चालू घडामोडी : २२ ऑगस्ट

क्रीडा पुरस्कार २०१६ जाहीर

  • बॅडमिंटनपटू  पी. व्ही. सिंधू, कुस्तीपटू साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि नेमबाज जितू राय यांना भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.
  • साक्षीने यंदा कुस्तीत कांस्यपदक जिंकत देशाला रिओ ऑलिम्पिकमधील  पहिले पदक मिळवून दिले.
  • तर ५२ वर्षांत पहिल्यांदा भारतीय जिम्नॅस्ट म्हणून रिओत उतरलेल्या त्रिपुराच्या २३ वर्षांच्या दीपाने वॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरीसह चौथे स्थान घेतले.
  • पी.व्ही. सिंधूने ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला बॅडमिंटन महिला एकेरीचे रौप्यपदक मिळवून दिले.
  • तसेच भारताचा उत्कृष्ट नेमबाज जितू राय यानेदेखील ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
  • देशाच्या क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेला ‘खेलरत्न’ चार क्रीडापटूंना एकत्र दिला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • महाराष्ट्राचे खेळाडू ललिता बाबर आणि अजिंक्य रहाणे यांच्यासह एकूण १५ जणांचा अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
  • जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांच्यासह एकूण ६ जणांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 
  • सुरुवात : १९९१ (प्रथम विजेता : विश्वनाथन आनंद)
  • पुरस्काराचे स्वरूप : पदक, प्रशस्तीपत्र आणि ७.५ लाख रुपये रोख
  • २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी अर्थात राष्ट्रीय क्रीडादिनी प्रदान करण्यात येणारा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
  • राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार २०१६ : 
    • पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन)
    • दीपा कर्माकर (जिम्नॅस्टिक्स)
    • जितू राय (नेमबाजी)
    • साक्षी मलिक (कुस्ती) 
 अर्जुन पुरस्कार 
  • सुरुवात : १९६१ 
  • पुरस्काराचे स्वरूप : रु. ५ लाख रोख, कांस्य धातू पासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र
  • राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी अर्थात राष्ट्रीय क्रीडादिनी प्रदान करण्यात येतो.
  • अर्जुन पुरस्कार २०१६ : 
    • अजिंक्य रहाणे (क्रिकेट) 
    • ललिता बाबर (ऍथलेटिक्स) 
    • शिवा थापा (मुष्टियुद्ध) 
    • अपूर्वी चंडेला (नेमबाजी) 
    • रजत चौहान (तिरंदाजी) 
    • सौरव कोठारी (बिलियर्डस) 
    • सुब्रत पॉल (फुटबॉल) 
    • राणी (हॉकी) 
    • व्ही. आर. रघुनाथ (हॉकी) 
    • गुरप्रितसिंग (नेमबाजी) 
    • सौम्यजित घोष (टेबल टेनिस) 
    • विनेश फोगट (कुस्ती) 
    • अमित कुमार (कुस्ती) 
    • संदीपसिंग मान (पॅरा-ऍथलेटिक्स) 
    • वीरेंद्रसिंह (कुस्ती) 
 द्रोणाचार्य पुरस्कार 
  • सुरुवात : १९८५
  • पुरस्काराचे स्वरूप : रु. ७ लाख रोख, कांस्य धातू पासून बनलेला द्रोणाचार्यांचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र
  • गत तीन वर्षात क्रीडा प्रशिक्षक म्हणून सतत केलेल्या असामान्य कामगिरीबददल हा पुरस्कार दिला जातो.
  • द्रोणाचार्य पुरस्कार २०१६ : 
    • नागापुरी रमेश (ऍथलेटिक्स) 
    • सागर दयाल (मुष्टियुद्ध) 
    • राजकुमार शर्मा (क्रिकेट) 
    • विश्वेश्वर नंदी (जिम्नॅस्टिक्स) 
    • प्रदीप कुमार (जलतरण) 
    • महावीरसिंह (कुस्ती) 
 ध्यानचंद पुरस्कार 
  • सुरुवात : २००२
  • पुरस्काराचे स्वरूप : रु. ५ लाख रोख आणि प्रमाणपत्र
  • ध्यानचंद पुरस्कार महान भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ दिला जातो.
  • ध्यानचंद पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट प्रदर्शन तसेच सक्रीय क्रीडाजीवनातून निवृत्तीनंतरही क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी  दिला जातो.
  • ध्यानचंद पुरस्कार २०१६ : 
    • गीता सत्ती (ऍथलेटिक्स) 
    • सिल्व्हानस डुंग डुंग (हॉकी) 
    • राजेंद्र प्रल्हाद शेळके (रोईंग) 

सानियाला सिनसिनाटी ओपनचे विजेतेपद

  • भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा स्ट्रायकोव्हाच्या साथीने सिनसिनाटी ओपनच्या महिला दुहेरीत विजेतेपद मिळविले.
  • बार्बरा स्ट्रायकोव्हाच्या साथीने जिंकलेले हे सानिया मिर्झाचे पहिलेच विजेतेपद आहे.
  • या सामन्यात सानिया मिर्झाने आपली आधीची सहकारी मार्टिना हिंगीस आणि कोको वॅन्देवेग जोडीवर ७-५, ६-४ असा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला.
  • या विजयासोबतच सानियाने महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत वैयक्तिकरित्या अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. या आधी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस संयुक्तरित्या अव्वल स्थानावर होत्या.

जपानला चक्रीवादळांचा तडाखा

  • जपानला माइंडल व लायनरॉक या चक्रीवादळांनी झोडपले असून गेल्या दोन दिवसांमध्ये जपानला बसलेला हा वादळाचा तिसरा तडाखा आहे.
  • जपानच्या राजधानीत टोकयोमध्ये जवळपास ११० मैल किंवा १८० किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारे वाहत असून त्यामुळे विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
  • टोकयोस योकोहामा व सेंदाई या दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये वादळाचा जास्त फटका बसला आहे.
  • २१ ऑगस्ट रोजी कोम्पासू या वादळाने होकैदो या बेटाला धडक दिल्यानंतर २४ तासांच्या आत दोन वादळांनी या देशाला झोडपले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा