चालू घडामोडी - १५ व १६ नोव्हेंबर २०१५


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घराचे लोकार्पण

    Dr. Babasaheb Ambedkar's house in london
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये शिक्षण घेत असताना वास्तव्य केलेल्या लंडन येथील घराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह आरपीआय नेते रामदास आठवले हेही यावेळी उपस्थित होते.
  • वायव्य लंडनमधील १० किंग हेन्री रोडवरील या घरात डॉ. आंबेडकरांनी १९२१-२२ या कालावधीत वास्तव्य केले होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भारताने २०.५० चौ.फुटाचे हे तीन मजली घर ऑगस्टमध्ये विकत घेतले. यासाठी सुमारे चार दशलक्ष पौंड एवढी किंमत मोजावी लागली.
  • या घरात बाबासाहेबांची अत्यंत दुर्मिळ कागदपत्रे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. प्रामुख्याने त्यांनी बोन विद्यापीठाला जर्मन भाषेत लिहिलेले पत्र यातील खास आकर्षण आहे.
 बसवेश्वर यांच्याही पुतळ्याचे अनावरण 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय तत्त्ववेत्ते आणि समाजसुधारक बसवेश्वर यांच्याही थेम्स नदीकाठावरील ‘बोरो ऑफ लॅम्बेथ’ येथील पुतळ्याचे अनावरण केले.

पॅरिसनंतर तुर्कस्तानात अतिरेक्यांचा आत्मघाती हल्ला

  • तुर्कस्तानात जी-२० देशांची बैठक होत असताना ईशान्य तुर्कस्तानात सीरियाच्या सीमेजवळ आयसिसच्या एका संशयित अतिरेक्याने आत्मघाती स्फोट केला.
  • यात चार अधिकारी जखमी झाले असून त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी अंकारा येथे सात संशयितांना अटक केली असून त्याला पॅरिसच्या हल्ल्याची पार्श्वभूमी आहे.
  • पॅरिसमधील १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२९ जण ठार झाले. या हल्ल्यात २० जणांचा सहभाग असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

‘घातक प्रकल्पाला’ केंद्र सरकारची मान्यता

  • देशाच्या पहिल्यावहिल्या मानवरहीत लढाऊ विमानाचे स्वदेशी बनावटीचे इंजिन तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता देण्याचे निश्चित केले आहे. या प्रकल्पासाठी ३,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • 'घातक' असे या इंजिनचे नाव असून, भविष्यात ते हेरगिरीक्षम ड्रोन, अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या लढाऊ विमानांना अथवा टेहाळणीक्षम विमानांनाही वापरता येणार आहे.
  • पारंपरिक विमानांना असणारी शेपटी या ड्रोनच्या डिझाइनमधून गायब करण्यात आली आहे. त्याऐवजी हवेतूनच संपूर्ण ड्रोनचे नियंत्रण करणारी 'फ्लाइट कंट्रोल सिस्टीम' त्यामध्ये बसविण्यात येणार आहे.
  • या प्रकल्पासाठी 'मेक इन इंडिया' अंतर्गत खासगी क्षेत्राचीही मदत घेण्यात येण्याची शक्यता आहे. 
  • गेल्या दोन दशकांपासून कार्यरत असणाऱ्या 'कावेरी प्रकल्पां'तर्गत 'घातक'ची निर्मिती करण्यात येण्याची शक्यता आहे.
 ऑरा 
  • भारतीय बनावटीचे पहिले मानवरहित लढाऊ विमान तयार करण्याच्या प्रकल्पाचे 'ऑटोनॉमस अनमॅन्ड रिसर्च एअरक्राफ्ट' असे (ऑरा) नामकरण केले आहे. 
  • शत्रूच्या रडारच्या टप्प्यात न येणाऱ्या ड्रोनची निर्मिती करणे, हे सध्या 'ऑरा' प्रकल्पासमोरील मुख्य आवाहन असणार आहे. 
  • मानवरहित हलक्या लढाऊ विमानांच्या निर्मितीव्यतिरिक्त केंद्र सरकारतर्फे अत्याधुनिक बहुपयोगी लढाऊ विमान विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे निधन

    Saeed Jaffrey
  • ‘गांधी’, ‘दिल’, ‘अजूबा’ या चित्रपटांमध्ये भूमिका करणारे बॉलीवूड अभिनेते सईद जाफरी यांचे १६ नोव्हेंबर २०१५ रोजी  निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
  • जाफरी यांनी हिंदी चित्रपटांसह ब्रिटीश चित्रपटांमध्येही काम केले होते. गांधी (१९८२), हिना (१९९१) या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका या सर्वांच्याच लक्षात राहण्याजोग्या आहेत.
  • राज कपूर यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. जाफरी यांनी अभिनेत्री मेहरुनिमा (मधुर जाफरी) यांच्याशी विवाह केला होता. मात्र, १९६५ मध्ये हे दोघे वेगळे झाले.

गणेश थापा यांच्यावर दहा वर्षांची बंदी

  • नेपाळ फुटबॉल संघटनेचे प्रमुख गणेश थापा यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने (फिफा) दहा वर्षांची बंदी घातली आहे. तसेच लाओस महासंघाचे कार्याध्यक्ष विफेट सिहाचर्क यांच्यावरही दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे.
  • काही दिवसांपूर्वी नेपाळच्या राष्ट्रीय संघातील खेळाडू सामना फिक्स केल्या प्रकरणात दोषी आढळले होते. त्यात थापा यांच्यावरील बंदीमुळे नेपाळ फुटबॉलची प्रतिमा अधिक मलिन झाली आहे.
  • आपल्या १९ वर्षांच्या कार्यकाळात कोटय़वधी डॉलरचा अपहार केल्याचा आरोप थापा यांच्यावर आहे. बंदीव्यतिरिक्त थापा यांना १९, ८५० अमेरिकन डॉलरचा आर्थिक दंडही ठोठावण्यात आला आहे. 
  • ‘फिफा’च्या शिस्तपालन समितीने थापांवर २००९ आणि २०११च्या फिफा कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीत लाच घेतल्याचा आरोप केला आहे.

निको रोसबर्ग ब्राझिलियन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत विजेता

  • विश्वविजेत्या लुईस हॅमिल्टनवर ७.७ सेकंदाच्या फरकाने कुरघोडी करत मर्सिडिजच्या निको रोसबर्गने ब्राझिलियन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत जेतेपद पटकावले. रोसबर्गने १ तास ३१ मिनिटे ०९.०९ सेकंदात शर्यत पूर्ण केली.
  • रोसबर्गचे यंदाच्या हंगामातील हे पाचवे, तर कारकीर्दीतील १३वे जेतेपद आहे. या विजयासोबत त्याने फॉम्र्युला वन विश्व अजिंक्यपद शर्यतपटूंचे उपविजेतेपदही निश्चित केले.
  • हॅमिल्टनने १ तास ३१ मिनिटे १६.१६ सेकंदात शर्यत पूर्ण करून दुसरे स्थान पटकावले, तर चार वेळा विश्वविजेतेपद जिंकणारा फेरारीचा सेबॅस्टियन वेटेल (१ तास ३१ मिनिटे २३.२४ सेकंद) तिसऱ्या स्थानावर आला.
  • फेरारीचाच किमी रैकोनेन चौथा, तर विलियम्सचा वॉल्टेरी बोट्टास पाचवा आला. फोर्स इंडियाच्या निको हल्केनबर्गला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. संघाच्या गुणतालिकेत फोर्स इंडियाने पाचवे स्थान पटकावले आहे. 

सय्यद अकबरुद्दीन भारताचे युनोमधील कायमस्वरूपी सदस्य

    Syed Akbaruddin is new Indian Ambassador to the United Nations
  • परराष्ट्र मंत्रालयाचे माजी प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांची भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील (यूएन) कायमस्वरूपी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून अकबरुद्दीन यांच्या कामगिरीची प्रशंसा झाली होती.
  • पुढील वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अशोक पंडित यांच्याकडून अकबरुद्दीन सूत्रे स्वीकारतील.
  • संयुक्त राष्ट्रसंघाने आता ७०व्या वर्षांत पदार्पण केले आहे. यानिमित्ताने सर्व १९३ देशांशी चर्चा करून संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल घडविणे आणि सुरक्षा समितीतील कायमस्वरूपी सदस्यांची संख्या वाढविणे हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.
  • सुरक्षा समितीतील कायमस्वरूपी स्थानासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या काळामध्ये अकबरुद्दीन यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अकबरुद्दीन यांची कार्यक्षमता आणि पूर्वीची कामगिरी पाहता ही निवड करण्यात आली आहे.

स्टार्कचा कसोटीमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम

  • ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम नोंदविला आहे. न्यूझीलंडविरूद्ध गोलंदाजी करताना स्टार्कने आज ताशी १६०.४ एवढ्या वेगाने चेंडू टाकला. 
  • रावळपिंडी एक्स्प्रेस अशी ओळख असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आहे. त्याने २००३ मध्ये इंग्लंडविरूद्ध वन-डेत ताशी १६१.३ कि.मी. वेगाने चेंडू टाकला होता.
  • १६० किमी प्रती ताशी वेगाने चेंडू टाकणाऱ्या पाच गोलंदाजांच्या पंक्तीत चार जण ऑस्ट्रेलियाचे आहेत.
खेळाडूवेग (किमी/तास)देश
शोएब अख्तर१६१.३पाकिस्तान
शॉन टेट१६१.१ऑस्ट्रेलिया
जेफ थॉमसन, ब्रेट ली१६०.६ऑस्ट्रेलिया
मिचेल स्टार्क१६०.४ऑस्ट्रेलिया

२ टिप्पण्या: