प्रश्नसंच १५३ - चालू घडामोडी


Question Set on Current Affairs[प्र.१] देशभक्ती, प्रगती, संस्कृती यांचा अनोखा संगम असलेला _ _ _ _ _ _ _ हा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मेपासून राज्यात १२ ठिकाणी सुरू होणार आहे.
१] कलांगण
२] मराठी बाणा
३] जय महाराष्ट्र
४] जय हिंद 


१] कलांगण

[प्र.२] १ मे २०१५ पासून भारताने किती देशांना ई-टुरिस्ट व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे?
१] ४५ 
२] ३१
३] ७६
४] ९०


३] ७६
भारताने मागील वर्षीच्या २७ नोव्हेंबरपासून ई-टुरिस्ट व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत नऊ विमानतळांवर ४५ देशांसाठी ई-व्हिसा देण्याची व्यवस्था होती. मात्र १ मे २०१५ पासून या देशांची संख्या आता ७६ वर गेली आहे.

[प्र.३] सरकारी रुग्णालयात ५७० प्रकारची औषधे मोफत देण्यासाठी ‘निरामय’ योजना कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली?
१] गुजरात
२] उत्तर प्रदेश
३] महाराष्ट्र
४] ओडिशा


४] ओडिशा

[प्र.४] संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या जागतिक सुख-समाधान निर्देशांकानुसार १५८ देशांच्या क्रमवारीमध्ये भारताचे स्थान कितवे आहे?
१] १०२
२] ११७
३] १२२
४] १२९ 


२] ११७
जागतिक सुख-समाधान निर्देशांकात देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न, आयु:मर्यादा, सामाजिक आधार व जीवनातील पर्यायांच्या निवडीतील स्वातंत्र्य या निकषांचा विचार केला जातो. स्वित्झलँडने सुखी-समाधानी देशात जगात पहिला क्रमांक पटकावला आहे.

[प्र.५] महाराष्ट्र राज्य सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च सन्मान मे २०१५ मध्ये कोणाला जाहीर झाला?
१] बाबासाहेब पुरंदरे
२] अनिल काकोडकर
३] नरेंद्र दाभोळकर
४] सुनील मनोहर


१] बाबासाहेब पुरंदरे

[प्र.६] परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि आयुष राज्य मंत्री एस. व्हाय. नाईक यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा लोगो प्रकाशित केला. हा लोगो कोणत्या मंत्रालयाच्या विशेष समितीने तयार केला आहे?
१] आरोग्य मंत्रालय
२] आयुष मंत्रालय
३] परराष्ट्र मंत्रालय
४] विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय


२] आयुष मंत्रालय

[प्र.७] लंडनमधील व्हाइटली फंड फॉर नेचर या संस्थेचा ‘ग्रीन ऑस्कर’ हा पुरस्कार नुकताच कोणत्या भारतीयाला प्रदान करण्यात आला?
१] नील मुखर्जी
२] डॉ. प्रमोद पाटील
३] डॉ. अभय बंग
४] डॉ. राणी बंग


२] डॉ. प्रमोद पाटील

[प्र.८] कीनोट ऑडियोज या संस्थेने नुकतेच कोणते पुस्तक श्रवणग्रंथाच्या (ऑडिओ बुक) माध्यमातून उपलब्ध करून दिले?
अ] श्रीमान योगी
ब] मृत्युंजय
क] व्यक्ती आणि वल्ली
ड] श्यामची आई


ड] श्यामची आई
‘श्यामची आई’चे लेखक : साने गुरुजी

[प्र.९] ‘फाईट ऑफ दी सेन्च्युरी’ असे वर्णन करण्यात आलेल्या जागतिक वेल्टरवेट विजेतेपदाच्या बॉक्सिंग लढतीत कोणी विजेतेपद मिळविले?
१] मॅनी पॅकियाओ
२] नॉर्मन मेलर
३] फ्लॉइड मेवेदर ज्युनिअर
४] केन नॉर्टन


३] फ्लॉइड मेवेदर ज्युनिअर

[प्र.१०] गायन आणि अभिनयाच्या बळावर रंगभूमी, चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या जुन्या पिढीतील अभिनेत्री ‘बिंबा मोडक’ यांचे वृद्धापकाळाने मे २०१५ मध्ये निधन झाले. त्यांचे खरे नाव काय होते?
१] ताराबाई सुधाकर मोडक
२] शांताबाई भास्कर मोडक
३] सीता भास्कर मोडक
४] छाया राम मोडक


२] शांताबाई भास्कर मोडक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा