प्रश्नसंच १६५ - माहितीची अधिकार, २००५

आगामी 'विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१४'करीता अतिमहत्वाची प्रश्नावली
घटक : माहितीचा अधिकार अधिनियम २००५


RTI 2005 Quiz[प्र.१] भारतात ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ला राष्ट्रपतींनी कधी मंजुरी दिली?
१] ६ डिसेंबर २००५
२] १२ ऑक्टोबर २००५
३] १५ जून २००५
४] १ एप्रिल २००५


३] १५ जून २००५

[प्र.२] ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ मधील कोणत्या कलमामध्ये “माहिती” या शब्दाची व्याख्या देण्यात आलेली आहे?
१] कलम २(क)
२] कलम २(ड)
३] कलम २(ई)
४] कलम २(फ)


४] कलम २(फ)

[प्र.३] केंद्रीय/राज्य माहिती आयोगास कोणत्याही बाबींची चौकशी करताना कोणत्या प्रकारच्या न्यायालयाचे अधिकार निहित करण्यात आलेले आहेत?
१] फौजदारी न्यायालय
२] चौकशी न्यायालय
३] सत्र न्यायालय
४] दिवाणी न्यायालय


४] दिवाणी न्यायालय

[प्र.४] कुठलेही कारण नसताना माहिती अधिकारी माहितीसाठीचाअर्ज घेत नसेल तर कायद्यानुसार किती दंड लागू शकतो?
१] २०० रु. प्रतिदिन परंतु २०००० पेक्षा जास्त नाही.
२] २५० रु. प्रतिदिन परंतु २५००० पेक्षा जास्त नाही.
३] ३०० रु. प्रतिदिन परंतु ३०००० पेक्षा जास्त नाही.
४] ५०० रु. प्रतिदिन परंतु ५०००० पेक्षा जास्त नाही.


२] २५० रु. प्रतिदिन परंतु २५००० पेक्षा जास्त नाही.

[प्र.५] ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’चा खालीलपैकी कोणता उद्देश नाही?
१] सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात पारदर्शकता आणणे. 
२] शासनाला नागरिकांप्रति उत्तरदायित्व निर्माण करणे.
३] राज्य/केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्याविषयी तरतुदी करणे.
४] नागरिकांनी विचारलेल्या सर्व गीष्टींची संपूर्ण माहिती देण्याविषयी तरतूद करणे.


४] नागरिकांनी विचारलेल्या सर्व गीष्टींची संपूर्ण माहिती देण्याविषयी तरतूद करणे.

[प्र.६] ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ मधील कोणत्या कलमामध्ये अपिलाची तरतूद करण्यात आलेली आहे?
१] कलम १८
२] कलम १९
३] कलम २०
४] कलम २१


२] कलम १९

[प्र.७] ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ कायद्यांतर्गत दुसरे अपील दाखल करण्यासाठी किती दिवसांची कमाल मर्यादा आहे?
१] २१ दिवस
२] ३० दिवस
३] ६० दिवस
४] ९० दिवस


४] ९० दिवस

[प्र.८] ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ मध्ये एकूण किती कलमे आहेत?
१] २५
२] २८
३] ३१
४] ३३


३] ३१

[प्र.९] माहितीच्या अधिकाराची चळवळ महाराष्ट्रात सुरु करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणत्या व्यक्तींकडे जाते?
१] श्री. गोपीनाथ मुंढे
२] श्री. शरद पवार
३] श्रीमती. किरण बेदी
४] श्री. अण्णा हजारे


४] श्री. अण्णा हजारे

[प्र.१०] मागितलेली माहिती त्रयस्थ पक्षाशी संबंधित असल्यास अशी माहिती अर्जदारास किती दिवसात मिळणे आवश्यक आहे?
१] ३० दिवस
२] ४० दिवस
३] ६० दिवस
४] ९० दिवस


२] ४० दिवस

५ टिप्पण्या: