्ये अस्तित्वात आला. चीनच्या वन प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, २६ फेब्रुवारी २०१६ पर्यंत आम्ही हस्तिदंताच्या वस्तूंच्या आयातीला मंजुरी देणे स्थगित करणार आहोत.
·        आफ्रिकन हत्तींचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, अशा आयातबंदीच्या परिणामांचे परीक्षण करण्यासाठी एका वर्षाची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
·        जानेवारीमध्ये सोन्याच्या आयातीत ५५ टक्के वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये सोन्याची आयात ५७.२ टनांनी वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारीमध्ये सोन्याची १.५६ अब्ज डॉलरची आयात झाली असून त्यात ६.४१ टक्के वाढ झाले आहे.
·        यूपीए सरकारने सोन्याच्या आयातीवर निर्बंध लादले होते. त्यामुळे काही काळ सोन्याची मागणी भारतात कमी झाली होती. २०१४ या वर्षात सोन्याच्या मागणीत जवळपास १४ टक्क्यांनी घट होऊन मागणी ८४२.६ टनांवर पोहोचली होती.
·        भारत जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार आणि ग्राहक आहे.
·        आयपीएल क्रिकेटमध्ये स्पॉट फिक्‍सिंगप्रकरणी तिहार तुरुंगात असलेला क्रिकेटपटू एस.श्रीशांत याला ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार त्याचा मेहुणा आणि मल्याळी गायक मधु बालकृष्ण यांनी केली आहे.
·        उत्तर इराकमधील मोसूल या ऐतिहासिक शहरावर सध्या इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचे नियंत्रण आहे. या शहरामधील ऐतिहासिकदृष्टया अमूल्य असलेल्या अनेक शिल्पकृतींवर इसिसने अक्षरश: घण घातल्याचे स्पष्ट झाले आहे.
·        मोसूलमधील प्राचीन शिल्पकृतींची दहशतवाद्यांकडून नासधूस केली जात असल्याचे एक सुमारे पाच मिनिटांचे चित्रीकरण (व्हिडिओ) प्रसिद्ध झाले आहे.
                                                                                                                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा