चालू घडामोडी : १७ जून

स्वदेशी ‘हिंदुस्थान टर्बो ट्रेनर-४०’चे यशस्वी उड्डाण

  HTT 40
 • पूर्णपणे देशी बनावटीच्या ‘हिंदुस्थान टर्बो ट्रेनर-४०’ (एचटीटी-४०) या विमानाने बेंगळुरूमध्ये संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे शुभारंभीय उड्डाण केले.
 • वैमानिकांच्या सुरुवातीच्या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी या विमानाचा वापर करण्यात येणार आहे. भारतीय हवाई दल ७० ‘हिंदुस्थान टर्बो ट्रेनर-४०’ विमानांची खरेदी करणार आहे
 • दोन जणांची बसण्याची क्षमता असलेल्या या विमानाची निर्मिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने केली आहे.
 • या विमानाचे वजन २८०० किलोग्रॅम  असून यामध्ये ९५० एसएचपी क्लास टर्बो प्रॉप इंजिनचा वापर केला आहे.
 • हवाई दलाच्या सध्याच्या मागण्या विचारात घेऊन डिझाइन करण्यात आलेल्या विमानात प्रशिक्षण विमानासाठी शस्त्रास्त्रांचा समावेश करण्याचाही विचार करण्यात आला आहे.

युवा व बालसाहित्य पुरस्काराची घोषणा

 • साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या इंफाळ येथे झालेल्या बैठकीत २०१६साठीच्या युवा पुरस्कार आणि बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
 • मराठी भाषेतील युवा पुरस्कारासाठी मनस्विनी लता रवींद्र यांच्या ‘ब्लॉगच्या आरश्यापल्याड’ या लघुकथासंग्रहाची निवड करण्यात आली.
 • तर बालसाहित्य पुरस्काराने राजीव तांबे यांना बालसाहित्याच्या क्षेत्रातील त्यांच्या एकंदर कामगिरीबद्दल पुरस्कृत करण्यात आले आहे. 
 • कोंकणी भाषेतील युवा पुरस्कारासाठी अन्वेषा अरुण सिंगबाळ यांच्या ‘सुलुस’ काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली.
 • तर बालसाहित्य पुरस्कारासाठी दिलीप बोरकर यांच्या ‘पिंटूची कल्लभोनवड्डी’ या लघुकादंबरीची निवड करण्यात आली. 
 • पन्नास हजार रुपयांचा धनादेश आणि गौरवचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. बालसाहित्य पुरस्कारांचे वितरण १४ नोव्हेंबर म्हणजे बालदिनी केले जाते.

भारतातून चहाची विक्रमी निर्यात

 • गेल्या आर्थिक वर्षात (२०१५-१६) भारतातून २३२.९२ दशलक्ष किलो चहाची निर्यात झाली आहे. त्याबदल्यात देशाला ४,४९३.१० कोटी रुपये मिळाले आहेत.
 • यामुळे भारताला ३५ वर्षांनंतर चहा निर्यातीत २३० दशलक्ष किलोचा टप्पा पार करण्यात यश आले आहे.  यापुर्वी १९८०-८१ साली देशातून २३१.७४ दशलक्ष किलो चहाची निर्यात झाली होती.
 • गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातीचे प्रमाण १७ टक्क्यांनी वाढले आहे. रशिया, इराण, जर्मनी, पाकिस्तान, बांग्लादेश, संयुक्त अरब अमिरात आणि पोलंडसारख्या देशांनी अधिक चहा खरेदी केल्याने निर्यात वाढली आहे. 
 • गेल्या संपुर्ण आर्थिक वर्षात देशात १,२३३.१४ दशलक्ष टन चहाचे उत्पादन झाले. हे आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन आहे.

ब्रिटनमध्ये महिला खासदाराची हत्या

 • ब्रिटनमध्ये विरोधी पक्ष लेबर पार्टीतल्या ४१ वर्षीय महिला खासदार जो कॉक्स यांची हत्या झाली. उत्तर इंग्लंडस्थित जो कॉक्स यांच्या परिसरातच त्यांची हत्या करण्यात आली आहे.
 • त्यांच्यावर आधी चाकूने हल्ला केला आणि नंतर गोळी झाडण्यात आली. ही घटना ब्रिटिशच्या युरोपीय संघ सदस्यत्वाच्या पार्श्वभूमीवर घडल्याची शक्यता आहे.  
 • कॉक्स इंग्लंडमध्ये होणाऱ्या २३ जूनच्या जनमत संग्रहाच्या आधी ब्रिटेन युरोपीय संघात राहण्याचे समर्थन करत होत्या.
 • यार्कशर पोलिसांनी ५२ वर्षांच्या एक व्यक्तीला या हत्येप्रकरणी अटक केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा