चालू घडामोडी - १ एप्रिल २०१५


  • १ एप्रिल : उत्कल दिवस, ओरिसा

    Arun Jaitley
  • केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, आता त्यांना सर्वोच्च 'झेड प्लस' सुरक्षा दिली जाईल. 
  • केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातून (सीआयएसएफ) निवडलेले कमांडो जेटलींभोवती तैनात केले जातील. 
  • अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यावर जेटलींच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली  चौथ्या स्थानावर कायम आहे. तर, शिखर धवनने सातव्याऐवजी सहावे स्थान मिळविले आहे.
  • कोहली आणि धवन यांच्याव्यतिरिक्त भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी पहिल्या दहा फलंदाजांच्या यादीत आहे. धोनी क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे. 
  • तर, भारताचा सलामीवीर रोहित शर्माने सात स्थानांची प्रगती करत ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ आणि पाकिस्तानच्या मिस्बा उल हकसह १२ वे स्थान मिळविले आहे.
  • विश्वकरंडक स्पर्धेत स्पर्धेचा मानकरी ठरलेला ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्क गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोचला आहे. स्टार्क प्रथमच अव्वल दर्जाचा गोलंदाज झाला आहे. स्टार्कने विश्वकरंडकात २२ बळी घेतले होते. यापूर्वी तो सातव्या स्थानावर होता. 
  • तर, भारताचा उमेश यादवने पहिल्या २० गोलंदाजांमध्ये स्थान मिळविले आहे.

  • गुजरात विधानसभेने दहशतवादविरोधी वादग्रस्त विधेयकास नव्या ‘गुजरात दहशतवादी कायदा आणि संघटित गुन्हे नियामक विधेयक’ या नावाने मंजुरी दिली आहे.
  • याआधी राष्ट्रपतींनी दोनदा हे विधेयक फेटाळून लावले आहे. माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील यांनी हे विधेयक फेटाळून लावले होते.
  • गुजरात गृहराज्यमंत्री रजनीकांत पटेल यांनी सलग तिसऱ्यांदा हे विधेयक सभागृहामध्ये सादर केले.
  • या विधेयकामध्ये दहशतवादी कारवायांसाठी मृत्युदंडाची शिक्षा व आजन्म कारावासाची तरतूद असून, यान्वये दोषींना दहा लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
  • आक्षेप कशाला ? : या विधेयकान्वये आरोपीने पोलिसांसमोर दिलेली साक्ष त्याला दोषी ठरविण्यास पुरेशी आहे. विरोधकांचा याच तरतुदीस आक्षेप आहे. तसेच बेहिशेबी मालमत्ता जमा करणाऱ्यांसाठी कडक शिक्षेची तरतूदही यात आहे. या विधेयकातील तरतुदींची अंमलबजावणी केल्यास गुजरातमधीलच अनेक उद्योजक अडचणीत येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

    Kyle Mills
  • डॅनिएल व्हिटोरीपाठोपाठ न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज काईल मिल्स यानेही सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय घेतला.
  • मिल्सने २००४ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी आणि २००१ मध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मिल्सने आतापर्यंत १९ कसोटी सामने खेळले आहेत.
  • एकदिवसीय क्रिकेटसाठी प्रसिद्ध असलेल्या मिल्सने १७० सामन्यात २४० बळी घेतले आहेत. व्हिटोरीनंतर न्यूझीलंडसाठी सर्वाधिक बळी घेणारा हा क्रिकेटपटू आहे. मिल्सचा तीन विश्वकरंडकात न्यूझीलंड संघात समावेश होता.

  • व्हॉट्‌सॲपने आता आपल्या ग्राहकांसाठी मोफत कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
  • ॲण्ड्रॉइड मोबाईल आणि इंटरनेट असल्यास व्हॉट्‌सॲपद्वारे आता मोफत कॉल करता येऊ शकतो.
  • फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी व्हॉट्‌सॲप विकत घेतल्यानंतर त्यात सतत बदल चालू ठेवले आहेत.

  • युद्धजर्जर झालेल्या येमेनमधून ३४९ भारतीय नागरिकांची नौदलाच्या जहाजांतून सुटका करण्यात आली आहे.
  • ऍडन बंदरावरून बोटीने भारतीय नागरिकांना हलवून दिभूती येथे आणण्यात आले आणि तेथून भारताकडे रवाना करण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या भारतीयांमध्ये २२० पुरूष, १०१ महिला व २८ लहान मुलांचा समावेश आहे. 
  • येमेनमध्ये अडकलेल्या सुमारे ४ हजार नागरिकांच्या सुटकेसाठी भारत सरकारने जोरदार मोहिम राबविली आहे. भारतीयांना परत आणण्यासाठी दोन प्रवासी जहाजांबरोबरच आता दोन युद्धनौकाही पाठविल्या आहेत.
  • येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याबरोबरच प्रवासी जहाजांना समुद्री चाच्यांपासून संरक्षण देण्याचे कामही या युद्धनौका करणार आहेत. 
  • येमेनमधील भारतीयांना हवाई आणि समुद्र मार्गाने परत आणण्याची योजना आहे. या मोहिमेमध्ये भारताचे नौदल, हवाई दल आणि एअर इंडिया यांचा समावेश आहे.

  • भूसंपादनाबाबतचा फेरअध्यादेश काढण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. गेल्या महिन्यात लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या विधेयकातील नऊ दुरुस्त्यांचाही या फेरअध्यादेशात समावेश असणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. भूसंपादन विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते, मात्र ५ एप्रिल पूर्वी ते राज्यसभेत मंजूर होणे शक्य नसल्याने फेरअध्यादेशाचा निर्णय घेण्यात आला. भूसंपादन अध्यादेश संसदेमध्ये पाच एप्रिलपूर्वी मंजूर झाला, तरच त्याचे कायद्यातच रूपांतर होणार आहे.
  • भूसंपादन अध्यादेश हा केंद्र सरकारने आपला विशेषाधिकार काढून काढलेल्या सहा अध्यादेशांपैकी एक आहे. यापैकी पाच अध्यादेशांना संसदेची मंजुरी मिळाली आहे. भूसंपादनाबाबतचा फेरअध्यादेश मांडल्यास तो मोदी सरकारचा एकूण अकरावा अध्यादेश असणार आहे.

  • जगातील सर्वांत वृद्ध महिला मिसाओ ओकावा यांचे जपानमध्ये निधन झाले. त्या ११७ वर्षांच्या होत्या. गेल्या महिन्यातच त्यांनी वाढदिवस साजरा केला होता. 
  • ओकावा यांचा जन्म ५ मार्च १८९८ रोजी झाला होता.

  • ज्या ऑपरेटिंग सिस्टीमपासून मायक्रोसॉफ्टने आपली वाटचाल सुरु केली ती ऑपरेटिंग सिस्टीम अर्थात एमएस-डॉस ही ऑपरेटिंग सिस्टीम मायक्रोसॉफ्टने खास लुमिया मोबाईलकरिता सादर केली आहे. 
  • मायक्रोसॉफ्टने विंडोजपूर्वी एमएस-डॉस अर्थात मायक्रोसॉफ्ट डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम सादर केली होती. हळूहळू त्यांनी विंडोजची निर्मिती केली. 
  • डॉसमध्ये केवळ काळ्या रंगाच्या संगणकाच्या पडद्यावर पांढऱ्या रंगात अक्षरे दिसत होती. ज्याला कमांड प्रॉम्प्ट (C:) म्हणतात. त्यावर हव्या त्या कमांडस्‌ लिहून आपले काम करावे लागत होते. त्यासाठी टेक्स्ट स्वरुपात कमांड माहित असणे आवश्यक होते.
  • जुन्या स्मृतींना उजाळा देण्याचा उद्देश या ऑपरेटिंग सिस्टीममागे असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.

  • विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजयी संघाला करंडक देण्याचा मान न मिळाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
  • मुस्तफा कमाल हे विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान चर्चेत आले होते. भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यानंतर कमाल यांनी सामन्यात फिक्सिंग झाल्याचे म्हटले होते. यावरून त्यांच्यावर क्रिकेट वर्तुळातून जोरदार टीका झाली होती. 
  • कमाल यांच्या हस्ते विश्वकरंडक विजयी संघाला करंडक देण्यात येऊ नये, अशी मागणी आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांनी केली होती. श्रीनिवासन यांची मागणी मान्य करत त्यांच्या हस्तेच ऑस्ट्रेलियाला करंडक देण्यात आला होता. तेव्हापासून कमाल नाराज होते.

  • पक्षविरोधी कारवायांमुळे आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी, शिस्तपालन समितीतून हकालपट्टी झालेल्या योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची आता प्रवक्तेपदावरूनही हकालपट्टी करण्यात आली आहे.

1 टिप्पणी: