प्रश्नसंच १३८ - पर्यावरण

[प्र.१] अन्न म्हणजे उर्जा. ही उर्जा संक्रमित होऊन पर्यावरणात जाते व उर्जाचक्र पूर्ण होते. तर खालीलपैकी कोणते उर्जाचक्र बरोबर आहे?
अ] उत्पादक – प्राथमिक भक्षक – द्वितीयक भक्षक – तृतीयक भक्षक – विघटक
ब] सूर्य – पाणी – कार्बन डायऑक्साईड – जमीन/मृदा
क] कृमी – कीटक – जीवाणू – बुरशी – कवक
ड] प्राथमिक भक्षक – द्वितीयक भक्षक – तृतीयक भक्षक - उत्पादक – विघटक

१] फक्त अ
२] फक्त अ आणि क
३] फक्त अ आणि ब
MT Quiz४] वरील सर्व


१] फक्त अ
----------------
[प्र.२] सजीव जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत त्यांना काय म्हणतात?
१] द्वितीयक भक्षक
२] प्राथमिक भक्षक
३] विघटक
४] मांस भक्षक


२] प्राथमिक भक्षक
----------------
[प्र.३] १९९२ मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली?
१] ब्राझील
२] जपान
३] न्यूझीलंड
४] चीन


१] ब्राझील
----------------
[प्र.४] जागतिक वन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
१] ११ मार्च
२] २१ मार्च
३] ९ मार्च
४] २४ मार्च


२] २१ मार्च
----------------
[प्र.५] नैसर्गिक साधन संपत्तीची माणसाच्या विविध विभागामध्ये होणारी असमान गमनशीलता .............. निर्माण होण्यास कारणीभूत ठरते.
१] श्रीमंती
२] गरीबी
३] प्रदूषण
४] अवनती


२] गरीबी
----------------
[प्र.६] भारतात व्यावसायिक स्वरूपात मधाची निर्मिती करण्यामुळे होणारा घातक परिणाम म्हणजे ............
अ] युरोपातील मधमाश्यांचे वाण भारतात आले आहेत. हे भारतीय मधमाश्यांच्या अस्तित्वाला धोकादायक ठरत आहेत.
ब] युरोपीय मधमाश्यांना दिली जाणारी रोगप्रतिबंधक औषधे मधात उतरली असून, त्यामुळे मध हे अन्न सर्वांना धोकादायक ठरत आहे.

१] फक्त अ योग्य
२] फक्र ब योग्य
३] अ आणि ब दोन्ही योग्य
४] यापैकी नाही


३] अ आणि ब दोन्ही योग्य
----------------
[प्र.७] बी.एच.सी. कीटकनाशकावर खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे प्रतिबंध करण्यात आलेला आहे?
अ] पिकांमध्ये अवशेष रहाणे
ब] मातीमध्ये अवशेष रहाणे
क] तीव्र विषाक्तता
ड] कर्कजनक्ता

१] अ आणि ब
२] फक्त ब
३] ब आणि क
४] क आणि ड


२] फक्त ब
----------------
[प्र.८] खाली दिलेल्या रसायनांपैकी दुय्यम प्रदूषक कोणता?
१] राख
२] कार्बन डायऑक्साईड
३] धूर
४] हायड्रोजन सायनाईड


४] हायड्रोजन सायनाईड
----------------
[प्र.९] खालीलपैकी कोणती भारतीय नदी जगातील १० नष्ट होण्याच्या मार्गावरील नद्यांपैकी एक आहे?
१] यमुना
२] गंगा
३] गोदावरी
४] कृष्णा


२] गंगा
----------------
[प्र.१०] खाली भारतातील नदी जल-प्रदूषणाबाबत काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान चूक आहे?
१] भारतातील निर्माण होणाऱ्या त्याज्य/टिकाऊ पाण्यापैकी फक्र २६% पाण्यावर प्रक्रिया केली जाते.
२] त्याज्य/टिकाऊ पाण्यावरील प्रक्रिया जास्तीत जास्त ८९% पर्यंतच असते.
३] महानदीच्या तीरावर सर्वात जास्त त्याज्य/टिकाऊ पाणी सोडणारी शहरे वसली आहेत.
४] त्याज्य/टिकाऊ पाणी प्रक्रिया सर्वात जास्त कृष्णानदी खोरे विभागात होते.


३] महानदीच्या तीरावर सर्वात जास्त त्याज्य/टिकाऊ पाणी सोडणारी शहरे वसली आहेत.
----------------

1 टिप्पणी: