चालू घडामोडी : २० एप्रिल

जोकोविच आणि सेरेनाला  लॉरियस पुरस्कार

  • क्रीडा क्षेत्रातील ‘ऑस्कर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १६व्या लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार सोहळ्यात टेनिसपटूंनी बाजी मारली.
  • वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला क्रीडापटूचा पुरस्कार सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्सने पटकावला. दोघांनी तिसऱ्यांदा या पुरस्कारावर नाव कोरले.
  • गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ओपनसह विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोविचने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा (२०१२, २०१५ आणि २०१६) लॉरियस पुरस्कार मिळवला.
  • २०१५मध्ये तीन ग्रँडस्लॅम मिळलेल्या सेरेनाने यापूर्वी २००३ व २०१० हा पुरस्कार मिळविला आहे.
  • ‘ऑल ब्लॅक्स’ या न्यूझीलंडच्या जगज्जेत्या रग्बी संघाने सर्वोत्कृष्ट संघाचा पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट पुनरागमनासाठीचा पुरस्कार न्यूझीलंडचा रग्बीपटू डॅन कार्टरला मिळाला.
  • तीन वेळचे माजी फॉर्म्युला वन जगज्जेते ऑस्ट्रियाचे निकी लॉड यांना लॉरियस जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • व्यावसायिक फुटबॉलपटू हॉलंडचे जोहान क्रीफ यांना मरणोत्तर ‘स्पिरीट ऑफ स्पोर्ट्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. क्रीफ यांचे मार्च महिन्यात निधन झाले.
  • अन्य खेळांमध्ये जागतिक क्रमवारीतील द्वितीय गोल्फर अमेरिकेचा जॉर्डन स्पीथ याला ‘ब्रेक थ्रू ऑफ द इयर’ आणि ऑलिम्पिक ट्रायथलन सुवर्णविजेता जर्मनीचा जैन फ्रोडैनोला ‘अ‍ॅक्शन स्पोर्ट्स अ‍ॅवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.

पुलित्झर पुरस्कार जाहीर

  • अमेरिकी पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी देण्यात येणाऱ्या पुलित्झर पुरस्कार विजेत्यांमध्ये यंदा ‘द असोसिएटेड प्रेस’ (एपी) व ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्था तसेच ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राचा समावेश आहे.
  • पुरस्कारांचे हे १००वे वर्ष असून न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
  • आग्नेय आशियाई देशांतून अमेरिकी बाजारात येणाऱ्या मासे आणि अन्य सागरी अन्नाच्या व्यापारात मोठय़ा प्रमाणात कामगारांना वेठीला धरले जाते. त्या गैरप्रकारांवर एपीने १० लेखांच्या मालिकेतून प्रकाश टाकला होता.
  • त्यानंतर २००० कामगारांची सुटका होऊन ही यंत्रणा सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. या कार्याबद्दल एपीला पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला. आहे.
  • तर युरोपीय देशांतील निर्वासितांचे प्रश्न छायाचित्रणाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडल्याबद्दल रॉयटर्स आणि न्यूयॉर्क टाइम्सला पुरस्कार मिळाला.
  • पश्चिम आफ्रिकेतील इबोलाच्या साथीबद्दलच्या वृत्तांकनासाठी न्यूयॉर्क टाइम्सला आंतरराष्ट्रीय वृत्तांकनाचा पुरस्कार मिळाला.
  • लॉबींच्या दबावाचा आढावा घेणाऱ्या वार्तांकनासाठी न्यूयॉर्क टाइम्सच्याच एरिक लिप्टन या पत्रकाराने पटकावला.
  • तर याच वृत्तपत्रासाठी फ्रीलान्सर फोटोग्राफर म्हणून काम करणाऱ्या डॅनियल बेरेहुलक याने इबोलासंदर्भातील फ्युचर फोटोग्राफीबद्दल या पुरस्कारावर मोहोर उमटवली.
  • न्यूयॉर्क टाइम्सला आजवर त्यांच्या पत्रकारितेच्या उज्ज्वल परंपरेबद्दल ११७ पुलित्झर पारितोषिके मिळाली आहेत. यंदा त्यात आणखी तीन पुरस्कारांची भर पडली.
  • कॅलिफोर्नियातील सॅन बर्नार्डिनो येथे इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकाडांच्या वृत्तांकनासाठी ‘लॉस एंजल्स टाइम्स’ला पुलित्झर पुरस्कार मिळाला.
  • लॉस एन्जल्स टाइम्सने लेख तसेच टीकात्मक लेखाबद्दल दोन पारितोषिके पटकावली, याशिवाय अमेरिकेतील दि वॉल स्ट्रीट जर्नल आणि वॉशिंग्टन पोस्टलाही प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले.
  • ‘द बोस्टन ग्लोब’, ‘टॅम्पा बे’ आणि ‘द न्यूयॉर्कर’ या नियतकालिकांनाही प्रत्येकी दोन पुरस्कार मिळाले. 
  • कादंबरीसाठीच्या पुलित्झर पुरस्कार अँटोनी डोएर यांना ('ऑल दि लाइट वुई कॅननॉट सी' या कादंबरीसाठी) मिळाला.
  • तर, चरित्रासाठीचा पुलित्झर पुरस्कार डेव्हिड कर्टझर यांना त्यांच्या 'द पोप अँड मुसोलिनी: दि सिक्रेट ऑफ पायस इलेवन्थ अँड दि राइज ऑफ फॅसिझम इन युरोप'या पुस्तकासाठी जाहीर झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा