चालू घडामोडी - ६ मार्च २०१५

·        इंटरनेटवर जगातील तीस सर्वात प्रभावशाली Narendra Modi व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश करण्यात आला आहे. टाइम या नियतकालिकाने प्रकाशित केलेल्या यादीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचासुद्धा  समावेश आहे.
·        ही यादी सोशल मीडियावरील अनुयायी, साइटवरील ट्रफिक आणि बातम्या कशा हाताळल्या जातात, यावरून करण्यात आली आहे. हॅरी पॉटरच्या लेखिका जे के रोलिंग यांच्यासह टेलर स्विफ्ट आणि शकिरा या पॉप गायिकांचाही समावेश आहे.
·        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्सवर ३.८ कोटी अनुयायी असून ओबामा यांच्यानंतर जगात प्रभावी व्यक्ती म्हणून मोदी यांचा दूसरा क्रमांक लागतो.
·        रियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी राज्यातील युवकांची फसवणूक केल्याचा ठपका दिल्ली उच्च न्यायालयाने ठेवला आहे. त्यांची दहा वर्षांची शिक्षा कायम ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
·        रिन्युव्ह शिकागो अशी घोषणा देवून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या मुळच्या कोकणातील असलेल्या अमेय सुहास पवार या मराठी तरुणाने शिकागो नगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ४७ मधून विजय मिळवला आहे.
·        शिकागो मराठी झेंडा फडकविणारा अमेय पवार हा मुळचा कोकणातील संगमेश्‍वर- पेढांबे येथील आहे.
·        डेमोक्रेटीक रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवार म्हणून अमेयने निवडणूक लढविली होती.
·        खोकला आणि मधुमेहावर उपचार करून घेण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल बंगळूर येथील जिंदाल निसर्गोपचार केंद्रात दाखल झाले आहेत. दहा दिवस ते या ठिकाणी उपचार घेणार आहेत.
·        नायजेरियातील बोर्नो राज्यामध्ये असलेल्या जांबा गावात बोको हराम या दहशतवादी संघटनेने ६४ जणांची हत्या केली. मृतांमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे.
·        इस्लामाबाद येथे होळी साजरी करणाऱ्या हिंदू लोकांच्या रक्षणासाठी कराचीतील स्वामी नारायण मंदिराभोवती द नॅशनल स्टुडंटस्‌ फेडरेशन (एनएसएफ) या संघटनेने मानवी कडा तयार करून संरक्षण पुरवित एकतेचे प्रदर्शन केले आहे.
·        सीरियामधील सरकारच्या हवाई हल्ल्यामध्ये अल नुस्रा फ्रंट या दहशतवादी संघटनेचा एक वरिष्ठ कमांडर ठार झाला आहे. अल नुस्रा फ्रंट ही अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेशी संलग्न संघटना आहे.
·        अबु हम्माम अल शामी उर्फ अल-फारुक अल सुरी असे या दहशतवाद्याचे नाव असून तो सीरियाच्या सैन्याच्या विशेष तुकडीच्या इदलीब प्रांतामध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ठार झाला.
·        अल शामी हा अल कायदाचा सीरियामधील अनुभवी दहशतवादी होता.
·        दहशतवादी हल्ला; तसेच बॉंबस्फोटांच्या घटनांच्या बातम्या देणाऱ्या प्रसिद्धिमाध्यमांसाठी पोलिसांनी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.
·        दहशतवाद्यांचे मनोबल उंचावेल; तसेच नागरिकांचे मनोधैर्य खचेल, असे कोणतेही चित्रीकरण न दाखवण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
·        मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी वृत्तवाहिन्यांनी केलेल्या लाइव्ह प्रसारणाचा गैरफायदा दहशतवादी संघटनांनी घेतला होता. त्यामुळे माध्यमांसाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. या प्रकरणी अभ्यास करून पोलिसांनी ही तत्त्वे जाहीर केली आहेत.
·        प्रसिद्धिमाध्यमांसाठी काय करू नये?
·        प्रक्षोभक चित्रफीत किंवा ध्वनिफीत प्रसारित करू नये.
·        यापूर्वीच्या घटनांची संग्रहित छायाचित्रे वारंवार दाखवू नयेत.
·        अर्धवट, तथ्यहीन तसेच अतिशयोक्तीपूर्ण माहितीच्या आधारे बातम्या देऊ नयेत.
·        मृतदेह तसेच पीडितांचे व्हिडिओ फुटेज दाखवणे टाळा.
·        आक्षेपार्ह तसेच प्रक्षोभक दृश्‍यांचे प्रसारण थांबवा.
·        पीडित, सुरक्षा यंत्रणा तसेच दहशतवाद्यांशी संबंधित कोणतेही थेट प्रक्षेपण दाखवू नये.
·        तपास सुरू असलेल्या तसेच न्यायालयीन प्रक्रियेला बाधा आणणाऱ्या प्रकरणाचे प्रक्षेपण करू नये.
·        पंतप्रधान नरेंद्र मोदी १० मार्चला सेशेल्स, मॉरिशस आणि श्रीलंका या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत.
·        इराकमधील सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी असीरियन साम्राज्यकालात (इस्लामपूर्व काळात) वसविण्यात आलेले पुरातन शहर उध्वस्त करण्यास इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी सुरुवात केली आहे.
·        निमरुड असे जगप्रसिद्ध प्राचीन शहराचे नाव असून इसिसचे दहशतवादी बुलडोझरच्या सहाय्याने हे शहर जमीनदोस्त करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा