चालू घडामोडी : १९ एप्रिल

जितेंद्र आणि अनिल कपूर यांना राज्य सरकारचे पुरस्कार

 • ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांना राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते अनिल कपूर यांना घोषित करण्यात आला आहे.
 • हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले. तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली, अशा ज्येष्ठ व्यक्तीला राजकपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
 • जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये तर विशेष योगदान पुरस्कारासाठी ३ लाख रुपयांची रक्कम देण्यात येते. 
 • सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जितेंद्र आणि अनिल कपूर यांची पुरस्कारासाठी निवड केली.
 जितेंद्र 
 • ‘गीत गाता चल’या चित्रपटाद्वारे नायक म्हणून जितेंद्र यांनी हिंदी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.
 • जितेंद्र यांनी जवळपास २००हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यातील १००हून अधिक चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत.
 • जिने की राह, हमजोली हे सन १९६८ ते १९७१ या काळातील  त्यांचे सर्वाधिक यशस्वी ठरलेले चित्रपट आहेत.
 अनिल कपूर 
 • हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच हॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे अनिल कपूर जन्माने मुंबईकर आहेत.
 • अनिल कपूर यांनी हमारे तुम्हारे (१९७९) उमेश मेहरा यांच्या हिंदी चित्रपटातून लहान भूमिकेमधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तेजाब (१९८८) हा चित्रपट त्यांचा सर्वाधिक ब्लॉगबस्टर चित्रपट ठरला.
 • अभिनयाबरोबर निर्माता म्हणून अनिल कपूर यांनी बधाई हो बधाई, माय वाईफ्स मर्डर, गांधी माय फादर, शॉर्ट कट, नो प्राब्लेम सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

व्यंगचित्रकार शि. द. फडणीस आणि वसंत सरवटे यांना ‘जीवनगौरव’

 • ‘व्यंगदर्शन २०१६’ या व्यंगचित्रकारांच्या संमेलनात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस आणि वसंत सरवटे यांना व्यंगचित्रकलेतील अमूल्य योगदानाबाबत ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • सन्मानचिन्ह, मानपत्र, ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 • ज्येष्ठ व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या अखिल भारतीय व्यंगचित्रकार संस्था ‘कार्टूनिस्ट कम्बाईन’ संस्थेतर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. 
 • या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते होणार झाले.

विजय मल्ल्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

 • ९ हजार कोटींचे कर्ज थकवलेल्या ‘किंगफिशर‘चे प्रमुख विजय मल्ल्या यांना विशेष न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. 
 • याआदेशामुळे मल्ल्या यांच्या विरोधात इंटरपोलचा रेड कॉर्नर ऍलर्ट जारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
 • आयडीबीआय बॅंकेकडून मिळालेल्या कर्जातील ४३० कोटी रुपये मल्ल्या यांनी परदेशात संपत्ती खरेदी करण्यासाठी वापरल्याचा ‘ईडी‘चा आरोप किंगफिशरने फेटाळून लावला.
 • या ‘ईडी‘च्या दाव्याला किंगफिशर एअरलाईन्सने आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने किंगफिशरची याचिका फेटाळून लावली आहे.
 • आतापर्यंत १८ मार्च, २ एप्रिल आणि ९ एप्रिल अशा तीन वेगवेगळ्या तारखा देऊनही चौकशीला मल्ल्या उपस्थित राहिले नाहीत.
 • सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्या यांना ते व त्यांच्या कुटुंबीयांच्या देशात आणि परदेशात असलेल्या सर्व मालमत्तेचे तपशील २१ एप्रिलपर्यंत जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा