चालू घडामोडी : २ मार्च


सेतुभारतम् प्रकल्प

 • वर्ष २०१९ पर्यंत देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंगमुक्त करण्यासाठी सेतुभारतम् प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ४ मार्च २०१६ रोजी नवी दिल्लीत या प्रकल्पाचा शुभारंभ होईल.
 • रेल्वेचे उन्नत पूल किंवा भुयारी मार्ग बांधण्यासाठी या प्रकल्पाअंतर्गत २०८ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी अंदाजे १०,२०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त जुन्या पुलांच्या जागी १५०० नवे पूल बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
 • केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री : नितीन गडकरी

अंतराळवीरांचा अंतराळात ३४० दिवस प्रवास

 • अंतराळात ३४० दिवस प्रवास केल्यानंतर स्कॉट केली व मिखाईल कोर्निएंको हे दोन अंतराळवीर पृथ्वीवर दाखल झाले.
 • गेल्या वर्षी २७ मार्चला स्कॉट (वय ५२) आणि मिखाइल (वय ५५) या दोघांनी ही अवकाश मोहीम सुरू केली होती. हे दोघे ३४० दिवस अंतराळ स्थानकात राहिले.
 • त्यांनी अंतराळात १४ कोटी ४० लाख मैलांचा प्रवास केला आणि जगाला ५,४४० वेळा प्रदक्षिणा घातली. या प्रवासात त्यांनी १०,८८० वेळा कक्षेतील सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवले.
 • प्रदीर्घकाळ अवकाशात राहिल्यानंतर मानवी शरिरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्याच्या प्रकल्पांतर्गत अवकाशात ते गेले होते.
 • या दरम्यान त्यांनी अंतराळात अनेक प्रयोग केले. भविष्यात मंगळ ग्रहावर मनुष्य पाठविण्यासाठी हे प्रयोग उपयुक्त ठरणार आहेत.
 • अंतराळात मानवी जीवनासाठी पूरक बनविण्यात आलेल्या ‘सोयूझ स्पेस कॅप्सूल’ हे रशियन अवकाशयान मध्य आशियात कझाकिस्तानच्या ओसाड प्रदेशात उतरविण्यात आले. 
 • केली यांचे जुळे बंधू निवृत्त अंतराळवीर मार्क केली हे पृथ्वीवरून या प्रकल्पात सहभागी झाले होते. अंतराळामधील वातावरण मनुष्याला कशाप्रकारे बदलतो याचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी पृथ्वीवरून केला.
 • स्कॉट केली यांनी आतापर्यंत चार अवकाश मोहिमा केल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक ५२० दिवस अवकाशात घालवलेले स्कॉट केली हे पहिले अमेरिकी अवकाशवीर ठरले आहेत.

बुलेट ट्रेन प्रकल्प

 • मुंबई-अहमदाबाद अतिजलद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी रेल्वे मंत्रालयाने राष्ट्रीय अतिजलद रेल्वे महामंडळाची स्थापना केली आहे.
 • या महामंडळात रेल्वेचा हिस्सा ५० टक्के असेल तर उर्वरित हिस्सा महाराष्ट्र आणि गुजरात सरकारचा राहील. जपान सरकार या प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ८१ टक्के कर्ज ५० वर्षांसाठी वार्षिक ०.१ टक्के व्याजदराने देणार आहे.
 या प्रकल्पाची वैशिष्ट्ये 
 • या मार्गिकेची लांबी : ५०८ किमी.
 • कमाल वेग : ३५० किलोमीटर प्रति तास
 • परिचालन वेग : ३२० किलोमीटर प्रतितास
 • २०२३ सालापर्यंत वार्षिक प्रवासी : १ कोटी ३० लाख 
 • प्रवासाचा एकूण वेळ : २ तास ७ मिनिटे
 • प्रकल्पाचा एकूण खर्च : ९७,६३६ कोटी रुपये

‘फोर्ब्ज’च्या अब्जाधीशांच्या यादीत बिल गेट्स प्रथम

 • ‘फोर्ब्ज’ने जाहीर केलेल्या २०१६ या वर्षातील अब्जाधीशांच्या यादीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी आपले स्थान अबाधित राखले आहे.
 • ७५ अब्ज डॉलर संपत्तीचे धनी असलेल्या गेट्स यांनी या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, भारतातील ८४ अब्जाधीशांच्या यादीत ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे प्रमुख मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत.
 • एकूण १ हजार ८१० अब्जाधीशांचा समावेश असलेल्या या यादीत बिल गेट्स सर्वोच्च स्थानी आहेत. गेट्स यांनी सलग तिसऱ्यांदा हा मान मिळवला आहे. गेल्या २२ वर्षांत १७ वेळा ते या स्थानावर राहिले आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यांची संपत्ती ४.२ अब्ज डॉलरने कमी झाली आहे.
 • आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलांच्या किंमती कोसळल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सला फटका पडूनही मुकेश अंबानी हे सर्वाधिक श्रीमंत भारतीय ठरले आहेत. जागतिक यादीत ते ३६व्या स्थानावर आहेत. अंबानी यांच्याकडे २०.६ अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे.
 • अंबानी यांच्यासह फार्मा मॅगनेटचे दिलीप संघवी, ‘विप्रो’चे अजीम प्रेमजी आणि ‘एचसीएल’चे सहसंस्थापक शिव नाडर हे जगातील पहिल्या १०० श्रीमंतांच्या रांगेत आहेत.
 • ‘आर्सेलर मित्तल’चे लक्ष्मीनिवास मित्तल, ‘भारती एअरटेल’चे सुनील मित्तल, ‘पोर्ट्स अँड पॉवर मॅगनेट’चे गौतम अदाणी, सावित्री जिंदाल, राहुल बजाज, एन. आर. नारायणमूर्ती आणि आनंद महिंद्रा यांनाही यादीत स्थान मिळाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा