प्रश्नसंच १६१ - भूगोल

आगामी 'विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१४'करीता अतिमहत्वाची प्रश्नावली
घटक : महाराष्ट्रातील नदीप्रणाली


[प्र.१] मुळा-मुठा नद्यांचा संयुक्त प्रवाह __________ जवळ भीमा नदीला मिळतो?
१] उदगीर
२] रांजणगाव
३] फलटण
४] शिरूर


२] रांजणगाव

[प्र.२] श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे खालीलपैकी कोणत्या नदीचे/नद्यांचे उगमस्थान नाही?
अ] कृष्णा
ब] वेण्णा
क] कोयना
ड] सावित्री
ई] गायत्री

१] फक्त अ, ब आणि क
२] फक्त अ, ब आणि ड
३] फक्त अ, ब, क आणि ई
४] वरील सर्व


४] वरील सर्व

[प्र.३] महाराष्ट्रात कृष्णा नदीची लांबी किती आहे?
१] ४५१ किमी
२] २६७ किमी
३] २०८ किमी
४] २८२ किमी


४] २८२ किमी

[प्र.४] खालीलपैकी कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने येवून मिळणारी उपनदी कोणती?
१] कोयना
२] पंचगंगा
३] येरळा
४] दुधगंगा


३] येरळा

[प्र.५] महाराष्ट्रात तापी नदीची एकूण लांबी किती आहे?
१] १२० किमी
२] ५४ किमी
३] २८० किमी
४] २०८ किमी


४] २०८ किमी

[प्र.६] जैतापूर खाडी कोणत्या नदीमुळे तयार झाली आहे?
१] काजळी
२] मुचकुंदी
३] सावित्री
४] काजवी


४] काजवी

[प्र.७] गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे?
१] ४१ टक्के
२] ४९ टक्के
३] ५३ टक्के
४] ५४ टक्के


२] ४९ टक्के

[प्र.८] कोणत्या दोन नद्यांच्या संयुक्त प्रवाहावर ‘नेवासे’ वसलेले आहे?
१] गोदावरी-प्रवरा
२] गोदावरी-सिंदफणा
३] प्रवरा-मुळा
४] दारणा-प्रवरा


३] प्रवरा-मुळा

[प्र.९] खालीलपैकी कोणती नदी बीड जिल्ह्यात उगम पावते. नंतर लातूर जिल्ह्यातून कर्नाटकमध्ये प्रवेश करते व पुन्हा लातूर जिल्ह्यातून वाहते? 
१] मांजरा
२] सिंदफणा
३] गोदावरी 
४] तेरणा


१] मांजरा

[प्र.१०] खालीलपैकी कोणती नदी/नद्या महाराष्ट्रात उगम पावत नाहीत?
अ] वर्धा
ब] वैनगंगा
क] पैनगंगा
ड] इंद्रावती

१] अ आणि ब
२] अ, ब आणि क
३] अ, ब आणि ड 
४] वरील सर्व


३] अ, ब आणि ड

४ टिप्पण्या: