प्रश्नसंच १३५ - अर्थशास्त्र

MT Quiz
[प्र.१] आर्थिक स्थैर्य म्हणजे . . . . . . .
१] किंमतीची स्थिर पातळी
२] उत्पादनाची उंच पातळी
३] बेरोजगारीत घट
४] किंमत, उत्पन्न व रोजगाराच्या पातळीचे स्थैर्य


४] किंमत, उत्पन्न व रोजगाराच्या पातळीचे स्थैर्य
----------------
[प्र.२] महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे रस्ते विकास कार्यक्रमातील बहुतांश प्रकल्प _ _ _ _ _ या तत्वावर आधारित आहेत.
१] प्रत्यक्षित खाजगी
२] बांधा, वापरा व हस्तांतरण करा
३] बांधा, भाडे करार मालकी
४] वरील सर्व


२] बांधा, वापरा व हस्तांतरण करा
----------------
[प्र.३] १९७० मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारताने प्रथमच निर्यात धोरण जाहीर केले?
१] एस. चक्रवर्ती समिती
२] नरसिंहन समिती
३] मुदलियार समिती
४] राजा चेलय्या समिती


३] मुदलियार समिती
----------------
[प्र.४] खालीलपैकी कोणता जागतिकीकरणाचा निर्देशांक नाही?
१] बहुराष्ट्रीय कंपन्यांवरील निर्बंधांचे उच्चाटन
२] निर्गुंतवणूक
३] अर्थसंकल्पातील अर्थसहाय्यात घट
४] मुक्त व्यापारास प्रोत्साहन


२] निर्गुंतवणूक
----------------
[प्र.५] अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करणे ब खाजगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम भर कोणत्या पंतप्रधानांनी दिला?
१] इंदिरा गांधी
२] अटल बिहारी वाजपेयी
३] राजीव गांधी
४] मनमोहन सिंग


३] राजीव गांधी
----------------
[प्र.६] योग्य विधाने ओळखा.
अ] जागतिक बँक प्रकाल्पाभिमुख आणि उपक्रमाभिमुख मदत करते.
ब] १९६० मध्ये आंतरराष्ट्रीय विकास संस्थेची स्थापना झाली.
क] आंतरराष्ट्रीय विकास संस्था जगातील गरीब देशांना व्याज मुक्त मदत देते.

१] फक्त अ
२] फक्त अ आणि ब
३] फक्त ब आणि क
४] वरील सर्व


४] वरील सर्व
----------------
[प्र.७] इंदिरा आवास योजनेसंबंधी योग्य विधान निवडा.
अ] इंदिरा आवास योजना हि केंद्रपुरस्कृत योजना आहे.
ब] हि योजना ग्रामीण भागात घरे नसलेल्या दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी राबविली जाते.
क] या योजनेत केंद्र व राज्य यांचा वाटा ७५:२५ आहे.
ड] भारत सरकारने या योजनेस १ जानेवारी १९९६ पासून स्वतंत्र दर्जा दिला आहे.  

१] ब, क आणि ड
२] अ, क आणि ड
३] अ आणि क
४] वरील सर्व


४] वरील सर्व
----------------
[प्र.८] भारतातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या अल्पभूधारक व्यक्तीच्या विकासासाठी _ _ _ _ _ ला अल्पभूधारक विकास संघटनेची स्थापना करण्यात आली.
१] १९८३
२] १९५९
३] १९५६
४] १९७१


४] १९७१
----------------
[प्र.९] वाणिज्य मंत्र्यांनी २००९-१४ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या विदेशी व्यापार धोरणात खालीलपैकी कोणत्या तरतुदी आढळून येतात?
अ] २०१४ सालापर्यंत निर्यात दुप्पट करणे.
ब] आयात निर्यात पासबुक योजना रद्द करणे.
क] निर्यातभिमुख उद्योगांना आपल्या उत्पादनाच्या ९०% हिस्सा देशातील बाजारपेठेत विकण्यास परवानगी देणे.
ड] सर्व आयात क्षेत्रांना सेवा करातून सुट देणे.

१] फक्त अ व ब
२] फक्त अ व क
३] फक्त ब, क व ड
४] वरील सर्व


२] फक्त अ व क
----------------
[प्र.१०] GDP संदर्भात योग्य विधान/विधाने ओळखा.
अ] GDP मध्ये एका आर्थिक वर्षातील सर्व वस्तू व सेवांचे मुल्य मोजले जाते.
ब] GDP साठी १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष मानले जाते.
क] आर्थिक वृद्धीदर म्हणजे GDP मधील वार्षिक फरकामधील टक्केवारी असते.
ड] GDP मुळे अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक व गुणात्मक आकलन होते.

१] फक्त अ, ब आणि क
२] फक्त अ आणि क
३] फक्त अ, ब आणि ड
४] वरील सर्व


१] फक्त अ, ब आणि क
[GDP मुळे अर्थव्यवस्थेचे फक्त संख्यात्मक आकलन होते.]

----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा