चालू घडामोडी - ७ मे २०१५


  • ७ मे १८६१ : कविसम्राट रवींद्रनाथ टागोर जयंती

    Akash Missile
  • जमिनीवरून हवेत मारा करणारे सुपरसोनिक क्षेपणास्त्र आकाश लष्करात सामील करण्यात आले आहे.
  • हे क्षेपणास्त्र शत्रूचे हेलिकॉप्टर, विमान आणि मानवरहित विमानांना २५ किलोमीटर अंतरावरून आणि २० किलोमीटरपर्यंत उंचीवर लक्ष्य करु शकते.
  • लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी या क्षेपणास्त्राचे औपचारिक लोकार्पण केले. पुढील २ वर्षात लष्कराला ६०० आकाश क्षेपणास्त्र मिळणार आहेत.
  • हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेद्वारे (DRDO) विकसित करण्यात आले आहे.
  • पूर्णपणे देशी तंत्रज्ञानाने बनलेली ही आकाश क्षेपणास्त्र प्रणाली पूर्णपणे आधुनिक प्रकारची आहे. या क्षेपणास्त्राचे वजन ७२० किलोग्रॅम आहे. आणि लांबी ५.७५ मीटर आहे.
  • याची मारक क्षमता ६० किलोमीटर या शिवाय हे ५५ किलो स्फोटके घेउन प्रवास करू शकते. ध्वनीच्या साडेतीनपट वेगाने हे अस्त्र प्रवास करते.
  • आकाशची संचार व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित आणि अभेद्य आहे. सर्वात आवश्यक याचे स्वतःचे ऑटोमेटेड इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम आहे.
  • आकाश क्षेपणास्त्र प्रणालीत सर्वात आधी थ्रीडी सेंट्रल एक्विजिएशन रडार १०० किलोमीटरच्या अंतरावरूनच शत्रूच्या विमानाचा सुगावा लावतो. ग्राउंड कंट्रोल सिस्टीमला त्वरित याची माहिती दिली जाते. ३ ते १० सेकंदादरम्यान क्षेपणास्त्रांना सतर्क केले जाते. त्यानंतर शत्रुचे विमान २५ किलोमीटरच्या कक्षेत येण्याची प्रतीक्षा केली जाते. त्या कक्षेत विमान आल्यानतंर लगेचच आकाश क्षेपणास्त्र त्याचा भेदते.

  • भारत-बांगलादेश जमीन सीमा करार-२०१३ हे घटनादुरुस्ती विधेयक १८१ विरुध्द शून्य अशा बहूमताने भाजप सरकारने राज्यसभेत मंजूर करुन घेतले.
  • या ११९ व्या घटनादुरुस्तीचे जनक असलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे या प्रसंगी काहीसे भावविवश झाल्याचे चित्र दिसले.
  • लोकसभेत नियोजनानुसार हे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यावर राज्यांकडे जाईल. ५० टक्के राज्य सरकारांच्या मंजुरीनंतर अस्तित्वात येणाऱ्या या कायद्यानुसार दोन्ही देशांनी आपापल्या ताब्यातील सुमारे १६१ भाग परस्परांना सोपविण्याचा मार्ग मोकळा होईल. यानुसार भारताच्या सुमारे २६६ एकर, तर बांगलादेशाच्या ४७२ एकर अशा एकूण ७३८ एकर जमिनीचे परस्परांना हस्तांतर होणार आहे.

  • २०१५चा आबेल पुरस्कार अमेरिकेचे श्रेष्ठ गणितज्ज्ञ जॉन नॅश आणि कॅनडाचे लुईस निरेनबर्ग यांना विज्ञानात हरघडीला उपयोगी पडणाऱ्या ‘पार्शल डिफरन्शियल इक्वेशन’च्या सखोल संशोधनाबद्दल जाहीर करण्यात आला.
  • त्याचं वितरण नॉर्वेचे राजे हेराल्ड यांच्या हस्ते ऑस्लोमध्ये १९ मे रोजी केले जाईल.
  • जॉन नॅश यांना अर्थशास्त्रामधील नोबेल मेमोरियल ॲवॉर्ड १९९४ मध्ये मिळाले होते.
  • आबेल पुरस्काराविषयी ......
    • सुरुवात : २००१ पासून (पहिला पुरस्कार २००३ साली देण्यात आला)
    • आल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या इच्छापत्रात नोबेल पुरस्कारासाठी गणिताची निवड केलेली नाही. त्यामुळे ‘नॉर्वेजियन ॲकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स’ या संस्थेने गणितासाठी आबेल पुरस्कारची सुरुवात केली.
    • महान गणिती नील्स हेन्रिक आबेल (१८०२-१८२९) यांच्या स्मरणार्थ त्यांनी २००३ पासून आबेल पारितोषिक प्रदान करायला सुरवात केली. केवळ २७ वर्षांचे आयुष्य मिळालेल्या आबेल यांच्याबद्दल नॉर्वेमध्ये नितांत आदर आहे.
    • आबेल पुरस्काराचा दर्जाही ‘नोबेल’इतकाच उच्च आहे.

  • पोलिओच्या विरोधात निकराचा लढा देण्यासाठी संयुक्त मोहीम राबविण्यासाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला भारताने मदतीचा हात देऊ केला आहे.
  • पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यात भारताला यश आले आहे. मात्र २२ एप्रिल २०१५ पर्यंत पाकिस्तानात पोलिओचे २१ रुग्ण आढळले असून, अफगाणिस्तानात १ रुग्ण सापडला आहे.

  • गुजरात राज्य रॉकेलमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने केला आहे. राज्यातील दारिद्र्यरेषेखाली (बीपीएल) आणि रॉकेलचा वापर करणाऱ्या ३३ लाख नागरिकांना स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) आणि बर्नर मोफत पुरविण्याचा निर्णय अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने केला आहे.
  • सार्वजनिक वितरण यंत्रणेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या रॉकेलच्या पुरवठ्यात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे हा निर्णय झाला आहे.
  • सध्या अहमदाबाद शहरात पथदर्शी प्रकल्पाच्या रूपात ही योजना राबविली जाणार आहे.

  • अभिनेता सलमान खान यास उच्च न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (८ मे) तात्पुरता जामीन मंजूर केला. सत्र न्यायालयाने हिट ऍण्ड रन प्रकरणात त्याला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली असली तरी त्या आदेशाची प्रत सलमानला संध्याकाळपर्यंत न मिळाल्याने न्या. अभय ठिपसे यांनी हा आदेश दिला.
  • सलमानवरील आरोप आणि कलमे :
    • ३०४ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा.
    • २७९ बेदरकारपणे गाडी चालविणे.
    • ३३७-३३८ गंभीर इजा करणे.
    • ४२७ मालमत्तेचे नुकसान करणे
    • ३४, १८१ मोटार वाहन, मुंबई प्रतिबंधक कायदा
    • १८५ नियमांचे उल्लंघन आणि मद्यपान करून गाडी चालवणे.
  • ‘हिट अँड रन‘ प्रकरणात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानचा चालक अशोक सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी सरकारी वकील अशोक सिंहविरोधात खटला चालवणार आहेत.
  • सन २००२ मध्ये वांद्रे पश्चिम भागात अपघात झाला तेव्हा सलमान खान नव्हे तर आपण गाडी चालवत होतो, असा खोटा जबाब अशोक सिंहने न्यायालयात दिला होता.

  • कॉंग्रेसचा सभात्याग, बीजू जनता दलातर्फे मतदानात असहभाग आणि अण्णा द्रमुकचे विरोधातील मतदान यावर मात करून वस्तू व सेवाविषयक घटनादुरुस्ती विधेयक (जीएसटी) लोकसभेत मंजूर करवून घेण्यात केंद्र सरकारला यश मिळाले.
  • हे (१२२वे) घटनादुरुस्ती विधेयक असल्याने सरकारला दोनतृतीयांश बहुमताने संमत करणे आवश्यक होते आणि लोकसभेत सरकारकडे पुरेसे संख्याबळ असल्याने त्यात अडचण आली नाही.
  • ‘जीएसटी’विषयी सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  • अमेरिकेच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत भारताने इराणसमवेत छाबर पोर्टच्या विकासाठीचा करार केला. सध्या इराण दौर्या वर असलेले केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी हा करार केला.
  • या करारामुळे भारत समुद्रमार्गे अफगाणिस्तानशीही जोडला जाऊन आशियात भारताचा दबदबा वाढणार आहे.
  • या बंदरातून कच्चे तेल आणि युरिया आयात केला जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा