चालू घडामोडी : १७ ऑक्टोबर

भारत आणि रशिया नैसर्गिक वायू पाईपलाईन

 • सैबेरियामधून नैसर्गिक वायू वाहून नेण्यासाठी जगातील सर्वांत मोठी पाइपलाइन उभारण्यावर भारत आणि रशियाची सहमती झाली आहे.
 • या प्रकल्पासाठी सुमारे २५ अब्ज डॉलर खर्च येणार आहे. या पाइपलाइनमुळे भारत ‘रशियन गॅस ग्रीड’शी जोडला जाणार आहे.
 • गॅस वाहून आणणारी ही पाईपलाईन हिमालयातून उत्तर भारतात येईल व ती ४,५०० ते ६,००० किलोमीटरची असेल.
 • सर्वाधिक उर्जा वापरात भारताचा क्रमांक जगात तिसरा आहे. त्यामुळे भारताची उर्जेची भूक अतिशय मोठी आहे.
 • त्यामुळेच केंद्र सरकार थेट रशियातून नैसर्गिक वायू पाईपलाईनच्या माध्यमातून देशात आणणार आहे.
 • मात्र इतकी मोठी पाईपलाईन उभारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
 • या पाइपलाइनमधून गॅस वाहून नेण्यासाठी प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिटसाठी १२ डॉलर खर्च येईल.
 • भारताची इंजिनीअर्स इंडिया लि. (ईआयएल) आणि रशियामधील गॅस कंपनी गॅझप्रोम यांच्यात या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी करार झाला आहे.
 • त्यामध्ये ओनएनजीसी विदेश लि., जीएआयएल इंडिया लि. आणि पेट्रोनेट एलएनजी लि. या कंपन्यांचाही समावेश आहे.

ब्रिक्स रेटिंग एजन्सी स्थापण्याचा निर्णय

 • बिक्स समूहातील देशांनी एकत्र येऊन उगवत्या अर्थव्यवस्थांसाठी नवी पतनिर्धारण संस्था (ब्रिक्स रेटिंग एजन्सी) स्थापण्याचा निर्णय घेतला आहे 
 • सध्या अस्तित्वात असणाऱ्या क्रेडिट रेटिंग एजन्सीजवर असलेला पाश्चिमात्य प्रभाव पुसून काढण्यासाठी नव्याने रेटिंग एजन्सी स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • ब्रिक्स (ब्राझिल, रशिया, इंडिया, चीन, दक्षिण आफ्रिका) समूहातील देशांमध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या वास्तव्य करीत असून, त्यांची एकत्रित अर्थव्यवस्था १६.६ लाख कोटी डॉलरच्या घरात आहे.
 • गुंतवणूकदारांची होणारी ही दिशाभूल टाळण्यासाठी ब्रिक्स समूहातील अन्य देशांच्या मदतीने नवी क्रेडिट रेटिंग एजन्सी उभारण्यात येणार आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार

 • ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेमा मे ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत.
 • युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांचा पहिलाच युरोपबाहेरील देशाचा दौरा असणार आहे.
 • लघू आणि मध्यम उद्योगांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह थेरेसा मे भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.
 • यावेळी थेरेसा मे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील तंत्रज्ञान परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
 • कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने या परिषदेचे आयोजन केले आहे.
 • युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यामुळे ब्रिटनमधील अनेक कंपन्यांना नव्याने करार करायला लागणार आहेत. त्यामुळेच मे भारत भेटीवर येणार आहेत.

चीनच्या शेंझोऊ ११ अवकाशयानाचे यशस्वी प्रक्षेपण

 • दोन अंतराळवीरांचा समावेश असलेल्या शेंझोऊ ११ या अवकाशयानाचे चीनने १७ ऑक्टोबर रोजी यशस्वीपणे प्रक्षेपण केले.
 • हे अवकाशयान दोन दिवसांनी पृथ्वीची परिक्रमा करणाऱ्या तियानगोंग २ अंतराळ प्रयोगशाळेला जोडले जाणार आहे.
 • येथे हे दोन अंतराळवीर एक महिना थांबणार असल्याने अशा प्रकारची चीनची ही पहिली सर्वांत मोठी मोहीम ठरणार आहे.
 • हे अंतराळवीर चीनच्या अवकाशातील प्रायोगिक स्पेस स्टेशनच्या जोडणीचे काम करणार आहेत.
 • जिंग हेपेंग आणि चेंग डोंग अशी या दोन अंतराळवीरांची नावे आहेत. जिंग यांची ही तिसरी, तर चेंग यांची ही पहिलीच अवकाश मोहीम आहे.
 • ‘लॉंग मार्च-२ एफ’ या प्रक्षेपकाच्या मदतीने शेंझोऊ ११ला अवकाशात सोडण्यात आले.
 • हे दोघेही अवकाश प्रयोगशाळेतील एक महिन्याच्या कालावधीत विविध तंत्रज्ञानांची चाचणी घेणार असून, काही प्रयोगही करणार आहेत.
 • २०२०पर्यंत अवकाशात अवकाशकेंद्र उभारण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा आहे.
 • दोन प्रायोगिक विभागांची जोडणी झाल्यानंतर २०२२पासून स्पेस स्टेशन पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल. हे स्पेस स्टेशन साधारण दशकभर कार्यरत राहिल.
 • अंतराळात माणूस पाठविण्याची ही चीनची सहावी वेळ आहे. मात्र, ३० दिवस हा चीनच्या आतापर्यंतच्या मानवी सहभाग असलेल्या मोहीमांपैकी सर्वाधिक काळ असेल.
 • यापूर्वी २०१३सालच्या अंतराळ मोहीमेत चीनच्या अंतराळवीरांनी अवकाशात १५ दिवस व्यतीत केले होते.

डॉ. रजनीश कुमार यांना तरुण वैज्ञानिक पुरस्कार

 • उदयोन्मुख वैज्ञानिक डॉ. रजनीश कुमार यांना नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस (नासी) व स्कॉप्स यांचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • नॅचरल गॅस हायड्रेट्समध्ये अडकलेला मिथेन बाहेर काढण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • अभिनव संशोधन करणाऱ्या तरुण संशोधकांना हा पुरस्कार दिला जातो.
 • अनेक कंपन्यांशी संलग्न राहून डॉ. कुमार यांनी गॅस हायड्रेट्सचे रेणवीय पातळीवर संशोधन केले आहे.
 • हायड्रेटची ऊर्जा क्षमता व मरिन गॅस हायड्रेट्सच्या साठय़ातून शाश्वत साधनांची निर्मिती करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
 • त्यांचे संशोधन नेहमीच्या चौकटीबाहेरचे आहे त्यात ऊर्जा व पाणी यावर लक्ष केंद्रित केलेले आहे.
 • हायड्रेट्समधून काढलेला मिथेन हा अपारंपरिक जीवाश्म इंधन मानला जातो, हायड्रेट्समधील मिथेनचे मोठे साठे भारतात आहेत. त्यामुळे पुढील १०० वर्षांची ऊर्जा गरज भागू शकते.
 • कुमार यांनी २००३मध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या बंगळुरूच्या संस्थेतून स्नातकोत्तर पदवी घेतली.
 • त्यानंतर कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातून रसायन अभियांत्रिकीत पीएच.डी. केली.
 • परदेशातील सारी प्रलोभने सोडून २०१०मध्ये ते पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत दाखल झाले.
 • पीएनएएस, जेएसीएस, यांसारख्या अनेक नामवंत नियतकालिकांत त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
 • त्यातील सर्वात जास्त अभ्यासल्या गेलेल्या तीन शोधनिबंधांसाठी त्यांना याआधी पुरस्कार मिळाला आहे. कॅनडातील नॅशनल रीसर्च कौन्सिलचे ते फेलो आहेत.

सौरभ वर्माला तैपेई बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद

 • भारताच्या सौरभ वर्माने तैपेई सिटी येथे मलेशियाच्या डॅरेन ल्यू याला पराभूत करत तैपेई बॅडमिंटन ग्रां.प्री. स्पर्धेचे एकेरीचे अजिंक्यपद मिळवले.
 • मध्य प्रदेशच्या २३ वर्षीय सौरभने पहिल्या दोन गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर आगेकूच करीत अजिंक्यपद जिंकले.
 • गेल्या वर्षीपासून कोपर आणि घोट्याच्या दुखापतीमुळे जवळजवळ एक वर्षभर तो मैदानाबाहेर राहिला होता.
 • या स्पर्धेपूर्वी सौरभने बेल्जियम आणि पोलंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा