चालू घडामोडी : ४ व ५ मे

रोजगारनिर्मितीत महाराष्ट्र दुसरा

  • असोचॅमने केलेल्या अभ्यासानुसार रोजगारनिर्मितीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिला असून, कर्नाटकने यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
  • २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कर्नाटकने २४ टक्क्यांहून अधिक तर महाराष्ट्राने २३ टक्के रोजगारनिर्मिती केली आहे. 
  • महाराष्ट्रानंतर तमिळनाडूने १०.५ टक्के रोजगारनिर्मिती करत तिसरा क्रमांक पटकाविला असून, आंध्र प्रदेश आणि तेलंगणने नऊ टक्के, हरियाणाने आठ टक्के, तर उत्तर प्रदेशने ७.५ टक्के रोजगारनिर्मिती केली आहे.
  • या क्रमवारीत गुजरात मात्र मागे पडला असून, रोजगारनिर्मितीत राज्याचा सातवा क्रमांक आला आहे.
  • जानेवारी ते मार्च २०१६ दरम्यान देशात एकूण ८.८८ लाख रोजगार निर्माण झाल्याचेही असोचॅमने म्हटले आहे. 
जानेवारी ते मार्च २०१६ दरम्यान निर्माण झालेले रोजगार
क्र. राज्य रोजगार
१. कर्नाटक २,१६,१७९
२. महाराष्ट्र २,००,९९०
३. आंध्र आणि तेलंगण ८२,२८५
४. हरियाणा ७२,१४९
५. उत्तर प्रदेश ६६,७१४

भारतीय वंशाच्या उद्योजकाचे गुगलने खरेदी केले

  • वरुण मल्होत्रा या भारतीय वंशाच्या उद्योजकाने तयार केलेले ‘सिनर्जाइज’ हे टेक्नोलॉजी स्टार्टअप गुगलने खरेदी केले आहे. 
  • गुगलच्या विविध अॅपचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण देण्यासाठी २०१३मध्ये त्यांनी ‘सिनर्जाइज’ तयार केले होते. 
  • याबाबत अधिकृतपणे करार झाला असून या माध्यमातून गुगल अ‍ॅप्सचे प्रशिक्षण ग्राहकांना दिले जाईल. गुगल अ‍ॅप्सचा आभासी प्रशिक्षक म्हणून सिनर्जाइज कंपनीच्या सेवेचा वापर केला जाणार आहे.
  • आवाज व टेक्स्ट यांच्या आंतर प्रतिसादात्मकतेचा उपयोग यात केला जाणार असून त्यांच्या मदतीने अ‍ॅपची निवड करता येईल.
  • सिनर्जाइज आता गुगलचा भाग म्हणून काम करील व गुगल अ‍ॅप्सचा एकात्मिक भाग म्हणून ते वापरण्याचे प्रशिक्षणही दिले जाईल.

सचिन तेंडुलकर आयओएचा सदिच्छा दूत

  • भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) सचिन तेंडुलकरला सदिच्छा दूत होण्याची केलेली विनंती त्याने स्वीकारली आहे. त्यामुळे सलमान, अभिनव बिंद्राबरोबरच आता सचिनही रिओ ऑलिम्पिकचा सदिच्छा दूत असेल.
  • सलमान खानची नियुक्ती सदिच्छा दूत म्हणून करण्यात आल्यानंतर ऑलिम्पिक पदकविजेता मल्ल योगेश्वर दत्त व धावपटू मिल्खा सिंग यांच्यासह अनेकांनी सलमानच्या नियुक्तीवर टीका केली होती.
  • त्यानंतर आयओएने अभिनव बिंद्रा, सचिन तेंडुलकर, संगीतकार ए.आर. रेहमान यांना सदिच्छा दूत होण्याची विनंती केली होती. बिंद्रा व तेंडुलकर यांनी ही विनंती स्वीकारली आहे.

भारतीय नौदलाचे आगामी प्रमुख सुनील लांबा

  • भारतीय नौदलाचे आगामी प्रमुख हे व्हाईस ऍडमिरल सुनील लांबा असणार आहेत.
  • सध्याचे नौदलप्रमुख ऍडमिरल आर के धोवन हे येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. यानंतर लांबा हे भारतीय नौदलाची धुरा सांभाळणार आहेत. लांबा हे नेव्हिगेशन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.
  • नवे नौदलप्रमुख लांबा यांच्यावर अनेक आव्हानांच्या यशस्वी व्यवस्थापनाची जबाबदारी असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा