चालू घडामोडी : ३० ऑगस्ट

पश्चिम बंगालचा नामकरण प्रस्ताव मंजूर

 • पश्चिम बंगाल विधानसभेने राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
 • केंद्राच्या मंजुरीनंतर पश्चिम बंगालला बंगालीमध्ये बांगला (Bangla), हिंदीत बंगाल (Bangal) व इंग्रजीमध्ये बेंगाल (Bengal) या नावाने ओळखले जाईल.
 • फाळणीच्या वेळी ब्रिटीश राज्यकर्त्यांनी बंगालचे पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल असे विभाजन केले होते.
 • यातले पूर्व बंगाल हे पाकिस्तानच्या ताब्यात होते. १९७१ मध्ये पूर्व बंगालला पाकिस्तानमधून स्वातंत्र्य मिळाले आणि बांगलादेश अस्तित्वात आला.
 • पूर्व बंगालच अस्तित्वात नसेल पश्चिम बंगाल नावाची गरज काय असा सवाल पश्चिम बंगालकडून नेहमीच विचारला जायचा. त्यामुळे हे नामकरण करण्यात आले.
 • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री : ममता बॅनर्जी

भारत आणि अमेरिकेदरम्यान संरक्षण करार

 • परस्परांची जमीन, सामुग्री, हवाई हद्द आणि नौदल तळ वापरण्याच्या महत्वाच्या करारावर भारत आणि अमेरिकेने स्वाक्षरी केली आहे.
 • अमेरिका दौऱ्यावर गेलेले संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री अॅश्टन कार्टर यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या.
 • या करारानुसार एकमेकांच्या देशांमध्ये जाणारी लढाऊ विमाने आणि युद्धनौकांना परस्परांच्या देशांमध्ये इंधन भरणे शक्य होणार आहे.
 • हा करार व्यावहारिक संपर्क आणि आदान-प्रदानासाठी संधी उपलब्ध करून देणारा आहे.
 • या करारामुळे दोन्ही देशांच्या लष्करांदरम्यान सामान नेण्याबाबतचे सहकार्य, पुरवठा आणि सेवांचे आदान-प्रदान करणे शक्य होणार आहे.
 • या करारात संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापाराबाबतच्या सहकार्यावर विशेष जोर देण्यात आले आहे.
 • या करारानुसार दोन्ही देश एकमेकांच्या युद्धतळांवर इंधन, पाणी आणि अन्नासारख्या गरजेच्या साधनांचे आदान-प्रदान करू शकणार आहेत.
 • तथापि, या कराराचा अर्थ भारताच्या भूमीवर अमेरिकी सैन्य तैनात करणे असा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 • भारताच्या एखाद्या मित्र देशाविरूद्ध जर अमेरिकेने युद्ध छेडले, तर भारत अमेरिकेला अशी परवानगी देणार नाही.
 • हा करार म्हणजे भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे.

योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक

 • २०१२मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तने कांस्य पदक पटकावले होते. योगेश्वरला याच लढतीसाठी आता रौप्यपदक मिळणार आहे. 
 • २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये ६० किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवलेल्या रशियन बीसीक कुडखोव्हच्या डोप चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याची पदके काढून घेण्यात आली आहेत.
 • चारवेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला आणि दोन ऑलिम्पिक पदके मिळवणाऱ्या कुडखोव्हचा २०१३ मध्ये दक्षिण रशियामध्ये कार अपघातात मृत्यू झाला.
 • आयओसीच्या नियमांतर्गत कुडखोव्हचे रौप्यपदक आता योगेश्वर दत्तला मिळणार आहे.
 • हे पदक मिळाल्यानंतर योगेश्वरही भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू सुशीलकुमार, नेमबाज विजयकुमार यांच्या पंक्तीत जाऊन बसेल.
 • त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत रौप्य पदक पटकावणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरेल.

गुगल इंडिया व गोवा सरकारदरम्यान समझोता करार

 • गुगल इंडियाने गोव्यात इंटरनेट क्रांती करण्याचे ठरविले असून त्यासाठी गुगल व गोवा सरकारने मिळून समझोता करारावर सह्या केल्या.
 • राज्यातील महिलांमध्ये डिजिटल साक्षरता वाढविणे व नववी ते बारावीर्पयतच्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे इंटरनेट कसा वापरणे याचे शिक्षण द्यावे असे लक्ष्य गुगल व राज्य सरकारने मिळून समोर ठेवले आहे.
 • याबरोबरच राज्यातील सर्व लहान उद्योगांना ऑनलाईन आणले जाणार आहे. इंटरनेटवर त्यांना स्थान असेल.
 • लघू व मध्यम स्वरुपाचे धंदे करणाऱ्या व्यावसायिकांसाठी इंटरनेट सुरक्षा प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातील. तसेच सरकारच्या सर्व वेबसाईट्स मोबाईलफ्रेण्डली केल्या जाणार आहेत. 

ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचे निधन

 • ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचे ३० ऑगस्ट रोजी पहाटे पुण्यातील त्यांच्या घरी निधन झाले. त्यांचे वय ९० वर्षे होते.
 • नाझी भस्मासुराचा उदयास्त, विन्स्टन चर्चिल, अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष ही त्यांची पुस्तके गाजली होती.
 • कानिटकर यांनी अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ या पुस्तकाच्या अनुवादामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले.
 • अनेक महापुरूषांची चरित्रे त्यांनी शब्दबद्ध केली होती. जागतिक राजकारणाचा त्यांचा अभ्यास दांडगा होता.
साहित्य संपदा
इतिहास व चरित्रे
माओ क्रांतीचे चित्र आणि चरित्र रक्तखुणा
इस्रायल : युद्ध, युद्ध आणि युद्धच कालखुणा
अडॉल्फ हिटरलची प्रेमकहाणी हिटलरचे महायुद्ध
कादंबऱ्या
खोला धावे पाणी शहरचे दिवे
होरपळ कथासंग्रह
मनातले चांदणे सुखाची लिपी
पूर्वज आणखी पूर्वज
आसमंत लाटा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा