चालू घडामोडी - २४ डिसेंबर २०१५


सम-विषम क्रमांकाचा नियमाची अंमलबजावणी

  • प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एकदिवसाआड दिल्लीच्या रस्त्यावर सम आणि विषम क्रमांकाच्या गाडयांना परवानगी देण्याच्या योजनेची कशा प्रकारे अंमलबजावणी करणार याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
  • सम तारखेला सम क्रमांकाच्या गाडया दिल्लीच्या रस्त्यावर धावतील. विषय तारखेला विषम क्रमांकाच्या गाड्यांना रस्त्यावर परवानगी असेल.
  • सम आणि विषम क्रमाकांचा नियम मोडणाऱ्या गाडयांना २००० रुपये दंड आकारण्यात येईल 
  • राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, तसेच रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या यांना सम-विषम क्रमांकांच्या गाड्यांच्या नियमातून वगळण्यात आले आहे.
  • महिला चालक व सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांना यातून सूट देण्यात येणार आहे. मात्र, महिला चालकांसोबत जर पुरुष प्रवास करत असेल तर त्यांच्याडून दंड आकारला जाईल.
  • प्रायोगित तत्वावर पहिले १५ दिवस एक जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान ही योजना राबवण्यात येईल.
  • सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सम आणि विषम क्रमांक गाडी योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल.
  • रविवारी सम आणि विषम दोन्ही क्रमांकाच्या गाडया रस्त्यावर उतरु शकतात.
 प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे इतर देश 
  • कोलंबिया : बगोटामध्ये दोन दिवस वाहनांना बंदी
  • मॅक्सिको : १९८९ पासून आठवड्यात एक दिवस बंदी
  • चीन : बीजिंगमध्ये २००८ पासून ऑलिंम्पिक दरम्यान आठवड्यात एक दिवस बंदी
  • फ्रान्स : पॅरिसमध्ये गरजेनुसार 'ऑड -ईवन नंबरचा फॉर्मूला लागू करण्यात येतो.
  • यूके : सेंट्रल लंडनमध्ये हा नियम लागू
  • नेपाळ : काठमांडूमधील मध्यवर्ती भागात २६ सप्टेंबर २०१५ पासून लागू

सुषमा स्वराज यांचा जानेवारीत परदेश दौरा

  • पश्चिम आशियासोबतचे संबंध बळकट करण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज जानेवारी २०१६मध्ये इस्रायल व पॅलेस्टाईनचा दौरा करणार आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आॅक्टोबरमधील ऐतिहासिक दौऱ्यानंतर स्वराज १६ ते १९ जानेवारीदरम्यान या देशांचा दौरा करतील.
  • स्वराज यांनी यापूर्वी इस्रायलला विश्वासू साथीदार म्हटले होते. त्यानंतर स्वराज यांच्या परराष्ट्रमंत्रिपदी झालेल्या नियुक्तीची इस्रायलने प्रशंसा केली होती.
  • स्वराज २००६ ते २००९ यादरम्यान भारत- इस्रायल मैत्री गटाच्या अध्यक्ष होत्या. तेव्हा त्यांनी इस्रायलचा दौरा केला होता.

मोदींचा अफगाणिस्तान दौरा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर अफगाण संसदेचे उद्घाटन केले. मोदींचा पंतप्रधान म्हणून हा पहिलाच अफगाण दौरा आहे. 
  • भारताच्या ७१० कोटी रुपये मदतीने ही इमारत बांधण्यात आली असून संसद भवन परिसरात ‘अटल भवन’ असून त्याचेही उद्घाटन मोदी यांनी केले. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ हे नामकरण झाले आहे.
  • २००९मध्ये सुरु झालेला अफगाणिस्तानचा संसद भवन प्रकल्प २०११ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती, मात्र त्याला चार वर्षे उशिर झाला.
  • अफगाणिस्तानचे अध्यक्ष : अश्रफ घनी
 नव्या संसद भवनाची वैशिष्ट्ये 
  • सध्याच्या संसद भवनापेक्षा नवी इमारत पाच पटीने मोठी आहे.
  • भारताने या प्रकल्पासाठी ७१० कोटी रुपये दिले होते.
  • संसद भवनावर ३२ डायमीटर रुंदीचा घुमट बांधण्यात आला आहे.
  • हाऊस ऑफ पिपल (वोलेसी जिर्गा) २५६ जण बसतील एवढी आसनक्षमता आहे तर वरिष्ठ सभागृहात (मेश्रानो जिर्गा) १३४ आसन क्षमता आहे.

जगातील सर्वात मोठा वाळूचा 'सांताक्लॉज' भारतात

  • जगभरातील अनेक शहरांमध्ये नाताळचा माहोल तयार झाला असून ख्रिसमसच्या निमित्ताने पुरी येथील बीचवर ४५ फूट उंचीचा वाऴूचा सांताक्लॉज उभारण्यात आला आहे.
  • आर्टिस्ट सुदर्शन पट्टनाईक यांनी हा सांताक्लॉज साकारला असून जगातील सर्वात मोठा वाळूने साकारण्यात आलेला हा सांताक्लॉज असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
  • हा सांताक्लॉज साकारण्यासाठी १००० टनपेक्षा जास्त वाळू वापरण्यात आली. तसेच, अनेक कलर वापरण्यात आले असून आर्टिस्ट सुदर्शन पट्टनाईक यांच्यासह सुदर्शन सॅन्ड ऑर्ट इन्सिट्युटच्या २० विद्यार्थ्यांनीही हा सांताक्लॉज बनविण्यास मेहनत घेतली. हा प्रचंड मोठा वाळूचा सांताक्लॉज साकारण्यासाठी दोन दिवस लागले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा