प्रश्नसंच १६२ - भूगोल

आगामी 'विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१४'करीता अतिमहत्वाची प्रश्नावली
घटक : महाराष्ट्राचे हवामान


[प्र.१] दक्षिण कोकणातून उतार कोकणात गेल्यास पावसाचे प्रमाण ___________.
१] वाढत जाते.
२] तेवढेच रहाते.
३] कमी होत जाते.
४] फारसा फरक पडत नाही.


३] कमी होत जाते.

[प्र.२] महाराष्ट्र पठारावरील अवर्षणग्रस्त प्रदेशात पावसाचे प्रमाण ___________ दरम्यान असते.
१] २५ ते ५० सेमी
२] ५० ते १०० सेमी
३] ५ ते २५ सेमी
४] ५० ते ७० सेमी


१] २५ ते ५० सेमी

[प्र.३] मध्य महाराष्ट्रात वार्षिक पावसाचे सरासरी दिवस किती असतात?
१] ७० ते ८०
२] ६० ते ६५
३] ३० ते ५०
४] ४० ते ७०


३] ३० ते ५०

[प्र.४] महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून काळात सर्वात कमी पाउस कोणत्या जिल्ह्यात पडतो?
१] सातारा
२] लातूर
३] अहमदनगर
४] सोलापूर


१] सातारा

[प्र.५] महाराष्ट्रात ___________ मध्ये पावसाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
१] कोकण
२] विदर्भ
३] सह्याद्री पर्वतातील नद्यांचे उगमस्थान
४] मावळ


३] सह्याद्री पर्वतातील नद्यांचे उगमस्थान

[प्र.६] महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे क्षेत्र ___________ मध्ये आढळते.
१] पर्जन्यछायेचा प्रदेश
२] अवर्षण प्रदेश
३] निश्चित पावसाचा प्रदेश
४] जास्त पर्जन्याचा प्रदेश


२] अवर्षण प्रदेश

[प्र.७] आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभावन पट्ट्याच्या स्थानावर ___________ अवलंबून असतो.
१] थंड हवेच्या लाटेचा मार्ग
२] उष्ण हवेच्या लाटेचा मार्ग
३] प्रत्यावर्ताचा मार्ग
४] आवर्ताचा मार्ग


४] आवर्ताचा मार्ग

[प्र.८] विदर्भात सर्वात जास्त पाउस कोणत्या महिन्यात पडतो?
१] जून
२] जुलै
३] ऑगस्ट
४] सप्टेंबर


३] ऑगस्ट

[प्र.९] महाराष्ट्रात सर्वात जास्त वार्षिक पावसाचे दिवस कोठे आहेत? 
१] गगनबावडा (कोल्हापूर)
२] आंबोली (सिंधुदुर्ग)
३] महाबळेश्वर (सातारा) 
४] बांदा (सिंधुदुर्ग)


१] गगनबावडा (कोल्हापूर)
गगनबावडा (१२९ दिवस) | आंबोली (१२५ दिवस) | महाबळेश्वर (११९ दिवस) | बांदा (११० दिवस)

[प्र.१०] महाराष्ट्रातील खालील ठिकाणे वार्षिक पर्जन्याच्या उतरत्या क्रमाने योग्य कोणती ते सांगा?
१] आंबोली, गगनबावडा, माथेरान, महाबळेश्वर
२] आंबोली, महाबळेश्वर, गगनबावडा, माथेरान
३] आंबोली, माथेरान, गगनबावडा, महाबळेश्वर
४] आंबोली, गगनबावडा, महाबळेश्वर, माथेरान


२] आंबोली, महाबळेश्वर, गगनबावडा, माथेरान

२ टिप्पण्या: