चालू घडामोडी : ७ जून

मोदींना अफगाणिस्तानच्या सर्वोच्च नागरी सन्मान

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अफगाणिस्तानच्या सर्वोच्च नागरी सन्मान “आमिर अमानुल्लाह खान” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • हेरातमधील ऐतिहासिक अफगाण-भारत मैत्री धरणाचे उद्घाटन केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घानी यांनी मोदींना हा सन्मान प्रदान केला आहे.
  • हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय आणि जगातील थोडक्यात परदेशी नेत्यांमधील एक आहेत.
 आमिर अमानुल्लाह खान पुरस्कार 
  • अफगाणिस्तान नागरिकांसोबतच परदेशी नागरिकांनी केलेल्या सेवेची प्रशंसा करण्यासाठी अफगाण सरकारद्वारा दिला जाणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
  • अफगाणिस्तान सरकारने वर्ष २००६ मध्ये या पुरस्काराची स्थापना केली.
  • हा पुरस्कार, अफगाणिस्तानचे राष्ट्रीय नायक, अमानुल्लाह खान (गाजी) यांच्या नावावर दिला जातो. जे अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्य लढाईतले लढवय्ये होते.
  • राष्ट्रीय नायक, राजा अमानुल्लाह यांनी अफगाणिस्तानच्या आधुनिकतावादी संविधानाचे नेतृत्व केले आणि त्यात समान अधिकार व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे मुद्दे समाविष्ट केले.
  • त्यांनी देशाचे आधुनिकीकरण केले. मुली आणि मुलांकरीता शाळा सुरू केल्या तसेच युरोप व आशियासोबत अफगाणिस्तानचा व्यापार वृध्दींगत केला.
  • राजा अमानुल्लाह यांचे भारतासोबत मजबूत संबंध होते आणि वर्ष १९२९ मध्ये ते काही कालावधीकरीता येथे आले होते.
याआधी हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती
सिबगातुल्लाह मुजादिदी पूर्व अफगाणिस्तानचे राष्ट्रपती
अब्दुल सलाम अजिमी अफगाणिस्तानचे मुख्य न्यायाधीश
जॉर्ज बुश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
नुरसूल्तान नजरबायेव कजाकिस्तानचे राष्ट्रपती
रिसेप तईप एरडोगन तुर्किचे राष्ट्रपती
जेम्स जोन्स नाटाचे जनरल
कार्ल एकेनबेरी अफगाणिस्तानमधील अमेरिकेचे राजदूत

आरबीआयचे द्वैमासिक पतधोरण जाहीर

  • रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना, रेपो रेट ६.५० टक्क्यांवर आणि रोख राखीव गुणोत्तर (सीआरआर) ४ टक्क्यांवर कायम ठेवले आहे. 
  • यापुढील काळात मान्सूनची प्रगती आणि विविध आर्थिक घडामोडी विचारात घेऊन पुढील पतधोरण आढाव्यात व्याजदरकपातीबाबत विचार केला जाईल, असे आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले.
पतधोरण आढावा ठळक वैशिष्ट्ये
दर पूर्वीचा नवीन
रेपो दर ६.५ ६.५
रिव्हर्स रेपो दर
मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी
बँक रेट
सीआरआर

पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर

  • तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटून व्दिपक्षीय संबंधांचा आढावा घेणार आहेत तसेच अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनामध्ये भाषण करणार आहेत. 
  • अमेरिकन काँग्रेसमध्य भाषण करणारे ते भारताचे पाचवे पंतप्रधान आहेत. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरुन मोदी अमेरिका दौऱ्यावर आले आहेत.  
  • स्वित्झर्लंड दौऱ्यावरुन मोदी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. या दौऱ्यात मोदींनी न्यूक्लियर सप्लायर ग्रुपमध्ये (एनएसजी) भारताच्या समावेशासाठी महत्वपूर्ण असलेला स्वित्झर्लंडचा पाठिंबा मिळवला. स्वित्झर्लंड एनएसजीचा सदस्य आहे. 
  • २०१४ पासून मोदी यांचा हा चौथा अमेरिका दौरा असून, सध्या मोदी पाच देशाच्या दौऱ्यावर आहेत. अफगाणिस्तानवरुन कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि त्यानंतर मोदी मेक्सिकोला जाणार आहेत. 
  • अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अमेरिकेने काही प्राचीन मुर्त्या भारताला परत केल्या आहेत.
  • यात जैन मुर्ती, ब्रॉंझच्या गणेशमुर्तीचा समावेश आहे. चोरी किंवा अन्य मार्गाने अमेरिकेत आलेल्या २०० मुर्त्या प्राचीन भारतीय मुर्त्या अमेरिका भारताला परत करणार आहे.

‘जीआरडीआय’मध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर

  • जागतिक किरकोळ उद्योग विकास निर्देशांकामध्ये (जीआरडीआय) भारताने ३० विकसनशील देशांच्या यादीत १३ क्रमांकांनी झेप घेत सध्या दुसरे स्थान पटकावले आहे.
  • देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढ व थेट परकी गुंतवणुकीमध्ये पारदर्शीपणा या निकषांवर भारताने या यादीमध्ये दुसरे स्थान मिळविले आहे. या यादीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे.
  • २०१३ ते २०१६ या आर्थिक वर्षांदरम्यान यामध्ये भारताच्या किरकोळ बाजारात ८.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, वार्षिक विक्रीचा आकडा १० अब्ज डॉलरच्यावर (१ ट्रिलीयन) गेला.
  • जगभरातील विकसनशील देशांमध्ये उद्योगांना पूरक अशा देशांमध्ये भारत आता दुसऱ्या क्रमांकावर पोचला आहे.
  • ‘ग्लोबल रिटेल डेव्हलपमेंट इंडेक्स’तर्फे दरवर्षी ३० विकसनशील देशांना ही क्रमवारी देण्यात येते. किरकोळ क्षेत्रातील व्यापारासाठी हे देश किती सुलभ व अनुकूल आहेत या निकषांवर ही श्रेणी ठरवली जाते.
  • उद्यमशीलतेमध्ये सातत्य दाखवणारे या यादीतील पहिले पाच देश : चीन, भारत, रशिया, व्हिएतनाम, चिली 

पुदुच्चेरीत व्हीआयपींच्या सायरन वापरावर बंदी

  • पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी अतिमहत्त्वाच्या (व्हीआयपी) व्यक्तींच्या वाहनांवरील सायरनच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राजभवनातील सुरक्षा रक्षक वाहनांचा देखील सामावेश आहे.
  • रुग्णवाहिकांना आणि अग्निशमन दलाच्या वाहनाना मात्र सायरनचा वापर करता येणार आहे. मात्र, व्हीआयपी वाहनांचे विशेषाधिकार रद्द करण्यात आले आहेत.
  • व्हीआयपी वाहनांसाठी आता वाहतूक थांबविली जाणार नसून, सामान्य लोकांची या वाहनांमुळे गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.
  • प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांना वाहतूक नियमनासाठी योग्य संख्येत कर्मचारी व अधिकारी नेमण्याचे आदेश दिले असल्याचेही या प्रसिद्धीपात्राकामध्ये म्हटले आहे.

सेरेना जगातील सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू

  • ‘फोर्ब्स’ने जगातील गेल्या वर्षभरात जास्त कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यात टेनिसपटू सेरेना विलियम्स जगातील सर्वाधिक जास्त कमाई करणारी महिला खेळाडू ठरली आहे.
  • ‘फोर्ब्स’ च्या सर्वेक्षणानुसार, सेरेना विलियम्सने गेल्या वर्षभरात सर्वाधिक २८.९ दशलक्ष डॉलर्सची कमार्इ केली आहे. तर गेली ११ वर्षे मारिया शारापोवा ही सर्वाधिक जास्त उत्पन्न मिळवणारी खेळाडू होती. 
  • मारिया शारापोवाची यंदाच्या वर्षातील कमार्इ २१.९ दशलक्ष डॉलर्स आहे. नायके, पोर्श, टॅग हायर, अमेरिकन एक्सप्रेस अशा बड्या ब्रँडसाठी मारिया शारापोवा काम करत होती.
  • पण वर्षाच्या सुरूवातीलाच तिच्यावर उत्तेजक द्रव्य सेवनाचा ठपका लागला. त्यामुळे काही प्रायोजक कंपन्यांनी तिच्यासोबत काम करण्यास तयार झाला नाहीत. याचा परिणाम तिच्या आर्थिक व्यवहारात दिसून आला. 
सर्वांत महागड्या महिला खेळाडू
क्र. खेळाडू कमाई (दशलक्ष डॉलर्स)
१. सेरेना विलियम्स २८.९
२. मारिया शारापोवा २१.९
३. रोंडा रौसी १४
४. डॅनिका पॅट्रीक्स १३.९
५. अॅग्निएझ्का रदवांस्का १०.२

उमंग बेदी फेसबुकचे भारतातील नवे एमडी

  • सोशल नेटवर्किंगमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकने भारतातील व्यवस्थापकीय संचालकपदी उमंग बेदी यांची नियुक्ती केली आहे. 
  • सध्या फेसबुकच्या भारतातील व्यवस्थापकीय संचालकपदी किर्थिगा रेड्डी आहेत. त्यांच्या जागी उमंग बेदी यांची निवड करण्यात आली आहे. किर्थिगा रेड्डी या अमेरिकेतील फेसबुकच्या मुख्यालयात उच्च पदावर काम करणार आहेत. 
  • उमंग बेदी हे फेसबुकच्या आधी अॅडोब कंपनीच्या दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. 
  • आशियातील इतर देशांच्या तुलनेत सध्या भारतात फेसबुक वापरकर्त्यांचे प्रमाण जास्त आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा