चालू घडामोडी - १३ डिसेंबर २०१५


भारत व जपान दरम्यान सहकार्याचे नवे पर्व सुरू

    Japanese Bullet train
  • जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांच्या भारतभेटीत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ९७,६३६ कोटी रुपयांचा समझोता व सहकार्य करार झाला. या प्रकल्पामुळे मुंबई ते अहमदाबाद हे ५०८ किमीचे अंतर तीन तासांत कापले जाणार आहे.
  • जपानने भारताशी नवे सहकार्य पर्व सुरू करीत, नागरी आण्विक ऊर्जानिर्मिती क्षेत्रात सहकार्य, संरक्षणविषयक तंत्रज्ञान हस्तांतरण, अकरा औद्योगिक वसाहतींची निर्मिती, दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टा, पश्चिम रेल्वे स्वतंत्र मालवाहतूक मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लाइन निर्मिती प्रकल्प असे बहुविध करार केले आहेत. 
 बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल 
  • जपानशी गुंतवणूक क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा करार बुलेट ट्रेनचा ठरला. भारताचे हे स्वप्न येत्या आठ वर्षांत वास्तवात उतरेल. या प्रकल्पासाठी तंत्रज्ञान हस्तांतरण आणि 'मेक इन इंडिया'च्या तत्त्वावर सहकार्य निश्चित करण्यात आले आहे.
  • या प्रकल्पासाठी जपानच्या जायका या संस्थेने भारताला ५० वर्षांच्या दीर्घ अवधीसाठी ७९ हजार कोटींचे कर्ज देऊ केले आहे. या कर्जावर ०.१ टक्के व्याज आकारण्यात येईल. भारताला १५ वर्षांनंतर या कर्जफेडीची सुरुवात करावयाची आहे. या प्रकल्पाची सुरुवात २०१७मध्ये होणार असून, सात वर्षांत पूर्ण करायचा आहे. दिल्लीतील मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठीही जायका या संस्थेने १.५ टक्के व्याजदराने ३५ हजार कोटींचे कर्ज दिले आहे.
  • बुलेट ट्रेनचा किमान वेग ताशी ३०० किमी असेल. ती एलिव्हेटेड कॉरिडोरमध्ये धावणार आहे. ट्रेनमध्ये ८ ते १६ डबे असतील.
  • संरक्षण उत्पादन करार 
    • जपानशी झालेल्या संरक्षण करारामुळे भारतासाठी यूएस २ या पाण्यात व जमिनीवर उतरू शकणाऱ्या विमानांचा मार्ग मोकळा होईल.
    • अमेरिकेप्रमाणेच भारत जपानसोबतही नौदल कसरती करू शकेल. जपानी संरक्षण प्रणालींचे तंत्रज्ञानही हस्तांतर होईल. 
  • नागरी अणुऊर्जा करार
    • जपानने भारताशी नागरी अणुऊर्जा करारही केला. इतिहासात प्रथमच जपानने अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर स्वाक्षरी न केलेल्या एखाद्या देशाशी हा करार केला आहे.
 ठळक मुद्दे 
  • ‘मेक इन इंडिया फंड’च्या प्रमोशनसाठी जपानकडून १२ अब्ज डॉलर
  • जपान प्रथमच मारुती सुझुकीच्या कार भारतातून आयात करणार
  • जपानी नागरिकांना १ मार्च २०१६ पासून ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ सुविधा
  • उभय देशांत संरक्षण साहित्य आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण होणार
  • सुरक्षा परिषदेतील स्थान निश्‍चित करण्यासाठी जपानकडून मदत होणार
  • सागरी संरक्षणामध्ये तसेच दहशतवादी कारवायांविरोधात दोन्ही देश एकत्र काम करणार

सौदी अरेबियात निवडणुकीत महिला विजयी

  • सौदी अरेबियात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्यांदाच एक महिला नगरसेवक निवडून आली आहे. विशेष म्हणजे मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या मक्का येथे ही महिला निवडणून आली आहे. 
  • सौदी अरेबियामध्ये निवडणुका फक्त स्थानिक पातळीपर्यंतच मर्यादित असतात. आत्तापर्यंत सौदीमध्ये फक्त तीनदा स्थानिक निवडणुका घेतल्या गेल्या आहेत.
  • मुस्लिम समाजाचे सगळ्यात महत्वाचे धार्मिक स्थळ समजल्या जाणाऱ्या मक्का शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीत सलमा बिन्त हिजाब अल-ओतैबी ही महिला विजयी झाली आहे. सौदी अरेबियाच्या इतिहासातील नगरसेवकपदी निवडून येणारी ही पहिली महिला ठरली आहे.
 सौदीतील महिलांनाही मताधिकार 
  • केवळ पुरुषांनाच मतदानाचा अधिकार असलेल्या सौदी अरे‌बियामध्ये नगरपालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत यावेळी प्रथमच महिलांनी मतदान केले.
  • परंतु नोकरशहांनी अनेक अडथळे‌ निर्माण केल्याने तसेच जागृतीचा अभाव असल्याने नोंदणी केलेल्यांपैकी दहा टक्क्यांहूनही कमी महिलांनी मतदान केले. विशेष म्हणजे या निवडणुकीत महिलांना उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची परवानगी देखील देण्यात आली होती.
  • संपूर्ण राजेशाही असलेल्या सौदीमध्ये महिलांना वाहन चालवण्याची परवानगी नाही. शिवाय सार्वजनिक ठिकाणी महिलांना नखशिखांत कपडे परिधान करावे लागतात. महिलांना मताधिकार नाकारणारा सौदी हा एकमेव देश होता.
  • आता लिंगभेद शिथिल करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून सौदीने महिलांना मताधिकार दिला आहे.
  • १२ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीसाठी सहा हजार पुरुष उमेदवारांच्या तुलनेत ९०० महिला उमेदवार उभ्या राहिल्या. अर्थात त्यासाठी त्यांना अनेक अडथळे पार पाडावे लागले.

विकास गौडा रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र

    Vikas Gowda
  • भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा हा पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने (आयएएएफ) रिओ ऑलिम्पिकमध्ये अधिक अॅथलिट्सना सहभागी होता यावे, यासाठी ऑलिम्पिक प्रवेशाच्या निकषांमध्ये बदल केल्यामुळे विकासचे ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित झाले. 
  • एप्रिल २०१५मध्ये निश्चित करण्यात आलेल्या निकषांनुसार रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी थाळीफेकमध्ये पुरुष गटात किमान ६६.०० मीटर फेक करणे आवश्यक होते. आता त्यात बदल करून किमान फेक ६५.०० मीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे.
  • ३२ वर्षीय गौडाने या वर्षी मे महिन्यात जमैकन आमंत्रित अॅथलेटिक्स स्पर्धेत किंग्जस्टन येथे ६५.१४ मीटर फेक केली असल्याने त्याचा ऑलिम्पिक प्रवेश सुकर झाला. 
  • विकासने मागील वर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्याचप्रमाणे आशियाई स्पर्धेतही त्याने अजिंक्यपद मिळवले आहे. विकासची सर्वोत्तम कामगिरी ६६.२८ मीटर अशी असून तो राष्ट्रीय विक्रम आहे.
  • ऑगस्ट २०१५मध्ये बीजिंग येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने ६२.२४ मीटर अशी कामगिरी नोंदवली होती. त्यात तो नवव्या स्थानावर फेकला गेला होता.
  • आयएएएफची २६ नोव्हेंबरला बैठक झाली. त्यात १७ क्रीडा प्रकारासाठी रिओ ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या निकषात बदल करण्यात आला आहे.
  • गौडाप्रमाणेच सपना आणि नीतेंद्र सिंग रावत या भारतीय खेळाडूंनाही ऑलिम्पिक पात्रतेचे निकष बदलल्याचा फायदा झाला आहे. सपता २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीसाठी पात्र ठरली असून नीतेंद्रने ऑलिम्पिकसाठी पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीतील स्थान निश्चित केले आहे.

शेतकरी नेते शरद जोशी यांचे निधन

  • लाखो शेतकऱ्यांची संघटना बांधून त्यांच्यासाठी आवाज उठविणारे शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार आणि ज्येष्ठ विचारवंत शरद जोशी (वय ८१) यांचे १२ डिसेंबर रोजी निधन झाले.
  • भारतीय टपाल सेवेत, तसेच परदेशात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर जोशी यांनी १९७९ मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचे मोठे संघटन राज्यात, तसेच देशात उभे राहिले. 
  • शेतीमालाला रास्त भाव मिळावा, या संदर्भात त्यांच्या आंदोलनांमुळे शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फुटली. त्यांनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. राज्यसभेचे खासदार, केंद्र सरकारच्या कृषीविषयक कार्यबल या संस्थेचे अध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) म्हणून त्यांनी काम पाहिले.
 शरद जोशी यांचा जीवनपट 
  • जन्म : ३ सप्टेंबर १९३५
  • जन्मस्थान : सातारा
  • शिक्षण : एम.कॉम, बॅंकिंग विषयासाठी सी. रॅंडी सुवर्णपदक, आयपीएस (भारतीय टपाल सेवा) परीक्षा उत्तीर्ण
  • खासदार : २००४ ते २०१० राज्यसभेचे सदस्य
  • कार्य :
    • कॉमर्स कॉलेज, कोल्हापूर येथे अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे व्याख्याता, १९५७-१९५८
    • भारतीय टपाल सेवा, प्रथम श्रेणी अधिकारी. १९५८-१९६८ पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीत प्रवर्तक सहभाग.
    • मुलभूत उद्देश : व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाच्या कारभारातील सरकारी हस्तक्षेप कमीत कमी करणे. 
    • ९ ऑगष्ट १९७९ शेतकरी संघटनेच्या कार्याचा शुभारंभ
    • १९७९ पासून ’शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा, उस, तंबाखू, दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेत्वृत्व, त्यासाठी उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने
    • ३१ ऑक्टोंबर १९८२ : देशभरातील शेतकऱ्यांच्या अ-राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना 
    • महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यात शेतकरी आंदोलने स्त्री प्रश्नांची मांडणी
    • चांदवड (जि. नाशिक) येथे ९ व १० नोव्हेंबर १९८६ रोजी अभूतपूर्व शेतकरी महिला अधिवेशन. अधिवेशनात सुमारे दोन लक्ष महिलांची उपस्थिती.
    • स्त्रीशक्तीच्या जागरणात स्त्री-पुरूषमुक्ती, शेतकरी महिला आघाडीची स्थापना, महिलांच्या राजकीय सहभागाची योजना, महिलांच्या संपत्ती अधिकाराची फेरमांडणी
    • ’लक्ष्मीमुक्त’ अभियानाद्वारे स्त्रियांच्या नावे शेती करण्याचे शेतकरी पुरूषांना आवाहन (१९८९). प्रतिसादस्वरूप १९९१ पर्यंत लाखांवर स्त्रियांची नावे जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंदविली गेली.
  • राजकीय व सामाजिक कारकीर्द
    • स्वतंत्रतावादाचा पुरस्कार करण्यासाठी ’स्वतंत्र भारत पक्षा’ची स्थापना (१९९४)
    • देशाची राजकीय,आर्थिक व सामाजिक यंत्रणा पूर्णपणे बदलून टाकण्याची आवश्यकता मांडणारा व त्यासाठी उपाययोजना सुचविणारा अनोखा, मतदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा निवडणूक जाहीरनामा
    • स्वतंत्र भारत पक्षाचे खासदार (राज्यसभा) जुलै २००४ ते जुलै २०१० विशेष पदनियुक्ती
    • अध्यक्ष, स्थायी कृषि सल्लागार समिती, भारत सरकार (१९९० ते १९९१) कॅबिनेट दर्जा. "राष्ट्रीय कृषिनीती " चा मसुदा
    • राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे तसेच स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव आयोजन समितीचे सदस्य 
    • अध्यक्ष, कृषिविषयक कार्यबल, भारत सरकार (सप्टेंबर २००० ते जुलै २००१). कॅबिनेट दर्जा. जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात देशाची अर्थनिती, विशेषत: कृषिनीती कशी असावी याची शिफ़ारस करणारा अहवाल
    • १९९९ : जागतिक कृषिमंच (World Agriculture forum)  सेंट लुई (अमेरिका)च्या सल्लागार मंडळाचे सदस्य
    शरद जोशी यांची ग्रंथसंपदा
    मराठी
    शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धतीप्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश
    चांदवडची शिदोरी - स्त्रियांचा प्रश्नशेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख
    स्वातंत्र्य का नासले?खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने
    अंगारमळाजग बदलणारी पुस्तके
    माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनोबळीचे राज्य येणार आहे
    अर्थ तो सांगतो पुन्हापोशिंद्याची लोकशाही
    भारतासाठीराष्ट्रीय कृषिनीती
    इंग्रजी
    Answering before GodThe Women‘s Question
    Bharat Eye viewBharat Speaks Out
    Down To Earth
    हिंदी
    समस्याए भारत कीस्वतंत्रता क्यों नाकाम हो गई?

  • लिखाण/संपादन
    • शेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र साप्ताहिक ’वारकरी’ चे संपादक व प्रमुख लेखक
    • ’शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’ या पुस्तकाची हिंदी, गुजराती, कन्नड व तेलगू भाषांतरे


  • ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा