अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न प्रदान

खालील माहिती PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. राजकीय मुत्सद्दी नेते, निष्णात वाक्पटू आणि संवेदनशील कवी, अशी ओळख असलेले भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते चालण्याफिरण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे राजशिष्टाचार बाजूला ठेवून राष्ट्रपती स्वत: कृष्णमेनन मार्गस्थित वाजपेयींच्या निवासस्थानी गेले आणि त्यांना ‘भारतरत्न’ प्रदान केला.

अटलबिहारी वाजपेयी यांचा अल्पपरिचय 

  • जन्म : २५ डिसेंबर १९२४, ग्वाल्हेर येथे 
  • शिक्षण : राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी 
  • राजकीय प्रवास: 
    • आर्य कुमार सभेच्या माध्यमातून ग्वाल्हेरमधून १९३९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश.
    • १९४२ मध्ये भारत छोडो चळवळीत सहभाग, अटक.
    • श्‍याम प्रसाद मुखर्जी यांच्यासमवेत भारतीय जनसंघाचे काम.
    • १९५७ मध्ये बलारामपूर मतदारसंघातून संसदेत प्रवेश.
    • विरोधी पक्षात अभ्यासपूर्ण आणि उल्लेखनीय कारकिर्द
    • आणीबाणीनंतर जनता पक्षामधून दिल्ली मतदारसंघातून संसदेवर.
    • बहुमतातील जनता पक्षाच्या सरकारमध्ये मार्च १९७७ ते जुलै १९७९ दरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री. याशिवाय दोन वेळा अत्यल्प काळासाठी परराष्ट्रमंत्री.
    • १९८० मध्ये लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना.
    • भारतीय जनता पक्षाचे पहिले अध्यक्ष.
    • १९९६ च्या लोकसभेसाठी पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार.
    • १६ मे १९९६ ते १ जून १९९६ या केवळ १३ दिवसांसाठी पंतप्रधानपदी विराजमान.
    • त्यानंतर बहुमत सिद्ध होण्यापूर्वीच पंतप्रधानपदाचा राजीनामा.
    • १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ दरम्यान पुन्हा पंतप्रधानपद.

  • अतिमहत्वाचे प्रमुख निर्णय 
    • मे १९९८ मध्ये पोखरण येथे जमिनीखाली अणुचाचण्या.
    • १९९८ साली पाकिस्तानसोबत चर्चेसाठी लाहोर भेट, लाहोर-दिल्ली दरम्यान बससेवेची सुरुवात.
    • १९९९ साली कारगिलमध्ये पाकिस्तान सैन्याच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला (कारगिल युद्ध)
    • काठमांडूवरून दिल्लीला जाणारे भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण झाल्यावर तीन दहशतवाद्यांच्या बदल्यात सर्व प्रवाश्‍यांची सुखरूप सुटका.

  • प्रमुख पुरस्कार 
    • १९९२ - पद्मविभूषण पुरस्कार
    • १९९३ - कानपुर विश्‍वविद्यालयाची डि.लीट.
    • १९९४ - लोकमान्य टिळक पुरस्कार
    • १९९४ - उत्कृष्ट संसद पटू : भारतरत्न पंडित गोविंद वल्लभपंत पुरस्कार
    • २०१४ - भारतरत्न

  • साहित्यिक प्रवास 
    • मासिक राष्ट्रधर्म, साप्ताहिक पाञ्चजन्य, दैनिक स्वदेश, दैनिक अर्जुन या नियतकालिकांचे संपादक म्हणून काम. 
  • प्रकाशित पुस्तके 
    • मेरी संसदीय यात्रा (चार खंड)
    • मेरी इक्‍यावन कवितायें (कवितासंग्रह)
    • स्नकल्प काल
    • शक्ती से शक्ती
    • फोर डिकेड्‌स ऑफ पार्लमेंट (तीन खंड)
    • लोकसभा में अटलजी (भाषणांचा संग्रह)
    • मृत्यु या हत्या
    • अमर बलिदान
    • कैदी कविराज की कुंडलिया (आणीबाणीच्या काळात तुरुंगात लिहिलेल्या कविता)
    • न्यू डायमेंशन्स ऑफ इंडियाज्‌ फॉरिन पॉलिसी (a collection of speeches delivered as External Affairs Minister during १९७७-७९)
    • जनसंघ और मुसलमान
    • संसद मे तीन दशक (Speeches in Parliament १९५७-१९९२)
    • अमर आग है (कविता संग्रह)
    • न दैन्यं न पलायनम्‌ (कविता संग्रह)

1 टिप्पणी: