चालू घडामोडी : ११ मे

आता बचत खात्यावर शून्य रक्कम असल्यास दंड नाही

  • बॅंकेतील बचत खात्यात काहीच (शून्य) रक्कम शिल्लक नसल्यास बँक दंड म्हणून त्याच्या खात्यावरील रक्कम उणे (मायनस) करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) घेतला आहे.
  • आरबीआयने या संदर्भात बँकांना दिलेल्या सूचनेनुसार, बचत खात्यातील किमान रक्कम (मिनिमम बॅलेन्स) शून्य झाल्यानंतर देखभाल शुल्क (मेंटनंन्स चार्जेस) न आकारण्याचे आदेश दिले आहेत.
  • बचत खात्यात रक्कम शिल्लक नसताना त्यावर कोणतीही बॅंक दंड किंवा शुल्क आकारत असल्यास ग्राहक त्याची आरबीआयकडे तक्रार करू शकतो.
  • १ एप्रिल २०१५ पासून आरबीआयने बँकांना तसे न करण्याची सूचना दिली होती. आता त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
  • ज्या ग्राहकाच्या बचत खात्यात रक्कम शिल्ल्क नसेल अश्या ग्राहकांना आगाऊ सूचना देण्यासही आरबीआयने सांगितले आहे.

छोट्या इमारतींनाही पर्यावरणविषयक नियम लागू

  • छोट्या इमारतींची वाढती संख्या लक्षात घेऊन अशा इमारतींनाही पर्यावरणविषयक नियम लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, त्याबाबतचा धोरण मसुदा सरकारने जारी केला. यावर नागरिकांना ६० दिवसांत हरकती-सूचना सादर करायच्या आहेत.
 या मसुद्यातील ठळक मुद्दे 
  • स्थानिक प्रशासनाकडून इमारतींना परवानगी देतानाच उपरोक्त बाबींची पूर्तता होणार आहे की नाही, हे पडताळून पाहिले जाईल.
  • सध्याच्या नियमांनुसार २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक बिल्टअप क्षेत्र असलेल्या इमारती वा बांधकामांना पर्यावरणविषयक व्यवस्था करावी लागते. त्यात बदल प्रस्तावित आहे. त्यानुसार, पाच हजार चौरस मीटर ते २० हजार चौरस मीटर इतके बिल्टअप क्षेत्र असलेल्या इमारतींसाठी हा मसुदा लागू होईल.
  • इमारतींची बांधणी करताना धूळ, धूर व इतर साहित्याचा नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी बॅरिकेड्स व इतर प्रतिबंधक सुविधा उभारणे आवश्यक. 
  • या मसुद्यानुसार इमारतींमधील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर टाकाऊ पाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था इमारतींना करावी लागेल. पाणी साठवणूक, रेनवॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापन याचीही व्यवस्था इमारतींना करावी लागेल. 
  • इमारतींमधील सार्वजनिक क्षेत्रात एलईडी वा सौरदिवे अनिवार्य असतील.

एमसीएक्सच्या एमडी व सीईओपदी मृगांक परांजपे

  • मल्टि कमॉडिटी एक्स्चेंज अर्थात एमसीएक्स या वायदे बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मृगांक परांजपे यांची निवड झाली आहे.
  • परांजपे यांची ही निवड तीन वर्षांसाठी आहे. एमसीएक्समध्ये येण्याआधी मृगांक परांजपे हे डॉइश बँकेच्या डीबी सेंटरचे राष्ट्रीय प्रमुख म्हणून कार्यरत होते.
  • कामकाज, जोखीम व्यवस्थापन, मत्ता व्यवस्थापन, बँकिंग व्यवहार आदी क्षेत्रांचा त्यांना २५ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा