चालू घडामोडी : ११ नोव्हेंबर

विजय मल्ल्याची १७०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

  • सक्त वसुली संचालनालय उद्योगपती विजय मल्ल्या यांची आणखी सतराशे कोटी रुपयांची मालमत्ता लवकरच जप्त करणार आहे.
  • विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयाने मल्ल्याला फरारी घोषित करून त्याची जंगम मालमत्ता जप्त करण्याची ईडीला परवानगी दिली आहे.
  • मल्ल्या यांचे विविध कंपन्यांतील समभाग ‘ईडी’ जप्त करणार आहे. ही मालमत्ता एकूण सतराशे कोटी रुपयांची आहे. ही जप्ती फौजदारी दंडसंहिता (सीआरपीसी) अंतर्गत करण्यात येणार आहे.
  • कर चुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत मल्ल्या यांची ८,०४१ कोटी रुपयांची मालमत्ता याआधी जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या इतिहासात ही सगळ्यात मोठी जप्ती आहे.
  • मल्ल्या हे सध्या लंडनमध्ये असून, खटल्यांच्या सुनावणीला ते न्यायालयात अद्याप उपस्थित राहिलेले नाहीत.

राहुल द्रविड अंध टी-२० क्रिकेट स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

  • टीम इंडियाची भिंत म्हणून ओळखला जाणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याची अंध टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे.
  • पुढील वर्षी भारतात होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय अंध क्रिकेट संघटनेने (सीएबीआय) द्रविडची नियुक्ती केली.
  • आगामी ३१ जानेवारी ते १२ फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन भारतातील आठ शहरांमध्ये होईल.
  • या स्पर्धेत यजमान भारतासह ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, नेपाळ, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या १० संघांचा सहभाग आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा