चालू घडामोडी - १४ मार्च २०१५

·        १९८७ नंतर प्रथमच भारतीय पंतप्रधानांनी श्रीलंकेला भेट दिली.
·        भारत आणि श्रीलंकेदरम्यान व्हिसा, सीमाशुल्क, युवककल्याण आणि रवींद्रनाथ टागोर यांचे स्मारक उभारणे आदी चार करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
·        श्रीलंकेतील रेल्वेच्या विकासासाठी भारत योगदान देईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
·        श्रीलंकेचा रुपया स्थिर राहण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंक आणि सेंट्रल बॅंक श्रीलंका यांच्यादरम्यान चलन हस्तांतराबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
·        लोकप्रियWhatsapp Voice Call Feature मेसेंजर ऍप व्हॉटस्‌ ऍपने व्हॉईस कॉलिंग फिचर ही सुविधा सर्व युजर्सकरिता खुली केली आहे.
·        व्हॉटस्‌ऍपच्या २.११.५२८ ही आवृत्ती प्रसिद्ध करण्यता आली असून त्यामध्ये व्हॉईस कॉलिंस फिचर देण्यात आले आहे.
·        मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्करे तैयबाचा दहशतवादी झकीउर रहमान लख्वी याला सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे.
·        लख्वीला ताब्यात ठेवणे बेकायदेशीर आहे, असे सांगत इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्याला तातडीने सोडण्याचे आदेश पाकिस्तान सरकारला दिले आहेत.
·        या आदेशानंतर भारत सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
·        पाकिस्तानने सर्व प्रकारच्या वातावरणात वापरता येणारे ड्रोन आणि लेझर गायडेड क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.
·        या चाचणीच्या वेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ उपस्थित होते.
·        ड्रोनचे नाव बराक असून, कोणत्याही वातावरणात लक्ष्याचा भेद घेण्याची त्याची क्षमता आहे, तर क्षेपणास्त्राचे नाव बर्क आहे.
·        या दोन्ही गोष्टी संपूर्ण स्वदेशी असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
·        बॅंकांकडून घेतलेले कर्ज थकविण्याचे, बुडविण्याचे प्रमाण भयावह पद्धतीने वाढत असून, देशभरातील बॅंकांच्या बुडीत कर्जाची रक्‍कम (एनपीए) तीन लाख कोटींच्या घरात पोचली आहे.
·        डिसेंबर २०१४ अखेर देशातील नव्या-जुन्या खासगी, राष्ट्रीयीकृत, तसेच स्टेट बॅंक समूहातील बॅंकांकडील थकबाकी लाख ९१ हजार ७०६ कोटींवर पोचली आहे.
·        विदर्भ व मराठवाड्यातील २.२३ लाख शेतकऱ्यांचे अंदाजे १५६ कोटी रुपयांचे कर्ज व त्यावरील १५ कोटी रुपये व्याज अशी एकूण १७१ कोटी रुपयांची रक्कम शासन अदा करणार आहे.
·        त्यामुळे खासगी सावकारांच्या कर्जात अडकलेला शेतकरी कर्जमुक्त होणार आहे.
·        मात्र पगारदार व्यक्ती, निवृत्तीवेतनधारक, तसेच मुंबई दुकाने अधिनियम १९४८ नुसार परवानाधारक व्यक्ती (व्यापारी) या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत, असे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
·        फुटीरतावादी नेता मसरत आलम याच्यावर कोणताही नवा गुन्हा दाखल नसल्याने, त्याला पुन्हा अटक करू शकत नाही. असे जम्मू-काश्मीर सरकारने स्पष्ट केले आहे.
·        मसरत आलम याची नुकतीच मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुटका केली होती. या सुटकेवरून देशभर गदारोळ झाला होता.
·        राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी यांची पुन्हा तीन वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांपासून जोशी हे संघातील दुसऱ्या क्रमांकाच्या प्रमुख पदावर कार्यरत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा