प्रश्नसंच १४४ - चालू घडामोडी

MT Quiz [प्र.१] १४ फेब्रुवारी २०१५ रोजी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे ............ मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली?
१] पाचवे
२] सहावे
३] सातवे
४] आठवे


३] सातवे
[व्यक्ती म्हणून सातवे मुख्यमंत्री]

----------------
[प्र.२] देशातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ कोठे सुरु करण्यात येणार आहे?
१] महाराष्ट्र
२] गुजरात
३] मध्यप्रदेश
४] कर्नाटक


२] गुजरात (वापी)
----------------
[प्र.३] खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र सरकारने उद्योग दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे?
१] १७ सप्टेंबर
२] १९ ऑक्टोबर
३] २९ नोव्हेंबर
४] १३ डिसेंबर


१] १७ सप्टेंबर
----------------
[प्र.४] ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या योजने अंतर्गत अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे?
१] आठ
२] नऊ
३] दहा
४] अकरा


३] दहा
[बीड, जालना, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बुलढाणा, वाशीम, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली]

----------------
[प्र.५] ‘बॉर्न अगेन ऑन द माउंटन’ हे पुस्तक कोणी लिहिले?
१] अमर्त्य सेन
२] अरुनिमा सिन्हा
३] युवराज सिंग
४] संतोष यादव


२] अरुनिमा सिन्हा
----------------
[प्र.६] फेब्रुवारी २०१५ मध्ये ‘International Conference in Buddhist Heritage’ कोणत्या राज्याने आयोजित केली?
१] बिहार
२] उत्तरप्रदेश
३] ओडिशा
४] यापैकी नाही


३] ओडिशा
----------------
[प्र.७] मनरेगाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी १०वा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला?
१] महाराष्ट्र
२] जम्मू काश्मीर
३] केरळ
४] मध्यप्रदेश


४] मध्यप्रदेश
----------------
[प्र.८] खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ] ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तिरुअनंतपुरम (केरळ) येथे पार पडल्या.
ब] या स्पर्धेचे सदिच्छा राजदूत अमिताभ बच्चन होते.
क] या स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान सलग तिसऱ्या वर्षी सेनादल क्रीडा मंडळाने मिळविला.
ड] पुढील स्पर्धा २०१६ मध्ये गोवा येथे होणार आहेत.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त अ, क आणि ड
३] दोन्ही अ आणि ड
४] वरील सर्व


२] फक्त अ, क आणि ड
[या स्पर्धेचे सदिच्छा राजदूत सचिन तेंडूलकर होते.]

----------------
[प्र.९] खालीपैकी योग्य विधाने ओळखा.
अ] १९८४च्या शीख दंगलीसंदर्भात गृहमंत्रालयाने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय SITचे अध्यक्ष प्रमोद अस्थाना आहेत.
ब] माजी सरन्यायाधीश राकेश कपूर यांच्या शिफारसीने ही समिती स्थापन झाली.
क] माजी न्यायाधीश जी.पी.माथुर आणि दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त कुमार ज्ञानेश हे या समितीचे सदस्य आहेत.
ड] प्रमोद अस्थाना १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त अ, ब आणि क
३] फक्त अ आणि ड
४] वरील सर्व


३] फक्त अ आणि ड
[माजी सरन्यायाधीश जी.पी.माथुर यांच्या शिफारसीने ही समिती स्थापन झाली.
माजी न्यायाधीश राकेश कपूर आणि दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त कुमार ज्ञानेश हे या समितीचे सदस्य आहेत.]

----------------
[प्र.१०] खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा?
अ] १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू करण्याचा निर्णय नुकताच राज्यसरकारने घेतला.
ब] चंद्रपूर हा दारूबंदी असलेला महाराष्ट्रातील तिसरा जिल्हा ठरला.
क] यापूर्वी वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी झालेली आहे.
ड] या तीनही जिल्ह्यात दारू विक्री, साठा व पिण्यावर बंदी घातली आहे.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त ब, क आणि ड
४] वरील सर्व योग्य


४] वरील सर्व योग्य
----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा