चालू घडामोडी : ५ जानेवारी


लष्कराची सोशल मिडीयाबाबत नियमावली

  •  भारतीय लष्कराने ३१ डिसेंबर रोजी सर्व विभाग, उप-विभाग आणि सर्व दलांना पत्रकाद्वारे सोशल मिडियाचा वापर कसा करावा आणि करु नये यासाठी खालील नियमावली तयार केली आहे.
  • फेसबुक अथवा कोणत्याही सोशल नेटवर्किंग साइटवर पोर्न पाहण्यास मनाई.
  • फेसबुक आणि वॉट्सअॅपवर लष्करी गणवेशातील फोटो अपलोड करु नये.
  • सोशल नेटवर्किंग साइटवरील बक्षिस आणि पुरस्कार देणाऱ्या जाहिरातींवर क्लिक करू नये.
  • अशा साइटवर स्वतःची अधिकृत ओळख अथवा माहिती प्रसिद्ध करण्यास मनाई.
  • कोणत्याही साइटवर लष्करी तळावरील आणि शस्त्रांचे फोटो अपलोड करू नयेत.
  • लष्करात कोणत्या पदावर आणि कोणत्या ठिकाणी काम करता याची माहिती देऊ नये.
  • अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नका.
  • जवानांच्या कुटुंबियांनी त्यांच्या बद्दलची कोणताही माहिती सोशल मिडियावर टाकू नये.
  • केवळ प्रोफाइल फोटो नव्हे तर बॅकग्राऊंड फोटो देखील लष्करासंदर्भातील असू नये.
  • वैयक्तिक संगणक अथवा लॅपटॉपमध्ये लष्कराची कोणताही माहिती ठेवू नये.

दुसरी ‘ज्ञानसंगम’ परिषद

  • राष्ट्रीयीकृत बँकांचे भवितव्य ठरविणारी 'ज्ञानसंगम' ही उच्चस्तरीय परिषद १४ ते १६ जानेवारी दरम्यान पुन्हा एकदा पुण्यालगत लोणावळा-खंडाळा परिसरात पार पडणार आहे.
  • या परिषदेचे यंदाचे दुसरे वर्ष असून परिषदेला यावेळीही पंतप्रधानांची उपस्थिती असेल. परिषदेत थेट उपाययोजनांवर भर असेल.
  • गेल्या वर्षी २ व ३ जानेवारी रोजी पुण्यात कोंढवा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंट (एनआयबीएम) मध्ये पहिली ज्ञानसंगम परिषद पार पडली होती.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन, केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सेवा विभागाचे सचिव या परिषदेला उपस्थित राहतील.
  • गेल्या वर्षीप्रमाणेच राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुखांची ही परिषद असेल. यामध्ये बँकांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक सहभागी होतील, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील उच्चपदस्थ सूत्रांनी 'मटा' ला दिली.
  • पहिल्या ज्ञानसंगम परिषदेत देशातील बँकिंग व्यवस्था, बँकांची सद्यस्थिती, बँकांची वाढती अनुत्पादित कर्जे (एनपीए), त्यातून काढावयाचा मार्ग, पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी 'जन -धन' योजना आदी बाबत चर्चा झाली होती.
  • त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याच परिषदेतील मंथनाच्या आधारे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी इंद्रधनुष्य योजनेच्या माध्यमातून सुधारणांचा रोडमॅप जाहीर केला.
  • याच धर्तीवर यंदाही या परिषदेत व्यापक चर्चा होईल. आर्थिक सर्वसमावेशकता, भांडवलवृद्धी, अनुत्पादित कर्ज, बँकरप्सी कोड, बँकांचे विलिनीकरण व पुनर्रचना, पंतप्रधान विमा योजना व त्यासंदर्भातील अडचणी आदी विषयांवर यात चर्चा होणार आहे.

लक्ष्मणची २८१ धावांची खेळी सर्वोत्तम

  • भारताचा माजी फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली २८१ धावांची खेळी हा मागील पन्नास वर्षांतील कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी म्हणून निवडण्यात आली आहे. 
  • ईएसपीएनच्या 'क्रिकेट मंथली' या डिजिटल नियतकालिकातर्फे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये लक्ष्मणला सर्वोत्तम खेळीचा मान मिळाला. क्रिकेटपटू, निवेदक आणि पत्रकार यांनी या सर्वेक्षणामध्ये मतदान केले होते.
  • या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताने १७१ धावा केल्या होत्या त्यापैकी ५९ धावा लक्ष्मणच्या केल्या होत्या. पहिल्या डावात भारत २७४ धावांनी पिछाडीवर असताना लक्ष्मणने ही खेळी करून संघाला संकटातून बाहेर काढले होते. 
  • सर्वोत्तम खेळीमध्ये वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराचे नाव सर्वाधिक चार वेळा आहे. तर इयान बॉथम यांच्या तीन खेळींचा यादीत समावेश आहे. कसोटीमधील ५० सर्वोत्तम खेळींमध्ये वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या १४ खेळींचा समावेश आहे.
  • अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या डावात १० बळी घेतले होते. त्याच्या या कामगिरीला ११वे स्थान मिळाले आहे. तर राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडलेड येथे २३३ आणि नाबाद ७२ धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीला १९वे स्थान मिळाले आहे.

‘फोर्ब्स थर्टी अंडर थर्टी’

  • वयाच्या तिशीतच आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या जगातील ६०० युवकांची यादी ‘फोर्ब्स’ने जाहीर केली. यामध्ये ४५ भारतीय युवकांना स्थान मिळाले आहे. ‘फोर्ब्स थर्टी अंडर थर्टी’ अंतर्गत ‘फोर्ब्स’ने ही यादी जाहीर केली. त्यांना फोर्ब्सने गेम चेंजर असेही म्हटले आहे.
  • फोर्ब्सची ही पंचवार्षिक यादी असून यात जगभरातील विविध क्षेत्रांमधील ६०० युवकांना स्थान मिळाले आहे. हे युवक ग्राहक तंत्रज्ञान, शिक्षण, मीडिया, उत्पादन, उद्योग, कायदा आणि धोरण, विज्ञान आणि कला या वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत.
 या यादीतील काही भारतीय 
  • उद्योग क्षेत्र
  • नीला दास (वय २७) : सिटी ग्रुपच्या उपाध्यक्ष.
  • दिव्या नेत्तिमी (वय २९) :  विकिंग ग्लोबल इन्वेस्टर्सच्या गुंतवणूक सल्लागार
  • विकास पटेल (वय २९) : हेज फंड मिलेनियम मॅनेजमेंटमध्ये वरिष्ठ सल्लागार
  • नील राय (वय २९) :  कॅक्सटन एसोसिएट्सचे इन्वेस्टमेंट एनालिस्ट
  • उपभोक्ता (कंज्यूमर टेक) क्षेत्र
  • रितेश अग्रवाल (वय २२) : ओवायओ रूम्सचे सीईओ आणि संस्थापक. भारतातील १०० पेक्षा अधिक शहरांत २२०० छोट्या-छोट्या हॉटेलचे नेटवर्क तयार केले.
  • गगन बियाणी व नीरज बेरी (वय २८) : स्प्रिंगचे संस्थापक. या दोघांनी असे मोबाइल अॅप बनवले की, ज्याद्वारे हेल्दी फूडची लवकरात लवकर डिलिव्हरी करणाऱ्या दुकानांची माहिती मिळते.
  • करिश्मा शाह (वय २५) : Google X च्या व्यवस्थापिका.
  • मनोरंजन क्षेत्र
  • लिली सिंह (वय २७) : भारतीय वंशाची कॅनेडियन आर्टिस्ट, राइटर आणि कॉमेडियन

नीमुचवाला विप्रोचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

  • अबिद अली नीमुचवाला यांची विप्रो या देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीने नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर या पदावरील विद्यमान टी. के. कुरियन यांना कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून बढती देण्यात आली आहे.
  • माहिती तंत्रज्ञान कंपनी टीसीएसमधून आलेले व विप्रो समूहात गेल्याच वर्षी समूह उपाध्यक्ष म्हणून दाखल झालेले नीमुचवाला हे येत्या १ फेब्रुवारी रोजी नव्या पदाचा कार्यभार स्विकारतील.
  • टीसीएसमधील तब्बल २३ वर्षांच्या अनुभवानंतर नीमुचवाला विप्रो समूहात एप्रिल २०१५ मध्ये समूह अध्यक्ष व मुख्य परिचलन अधिकारी म्हणून दाखल झाले होते.

नवाझ शरीफ यांचा श्रीलंका दौरा

  • पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ ४ जानेवारीपासून तीनदिवसीय श्रीलंका दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात उभय राष्ट्रांत अनेक करारांवर सहमती होण्याची शक्यता आहे.
  • २०१३ नंतर शरीफ यांची ही श्रीलंकेला पहिलीच भेट आहे. या भेटीदरम्यान आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापारविषयक करार होण्याची शक्यता आहे. आरोग्य आणि दहशतवादाला होणारे अर्थसाहाय्य रोखण्यासाठी विशेषत्वाने या दौऱ्यात चर्चा होणार आहे.
  • तीन दिवसांच्या दौऱ्यात शरीफ ऐतिहासिक शहर कँडीला भेट देतील. आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट सेंटर आणि जिना हॉललाही ते भेट देणार आहेत. एप्रिल २०१५ मध्ये राष्ट्राध्यक्ष सिरीसेना यांनी पाक दौरा केला होता.
  • श्रीलंकेचे पंतप्रधान : रनिल विक्रमसिंघे
  • श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष : मैत्रीपाल सिरीसेना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा