चालू घडामोडी : १० नोव्हेंबर

टीसीएसच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री निलंबित

 • टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना निलंबित केल्यानंतर आता मिस्त्री यांना टीसीएसच्या अध्यक्षपदावरूनही हटवण्यात आले आहे.
 • टाटा समूहाने सायरस मिस्त्री यांच्याजागी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या अध्यक्षपदी इशात हुसैन यांची नियुक्ती केली आहे.
 • इशात हुसैन यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले असून हुसैन लगेचच सूत्रे हातात घेणार आहेत.
 इशात हुसैन 
 • १ जुलै १९९९ साली हुसैन टाटा सन्सच्या बोर्डावर कार्यकारी संचालक (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर) म्हणून रुजू झाले होते.
 • तर २८ जुलै २०००पासून ते  आत्तापर्यंत हुसैन यांनी वित्त संचालक म्हणूनही काम पाहिले. 
 • टाटा सन्स जॉईन करण्यापूर्वी त्यांनी टाटा स्टील कंपनीत सुमारे १० वर्ष वित्त वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालकपदाची धुरा सांभाळली.
 • तसेच टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस , व्होल्टास आणि टाटा स्काय अशा विविध कंपन्यांच्या संचालक मंडळावरही ते कार्यरत होते. 

अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे विजयी उमेदवार

 • सगळ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वांचे अंदाज चुकवत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली.
 • डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा त्यांनी पराभव केला. निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेला प्रातिनिधिक मतांचा (इलेक्टोरल कॉलेज) पाठिंबा ट्रम्प यांना मिळाला.
 • अमेरिकेची यंदाची सार्वत्रिक निवडणूक भारतीयांच्या दृष्टीने लाभदायी ठरली आहे. 
 कमला हॅरिस 
 • निवडणुकीत भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक कमला हॅरिस यांची सिनेटच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
 • सिनेटमध्ये निवडून येणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या असून, त्यांच्या या विजयाने इतिहास रचला आहे.
 • कॅलिफोर्नियातील राज्याच्या ॲटर्नी जनरलपदी त्या दोन वेळा निवडून आल्या आहेत.
 प्रमिला जयपाल 
 • भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक प्रमिला जयपाल या वॉशिंग्टन राज्याच्या प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधीगृहात प्रवेश करणार आहेत.
 • त्यांचा जन्म चेन्नईत झाला असून, या पदापर्यंत प्रथमच पोचलेल्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत.
 • ‘पिलग्रिमेज टू इंडिया: ए वुमन रिव्हिजिट्‌स हर होमलॅंड’ हे त्यांचे पुस्तकही २०००मध्ये प्रसिद्ध झाले आहे. 
 राजा कृष्णमूर्ती 
 • राजा कृष्णमूर्ती यांनी इलिनॉयमधून विजय मिळवित प्रतिनिधीगृहात प्रवेश केला आहे.
 • प्रतिनिधीगृहावर निवड झालेले ते दुसरे हिंदू-अमेरिकन ठरले आहेत. त्यांचा जन्म नवी दिल्लीत झाला असून, मूळ गाव चेन्नई आहे.
 रो खन्ना 
 • रो खन्ना यांनी कॅलिफोर्नियाच्या १७व्या राज्यातून डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढविली.
 • शेवटच्या टप्प्यात खन्ना यांनी १९ टक्के जादा मते घेऊन त्यांचे प्रतिस्पर्धी माईक होंडा यांच्यावर मात केली.

 • अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत मतदान करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बॅलेट रिसिटवर इतर भाषांबरोबरच हिंदीलाही स्थान देण्यात आले होते. 
 • अमेरिकेत सुमारे ३२ लाख भारतीय वंशाचे नागरिक राहतात. त्यामुळे तेथे इतर परकीय भाषांप्रमाणेच हिंदीही बऱ्याच प्रमाणात बोलली जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा