शाहीर साबळे कालावश

·        गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्रShahir Sable माझा हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे, मुक्तनाट्याचे आद्य प्रवर्तक लोकशाहीर कृष्णराव साबळे (वय ९२) यांचे २० मार्च २०१५ रोजी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले.
·        महाराष्ट्राची लोककला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या या महान कलावंताच्या निधनाने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरपला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
·        सातारा जिल्ह्यातील पसरणी (ता. वाई) या छोट्या खेड्यात सप्टेंबर १९२३ रोजी कृष्णराव साबळे यांचा जन्म झाला.
·        साने गुरूजींकडून प्रखर राष्ट्रवाद आणि निर्व्याज देशभक्तीचं बाळकडू त्यांनी आत्मसात केलं. जागृती शाहीर मंडळाच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार केले.
·        १९४२ साली शाहीर शंकरराव निकम यांच्याकडून त्यांनी शाहिरी कलेचे प्रत्यक्ष धडे घेतले. स्वातंत्र्य चळवळ असो की, हैदराबाद मुक्ती संग्राम... संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो की, गोवा मुक्ती आंदोलन... शाहिरांचा डफ कडाडत राहिला.
·        मात्र, महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमानं शाहीरांचं आयुष्यच पालटून गेलं. महाराष्ट्राच्या विविध संस्कृतीचं आणि कलांचं दर्शन घडवणारा हा कार्यक्रम तुफान गाजला. संगीत दिग्दर्शक मुलगा देवदत्त, नृत्य दिग्दर्शिका कन्या चारूशीला, यशोधरा असं अख्खं साबळे कुटुंबच महाराष्ट्राच्या लोकधारेत सामावून गेलं होतं.
·        शाहिरांचा कलागुणांचा वारसा त्यांचे नातू प्रख्यात सिने-नाट्य दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही जोपासलाय.

·        शाहीर साबळे यांच्या लेखनकृती
·        आबुरावाचं लगीन (मुक्तनाट्य)
·        आंधळं दळतंय (मुक्तनाट्य)
·        ग्यानबाची मेख (मुक्तनाट्य)
·        यमराज्यात एक रात्र (इ.स. १९६०, पहिले मुक्तनाट्य)
·        बापाचा बाप (मुक्तनाट्य)
·        माझा पवाडा (आत्मचरित्र)

·        शाहीर साबळे यांनी गायलेली आणि लोकप्रिय झालेली गीते
·        अरे कृष्णा हरे कान्हा (तमाशा गीत)
·        अशी ही थट्टा (तमाशागीत)
·        आई माझी कोणाला पावली (भक्तिगीत)
·        आज पेटली उत्तर सीमा (देशभक्तिपर गीत)
·        आठशे खिडक्‍या नऊशे दारं (लोकगीत)
·        आधी गणाला रणी आणला (गण)
·        आधुनिक मानवाची कहाणी (कार्ल मार्क्सचे तत्त्वज्ञान सांगणारा पोवाडा)
·        जय जय महाराष्ट्रMaharashtrachi Lokdhara माझा (महाराष्ट्रगीत)
·        जेजुरीच्या खंडेराया जागराला (भारूड)
·        दादला नको ग बाई (भारूड)
·        पयलं नमन हो करीतो (गण)
·        फुटला अंकुर वंशाला आज (समाजजागृती गीत)
·        बिकट वाट वहिवाट नसावी (फटका)
·        मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून (भक्तिगीत)
·        महाराज गौरीनंदना (गण)
·        महाराष्ट्र जय महाराष्ट्र (स्फूर्तिगीत)
·        मायेचा निजरूप आईचा (भावगीत)
·        मुंबावतीची लावणी
·        या गो दांड्यावरना बोलते (कोळीगीत)
·        या विठूचा गजर हरिनामाचा (भक्तिगीत)
·        विंचू चावला (भारूड)
·        सैनिक माझे नाव (स्फूर्तिगीत)
·        हय्‌ पावलाय देव मला (लोकगीत)

·        शाहीर साबळे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
·        अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे अध्यक्षपद
·        अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे एकमेव शाहीर
·        भारत सरकारतर्फे पद्मश्री मिळवणारे पहिले शाहीर
·        भारतीय शांतिदूत मंडळाचे प्रतिनिधी म्हणून रशियाचा दौरा करणार्‍या पथकात सहभाग
·        पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार
·        दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
·        संत नामदेव पुरस्कार
·        पुणे महापालिकेचा शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार
·        १९५४-५५ मध्ये हिज मास्टर्स व्हॉईस ग्रामोफोन रेकॉर्ड कंपनीचे सर्वाधिक यशस्वी कलाकार म्हणून महंमद रफींबरोबर नाव झळकलेले कलावंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा