चालू घडामोडी : २९ एप्रिल

‘आयआरएनएसएस-१जी’चे यशस्वी प्रक्षेपण

  • भारताची संपूर्ण स्वदेशी बनावटीची स्थितिदर्शक यंत्रणा (जीपीएस : ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) २८ एप्रिल रोजी पूर्णत्वास गेली.
  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) श्रीहरीकोटातील सतीश धवन स्पेस सेंटरवरून ‘इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम’ (आयआरएनएसएस) मालिकेतील सातवा उपग्रह अवकाशात यशस्वीरीत्या सोडला. 
  • ‘इस्रो’ने आयआरएनएसएस-१जी या उपग्रहाचे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक ‘पीएसएलव्ही सी-३३’द्वारे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. सात उपग्रहांच्या मालिकेतील हा शेवटचा उपग्रह आहे.
  • हा उपग्रह साधारण महिन्याभराच्या कालावधीत पूर्णपणे कार्यान्वित होईल. भारताची स्थितिदर्शक यंत्रणा अगोदरच कार्यान्वित झाली आहे. मात्र, या सातव्या उपग्रहामुळे ती अधिक कार्यक्षम होणार आहे.
  • आता सर्व उपग्रह, जमिनीवरील रिसिव्हर यंत्रणा, नियंत्रण कक्ष यांच्या चाचण्या येत्या काही दिवसांत पूर्ण होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सिस्टीमला ‘नाविक’ असे नाव बहाल केले आहे.
 अशी आहे यंत्रणा 
  • या यंत्रणेत पृथ्वीभोवती ३६ हजार किलोमीटर उंचीवरून भ्रमण करणारे सात उपग्रह, भूभागावरील देखरेख आणि नियंत्रण करणारे ‘नेटवर्क’ आणि लाभार्थीचा प्रत्येकी एक छोटा रिसिव्हर यांचा समावेश होतो.
  • प्रत्येक उपग्रहाचे वजन सुमारे १४०० किलो असून, त्यावरचे सौर पॅनेल १४०० वॉट ऊर्जा पुरवतील.
  • यातील प्रत्येक उपग्रहासाठी १५० कोटी, प्रक्षेपकासाठी प्रत्येकी १३० कोटी आणि भूभागावरील यंत्रणेसाठी एकूण ३०० कोटी रुपये खर्च आला आहे. 
 स्वदेशी जीपीएसची वैशिष्ट्ये 
  • एकूण सात उपग्रह कार्यान्वित
  • उपग्रहाकडून मिळणारी माहिती स्मार्टफोनवर थेटपणे वापरता येणार 
  • २० मीटर अंतरापर्यंत अचूक माहिती मिळू शकणार 
  • व्याप्ती : संपूर्ण भारताचा भूभाग, तसेच बाहेरील १५ किलोमीटरचा पल्ला 
  • अचूक वेळेसाठी प्रत्येक उपग्रहात आण्विक घड्याळे 
  • १२ महिने २४ तास सेवा मिळणार 
  • उपयुक्त आयुष्य १२ वर्षे 
 मिळणाऱ्या सेवा 
  • स्थितिदर्शन, मार्गनिरीक्षण, मानचित्रण,
  • दळणवळण, सर्वेक्षण, नकाशे तयार करणे
  • विमाने, नौका यांना दिशादर्शनासाठी
  • पर्यटकांना दिशादर्शनासाठी
  • लष्करी उपयोगासाठीच्या इक्रिप्टेड विशेष सेवा
  • आपत्तीमध्ये व्यवस्थापनासाठी
 कार्यप्रणाली 
  • ‘जीपीएस’द्वारे आपल्या ठिकाणाची माहिती अक्षांश, रेखांश व समुद्रसपाटीपासूनची उंची या तीन मितींमध्ये मिळते. 
  • उपग्रहाकडून आलेल्या रेडिओ संदेशाचे रिसिव्हरद्वारे विश्लेषण केले जाते आणि त्यानुसार ती व्यक्ती जमिनीपासून किती उंचीवर, कोणत्या अक्षांश-रेखांशावर आहे हे ठरविले जाते. यासाठी किमान तीन उपग्रहांचे संदेश आवश्यक असतात.
  • अवकाशातील उपग्रहांच्या कक्षांची मांडणी अशी असते, की पृथ्वीवरील यंत्रणा-व्याप्त प्रदेशाच्या कोणत्याही ठिकाणापासून कोणत्याही क्षणाला या प्रणालीतील चार उपग्रह ‘दिसू’ शकतात. त्या ठिकाणच्या ‘जीपीएस’ रिसिव्हरपासून त्या चार उपग्रहांचे अंतर वेगवेगळे असते.
  • उपग्रहांचे स्वतःचे ठिकाण आणि अचूक वेळ ही माहिती आणि प्रकाशाचा वेग यांच्या योगे पृथ्वीवरील रिसिव्हर उपग्रहांपासूनचे स्वतःचे अंतर याची गणना करतो.
  • त्या अंतरातल्या फरकाचा उपयोग करून त्याच्यामध्ये असलेल्या संगणकाच्या साह्याने स्वतःच्या स्थानाबद्दल अचूक माहिती आणि वेळ प्राप्त होते. 
 भारत पाचवा 
  • जगभरामध्ये स्वतःची जीपीएस यंत्रणा विकसित करणारा भारत हा पाचवा देश ठरला आहे. अमेरिकेशिवाय रशियाची ग्लोनास ही यंत्रणा कार्यान्वित आहे.
  • चीन आणि जपान या देशांच्या प्रादेशिक पातळीवरील स्थितिदर्शक प्रणाली कार्यान्वित आहेत, तर युरोपीय महासंघानेही गेल्या तीन वर्षांपासून जीपीएससाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र त्यांची यंत्रणा पूर्णत्वास गेलेली नाही.

उपग्रहांचे प्रक्षेपण
आयआरएनएसएस-१ए जुलै २०१३
आयआरएनएसएस-१बी एप्रिल २०१४
आयआरएनएसएस-१सी ऑक्टोबर २०१४
आयआरएनएसएस-१डी मार्च २०१५
आयआरएनएसएस-१ई २० जानेवारी २०१६
आयआरएनएसएस-१एफ १० मार्च २०१६
आयआरएनएसएस-१जी २८ एप्रिल २०१६

गुजरातमध्ये सामान्य वर्गाला आरक्षण

  • गुजरात सरकारने सामान्य वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासांसाठी १० टक्के आरक्षणाची २९ एप्रिल रोजी घोषणा केली. 
  • आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला आरक्षण देणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या निर्णयाने सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन होणार आहे.
  • यामुळे सामान्य वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना सरकारी नोकरी व उच्च शिक्षणासाठी या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
  • पाटीदार समाजासह ब्राम्हण, क्षत्रिय व लोहना समाजासह इतर सामान्य वर्गातील वार्षिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा कमी असणाऱ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
  • गुजरात दिनाच्या दिवशी म्हणजे एक मे रोजी आरक्षणाची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
  • राज्यात पाटीदार समाजाने हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले होते. यामुळे या समाजाला याचा लाभ घेता येणार आहे.
  • एससी, एसटी आणि ओबीसीसाठी जे ४९ टक्के आरक्षण आहे त्याला हात न लावता हे आरक्षण दिले जाणार आहे.

अमेरिकन काँग्रेससमोर मोदींचे भाषण

  • अमेरिकेतील काँग्रेसच्या संयुक्त परिषदेत भाषण देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजचे अध्यक्ष पॉल रायन यांनी मोदींना निमंत्रण दिले आहे. 
  • राजीव गांधी, पीव्ही नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांना यापूर्वी अमेरिकन काँग्रेससमोर भाषण देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. येथे निमंत्रित करण्यात आलेले मोदी हे भारताचे पाचवे पंतप्रधान आहेत. 
  • हा कार्यक्रम ८ जून रोजी होणार असून, मोदी यांचा हा सत्तेवर आल्यापासून चौथा अमेरिका दौरा ठरेल. 

मादाम तुसाँ संग्रहालयात मोदींचा पुतळा स्थानापन्न

  • आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित मादाम तुसाँ संग्रहालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे २८ एप्रिल रोजी अनावरण करण्यात आले.
  • संग्रहालयातील प्रमुख आकर्षणांपैकी एक असलेल्या ‘वर्ल्ड लीडर्स’ या विभागात हा पुतळा बसविण्यात आला आहे. 
  • महात्मा गांधी, विन्स्टन चर्चिल यांच्यापासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन, जर्मनीच्या अँजेला मार्केल, फ्रान्सचे फ्रँकाईज ओलाँद या जागतिक नेत्यांच्या बरोबरीने मोदींचा पुतळा ठेवण्यात आला आहे. 

उत्तेजकविरोधी नियमांच्या उल्लंघनात भारत तिसरा

  • जागतिक उत्तेजकविरोधी संघटनेने (वाडा) २०१४च्या उत्तेजकविरोधी नियमांच्या उल्लंघनासंदर्भात तयार केलेल्या अहवालात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रशिया आणि इटली हे देश भारतापुढे आहेत.
  • उत्तेजकविरोधी नियमांच्या उल्लंघनाची ९६ प्रकरणे भारतीय खेळाडूंच्या नावे नोंदली गेली असून रशिया (१४८) यात अग्रेसर आहे. त्यानंतर इटलीचा (१२३) क्रमांक लागतो.
  • भारतापाठोपाठ बेल्जियम (९१), फ्रान्स (९१), तुर्की (७३), ऑस्ट्रेलिया (४९), चीन (४९), ब्राझिल (४६) आणि दक्षिण कोरिया (४३) यांचे क्रमांक पहिल्या १०मध्ये लागतात.
  • भारतातील ९६ प्रकरणांमध्ये ७९ खेळाडू (५६ पुरुष व २३ महिला) हे प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यान दोषी आढळले आहेत तर १३ खेळाडू (९ पुरुष व ४ महिला) हे स्पर्धाबाह्य चाचणीत दोषी ठरले आहेत.
  • भारताची ऑलिम्पिकमधील पदकसंख्या पाहिली तर ती १९२०पासून अवघी २४ भरते पण गेल्या काही वर्षांत उत्तेजकांच्या बाबतीत मात्र भारत आघाडीवर असल्याचे हा अहवाल सांगतो.
  • जे भारतीय खेळाडू उत्तेजक नियम उल्लंघनात सापडले आहेत त्यात अॅथलेटिक्समधील खेळाडूंचा सर्वाधिक समावेश आहे. ती २९ प्रकरणे आहेत. यातही भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रशिया (३९) पहिल्या स्थानावर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा