चालू घडामोडी - ३ डिसेंबर २०१५


मार्क झुकेरबर्गला कन्यारत्नाचा लाभ

    Zuckerberg daughter
  • फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चॅन यांना गेल्याच आठवड्यात कन्यारत्नाचा लाभ झाला. 
  • या नव्या पाहुणीच्या आगमनाने भारावलेल्या झुकेरबर्ग दाम्पत्याने आपल्या कंपनीतील ९९ टक्के शेअर्स 'चॅन झुकेरबर्ग इनिशिएटिव्ह' नावाच्या लिमिटेड लायबिलिटी कंपनीकडे वळवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
  • या निधीतून त्यांची मुलगी मॅक्सिमा आणि जगातील इतर मुलांसाठी हे जग एक 'उत्तम ठिकाण' बनावे, अशी त्यांची इच्छा आहे.
 चॅन झुकेरबर्ग इनिशिएटिव्ह 
  • या कंपनीवर झुकेरबर्गची मालकी आणि नियंत्रण असल्याचे कायदेशीरदृष्ट्या स्पष्ट होते. ही कंपनी असून चॅरिटी किंवा चॅरिटेबल ट्रस्ट नाही.
  • ही कंपनी आपल्या सोयीप्रमाणे पैसा खर्च करू शकेल. मग तो खासगी कामासाठी किंवा नफा मिळवण्यासाठीही असू शकतो.
  • 'चॅन झुकेरबर्ग इनिशिएटिव्ह' स्वयंसेवी संस्थांना निधी देऊ शकेल, खासगी गुंतवणूक करू शकेल किंवा धोरणात्मक चर्चांमध्ये सहभाग घेऊ शकेल. यातून मिळणारा नफा हा त्याच कामाला पुढे नेण्यासाठी वापरला जाईल.
  • झुकेरबर्ग दाम्पत्याने आपल्या कंपनीचे ९९ टक्के शेअर्स चॅरिटीसाठी दान करण्याचे ठरवले आहे, असे वृत्त प्रारंभी प्रसिद्ध झाले होते. मात्र तसे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पॅराजम्पिंगमध्ये शीतल महाजनची दिमाखदार कामगिरी

  • शीतल महाजन या महाराष्ट्रीय महिला खेळाडूने पॅराजम्पिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी केली आहे. 
  • पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आलेल्या शीतलने आर्क्टिक व अंटार्टिका या दोन्ही ध्रुवांवर पॅराजम्पिंग करण्याचा पराक्रम केला आहे.
  • पॅराजम्पिंगचा हा असा थरार करणारी ती पहिलीच भारतीय महिला आहे. शीतलच्या नावावर पाच विश्वविक्रम, १४ राष्ट्रीय विक्रमांची नोंद असून तिने आजवर ६६४ हून अधिक जम्प्स केले आहेत.

विजय चौधरी बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी

  • संयुक्त जनता दल (जदयू)चे ज्येष्ठ आमदार विजय चौधरी यांची बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
  • विजय चौधरी यांच्या नावाचा प्रस्ताव सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी मांडला आणि त्याला दोन्ही बाजूच्या सदस्यांनी अनुमोदन दिले.
  • विजय चौधरी समस्तीपूर जिल्ह्यातील सराईरंजन मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आले आहेत. ते १९८२ मध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी जद(यू)मध्ये प्रवेश केला. यापूर्वीच्या नितीशकुमार मंत्रिमंडळात ते दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते.
  • हंगामी अध्यक्ष सदानंदसिंह यांनी ११ सूचक आणि तेवढय़ाच अनुमोदकांच्या नावांची यादी वाचून दाखविली आणि प्रस्ताव मतास टाकला तेव्हा आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आला.

अनिल कुंबळेचा मुंबई इंडियन्स मार्गदर्शकपदाचा राजीनामा

  • भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघाच्या मुख्य मार्गदर्शकपदाचा राजीनामा दिला आहे.
  • जानेवारी २०१३ पासून कुंबळे मुंबई इंडियन्ससोबत आहे. क्रिकेट संदर्भातील अनेक बाबींना पुरेसा वेळ देण्यासाठी त्याने पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

पानपरागकर्ते मनसुखलाल कोठारी यांचे निधन

    Mansukhbhai Kothari
  • कोठारी उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा, संस्थापक आणि प्रसिद्ध पानपराग या मुखवासाचे जनक मनसुखलाल महादेवभाई कोठारी यांचे ३० नोव्हेंबर २०१५ रोजी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
  • मनसुखलाल कोठारी यांचा जन्म जुलै १९२५ मध्ये गुजरातमधल्या सुरेंद्र नगर जिल्ह्यात नरेली गावात झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी उपजिविकेसाठी कानपूर गाठले.
  • त्यांनी तयार केलेले पानपराग मुखवास गेल्या अनेक दशकांपासून देशात लोकप्रिय आहे.
  • १९८७मध्ये कोठारी यांनी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी कोठारी उद्योगाचे अध्यक्षपद २०१०मध्ये सोडले होते. मनसुखलाल कोठारी यांच्या पार्थिवावर बैरोघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा