प्रश्नसंच १३१ - इतिहास

MT Quiz
[प्र.१] खालीलपैकी कोणत्या संस्थानाची घटना महात्मा गांधी यांनी बनवली?
१] औंध
२] बडोदा
३] ग्वालियर
४] इंदौर


१] औंध
----------------
[प्र.२] खालीलपैकी कोणी पहिल्यांदा पाकिस्तानच्या मागणीचे समर्थन केले?
१] पंडित जवाहरलाल नेहरू
२] सरदार वल्लभभाई पटेल
३] सी. राजगोपालाचारी
४] डॉ. राजेंद्र प्रसाद


३] सी. राजगोपालाचारी
----------------
[प्र.३] वेव्हेल योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका तरतुदीचा समावेश नव्हता?
१] गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीमध्ये मुस्लिमांचे प्रतिनिधित्व राहणार होते.
२] गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीच्या परिषदेला हंगामी सरकारचे स्थान राहणार होते.
३] गव्हर्नर जनरलला नकाराधिकार नसेल.
४] युध्द संपल्यानंतर भारतीय स्वतः आपले संविधान बनवतील.


३] गव्हर्नर जनरलला नकाराधिकार नसेल.
----------------
[प्र.४] कॉंग्रेस सरकारच्या १९३७च्या निवडणुकीनंतरच्या कार्याबाबत खालीलपैकी योग्य विधाने ओळखा?
अ] या सरकारांनी कम्युनिस्ट पक्षावरील बंदी उठवली.
ब] या सरकारांनी राजकीय कैद्यांची मुक्तता केली.
क] काकोरी कटातील क्रांतीकारकांची कैदेतून मुक्तता केली.
ड] पब्लिक सेफ्टी कायद्यामधील प्रांतांचे आणीबाणीचे अधिकार रद्द केले.

१] फक्त अ, ब आणि ड
२] फक्त ब, क आणि ड
३] फक्त अ आणि ड
४] फक्त अ, क आणि ड


२] फक्त ब, क आणि ड
----------------
[प्र.५] नाना पाटील यांनी कोणासोबत मराठी भाषिक प्रांतासाठी लढा दिला?
१] पु. ल. देशपांडे
२] आचार्य अत्रे
३] अण्णाभाऊ साठे
४] वरीलपैकी नाही


२] आचार्य अत्रे
----------------
[प्र.६] लहूजी साळवे यांनी आपल्या क्रांतिकारक विचारांनी कोणत्या क्रांतीकारकास प्रेरित व प्रोत्साहित केले?
१] उमाजी नाईक
२] वासुदेव बळवंत फडके
३] अनंत कान्हेरे
४] वि. दा. सावरकर


२] वासुदेव बळवंत फडके
----------------
[प्र.७] प्रबोधनकार ठाकरे यांनी खालीलपैकी कोणाचे चरित्रलेखन केलेले आहे?
अ] समर्थ रामदास
ब] संत तुकाराम महाराज
क] संत गाडगे महाराज
ड] महात्मा फुले
इ] पंडिता रमाबाई

१] फक्त अ, ब आणि क
२] फक्त ब, क, ड आणि इ
३] फक्त अ, क आणि इ
४] फक्त क, ड आणि इ


३] फक्त अ, क आणि इ
----------------
[प्र.८] भारत छोडो चळवळीबाबत खालील विधाने लक्षात घ्या. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ] या चळवळीत मुस्लीम जनतेचा सहभाग नव्हता.
ब] कम्युनिस्ट पक्षाचा या चळवळीला पाठींबा होता.
क] या चळवळीत शेतकरी केंद्रस्थानी होते.
ड] या चळवळीत संपूर्ण भारताचा समावेश होता.

१] फक्त अ, ब आणि क
२] फक्त ब, क आणि ड
३] फक्त क आणि ड
४] वरील सर्व


२] फक्त ब, क आणि ड
----------------
[प्र.९] खालील विधाने लक्षात घ्या व अयोग्य विधाने ओळखा.
अ] राजामुंद्री सामाजिक सुधारणा असोसिएशनची स्थापना के. टी. तेलंग यांनी केली.
ब] या संस्थेचा उद्देश विवाहाला प्रोत्साहन देणे हा होता.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही


१] फक्त अ
----------------
[प्र.१०] खालीलपैकी कोणते नेते प्राथमिक शिक्षणाच्या पाठ्यपुस्तके लिहिण्याशी संबंधित आहेत?
अ] महात्मा गांधी
ब] दादाभाई नौरोजी
क] लोकमान्य टिळक
ड] ईश्वरचंद्र विद्यासागर
इ] केशवचंद्र सेन
फ] रवींद्रनाथ टागोर

१] फक्त अ, ब, इ आणि फ
२] फक्त ब, ड आणि फ
३] फक्त ब, क, ड आणि फ
४] फक्त क आणि फ


२] फक्त ब, ड आणि फ
----------------

1 टिप्पणी: