चालू घडामोडी : २५ ऑगस्ट

‘देवी’ नष्ट करणाऱ्या हेण्डरसन यांचे निधन

 • ‘देवी’ हा भीषण आजार नष्ट करणाऱ्या डोनाल्ड अ‍ॅन्स्ली हेण्डरसन यांचे वयाच्या ८७व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. ते डी. ए. या टोपणनावाने ओळखले जात.
 • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आणि ‘जागतिक आरोग्य संघटने’त (डब्लूएचओ) हेण्डरसन यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे.
 • ‘व्हॅरिओला मेजर’ विषाणूमुळे होणारा हा आजार संसर्गजन्य असूनही, त्याच्या विरोधातील आव्हान त्यांनी पेलले. हा आजार बळावलेल्या युगोस्लाव्हियातून त्यांची लढाई सुरू झाली होती.
 • १ जानेवारी १९६७ रोजी ‘डब्लूएचओ’ने देवी निर्मूलन कार्यासाठी प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली.
 • त्यानंतर ‘डब्लूएचओ’ची देवी निर्मूलन मोहीम भारतासह ७० देशांत पोहोचली. १९७४ मध्ये ते नवी दिल्लीतही आले होते.
 • ९ डिसेंबर १९७९ रोजी ‘देवी’ निर्मूलनात संपूर्ण यश आल्याचे जाहीर करण्यात आले.
 • जॉर्ज बुश तसेच बिल क्लिंटन या राष्ट्राध्यक्षांच्या काळात अमेरिकी प्रशासनात विज्ञान व तंत्रज्ञान धोरणाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.
 • सप्टेंबर २००१मध्ये अमेरिकेतील जागतिक व्यापार केंद्रावरील हल्ल्यानंतर सरकारने आपत्कालीन सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली.
 • जागतिक आरोग्य संघटनेतील कार्याबद्दल १९८५मध्ये औषधशास्त्रातील अल्बर्ट श्वाइट्झर आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच २००२मध्ये अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या राष्ट्राध्यक्ष पदकाने त्यांना गौरवण्यात आले होते.

भारतीय वंशाच्या दोन महिलांना व्हाइट हाऊस शिष्यवृत्ती

 • भारतीय वंशाच्या दोन महिलांची प्रतिष्ठेच्या व्हाइट हाऊस शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांना अमेरिकेच्या सरकारसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
 • २०१६-१७ या वर्षांच्या शिष्यवृत्तीसाठी निवडण्यात आलेल्या १६ जणांमध्ये कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅस्ट्रोफिजिस्ट अंजली त्रिपाठी आणि शिकागोच्या डॉक्टर टीना शहा यांचा समावेश आहे.
 • शाह या फुप्फुसे आणि इतर गंभीर आजारावरील डॉक्टर आणि संशोधक आहेत. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना आरोग्यसुविधा पुरविण्यासाठी त्या कार्यरत आहेत. त्यांनी नुकतीच शिकागो विद्यापीठातून फेलोशिप पूर्ण केली आहे.
 • फुप्फुसांचा आजार असलेल्या रुग्णांना आरोग्यसुविधा पुरविण्याबाबत त्यांनी संशोधन केले आहे. पेनिस्लाव्हिया विद्यापीठातून त्यांनी एम.डी. ही पदवी घेतली आहे.
 • त्रिपाठी या खगोलशास्त्रज्ञ असून ग्रहांची निर्मिती आणि उत्क्रांती हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. त्यांनी हॉर्वर्ड विद्यापीठातून पीएच.डी. मिळविली आहे.
 • निवडण्यात आलेल्या या शिष्यवृत्तीधारकांना सरकारच्या विविध निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांना वरिष्ठ पातळीवर कौशल्य दाखविण्याची संधी मिळते.

दिव्यांगांसाठी ‘सुगम्य पुस्तकालय’

 • डोळ्यांनी वाचण्याखेरीज अन्य ज्ञानेंद्रियांनी आस्वाद घेता येईल, अशा स्वरूपातील ‘सुगम्य पुस्तकालय’ या अंधांसाठीच्या ऑनलाइन ग्रंथालयाचा केंद्र सरकारने शुभारंभ केला.
 • दिव्यांगांनाही (अपंग) जीवनाच्या सर्व क्षेत्रांत समान संधी मिळावी, यासाठी राबविल्या जात असलेल्या ‘सुगम्य भारत’ या योजनेचा एक भाग म्हणून व ‘डिजिटल इंडिया’मध्ये या लोकांनाही सामावून घेण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
 • ‘सुगम्य पुस्तकालय’ हा दृष्टिहीनांना डोळ्यांनी न वाचताही अन्य स्वरूपात आकलन होईल, अशा स्वरूपातील लिखित साहित्याच्या जगभरातील साहित्याचे संकलन असलेला ‘ऑनलाइन प्लॅटफॉर्म’ आहे.
 • सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाने ‘डेसी फोरम ऑफ इंडिया’च्या सदस्य संघटनांच्या मदतीने व टीसीएस अ‍ॅसेस तंत्रज्ञानाने हे पुस्तकालय तयार केले आहे.
 • याशिवाय ‘नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर’ने (एनआयसी) भारत सरकारच्या १०० वेबसाइट दिव्यांगस्नेही करण्याचे काम हाती घेतले आहे.

इटलीत भूकंपात २५० लोकांचा बळी

 • इटलीत २४ ऑगस्ट रोजी पहाटे झालेल्या शक्तिशाली भूकंपात आत्तापर्यंत २५० लोकांचा बळी गेला आहे.
 • या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर एवढी असून भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.
 • एमाट्रिस, एकुमोली आणि अरकाटा डेल टोरँटो या गावात आणि लगतच्या परिसरात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे.
 • भूकंपग्रस्त भागातील मदतकार्यावर देखरेख ठेवण्यासाठी पंतप्रधान मॅट्टीओ रेन्झी यांनी त्यांचा नियोजित फ्रान्स दौरा रद्द केला आहे.
 • जगभरात पास्त्यासाठी प्रसिद्ध असलेलं इटलीतील अमाट्रिस शहर या भूकंपात जमीनदोस्त झाले आहे.
 • यापूर्वी २००९मध्ये इटलीतील मध्य अब्रुझो प्रांतात तीव्र स्वरुपाचा भूकंप आला होता. यात ३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

ट्विटरवर नरेंद्र मोदींचे सर्वाधिक फॉलोअर्स

 • ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या भारतीयांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आले आहेत.
 • आतापर्यंत अमिताभ बच्चन यांचे सर्वाधिक फॉलोअर्स होते, परंतु अमिताभ यांना मागे टाकत मोदी एक नंबरवर आले आहेत.
 • अमिताभ बच्चन यांचे ट्विटरवर २ कोटी २० लाख फॉलोअर्स आहेत तर मोदी यांचे ट्विटरवर २ कोटी २१ लाख एवढे फॉलोअर्स आहेत.
 • याशिवाय जगात राजकिय नेत्यांमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या नेत्यांच्या यादीमध्ये मोदींचा समावेश आहे.
 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना सर्वाधिक फॉलो केले जाते. ओबामानंतर ट्विटरवर फॉलो केले जाणारे मोदी हे दुसरे राजकिय नेता आहेत.
 • २००९ पासून मोदी ट्विटरवर अॅक्टीव्ह आहेत. मोदींनी आपल्या अनेक कँम्पेनचे प्रमोशन करण्यासाठी ट्विटरचा वापर केला  आहे.

प्रधानमंत्री जनविकास योजना

 • देशभरात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रत्येक राज्यात सद्भावना मंडप निर्माण करण्यात येणार आहेत.
 • ही योजना विशेष करून अल्पसंख्य समुदायांसाठी असून त्यासाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
 • या केंद्रांमध्ये अल्पसंख्यांकांना कौशल्यआधारित प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच तेथे समुपदेशन, तक्रार निवारण केंद्रही असेल.
 • या समुदायातील विवाहसमारंभ तसेच अन्य महत्त्वाच्या कामांसाठी या केंद्रांचे सभागृह वापरता येणार आहे.
 • ही योजना नवी नसून आधीच्या सरकारने ती मांडली होती. विद्यमान सरकारने तिचे ‘प्रधानमंत्री जनविकास योजना’ असे नामकरण केले आहे.
 • या योजनेचे कामकाज केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या देखरेखीखाली चालणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा